
फडणवीस यांचा पुतळा जाळला:पोलीसांनी केली अटक
नागपूर,ता. २४ मार्च: मुंबईतील राजकारण माजी पोलिस आयुक्त परमबिरसिंग यांच्या पत्र बॉम्बमुळे चांगलेच तापले असताना राज्याच्या उपराजधानीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठेतील निवासस्थानासमोर, पाच वर्षांपूर्वीचे वास्तूविशारद असणारे एकनाथ निमगडे यांच्या हत्याकांडाच्या प्रकरणावरुन राष्ट्रवादीतर्फे आज उग्र आंदोलन करण्यात आले,यामुळे नागपूरचे राजकारणही चांगलेच ढवळून निघाले आहे.
आज बुधवार दि. २४ मार्च रोजी फडणवीस यांच्या निवासस्थानासमाेर राष्ट्रवादी पक्ष्ाच्या कार्यकर्त्यांनी उग्र आंदोलन केले.वास्तुविशारद असणारे निमगडे यांची विमानतळाजवळ पाच एकर जमीन आहे.अंदाजे ३०० कोटींची असणा-या या जमीनीवर फडणवीस यांचा डोळा होता,स्वीय सहायकाकरवी त्यांनी निमगडे यांच्याकडे ही जमीन विकण्यासाठी निरोप पाठवला,असे आंदोलनकर्त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले मात्र निमगडे यांनी ठाम नकार दिला,यानंतर त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
पाच वर्षापूर्वी घडलेल्या या हत्याकांडाने नागपूरात खळबळ माजवून दिली होती.मात्र फडणवीस हे सत्तेवर आले आणि या हत्याकांडाचा तपास थंड्या बस्त्यात गेला.२०१९ च्या नोव्हेंबरमध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि पुन्हा या हत्याकांडाच्या तपासाच्या फाईल्स बाहेर निघाल्या मात्र आता हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे.
या हत्याकांडाच्या संदर्भात मुख्य सूत्रधार श्रीराम सेनेचा रंजित सफलेकर अद्याप फरार आहे तर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.कालू हाटे,भरत हाटे व नकू अशी त्यांची नावे आहेत.
परमबिरसिंह यांच्या पत्राचा आधार घेऊन महाविकासआघाडी सरकारची बदनामी फडणवीस करीत असल्याचा आरोप ठेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज त्यांच्या घरासमोर उग्र निर्दशने केलीत.राज्यातील घडामोडी बघता फडणवीस तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर पोलीसांनी आधीच तगडा बंदोबस्त लावला आहे.
यावेळी फडणवीस यांचा पुतळा ही जाळण्यात आला.पोलीसांनी तो महत् प्रयासाने हस्तगत केला व कार्यकर्त्यांना रोखले.अनेकांन आज अटक करण्यात आली.
प्रकरण सीबीआयकडे वर्ग करणार:अमितेशकुमार
निमगडे प्रकरणाचा तपास हा आता सीबीआय करणार असल्याचे सांगून आतापर्यंत गुन्हे शाखेने जो काही तपास केला तो सीबीआयला सोपविला जाणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
