फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपानिकृष्ट काम, बोगस बिल आणि सुरक्षा अभावी मनपाच्या तिजोरीला 'गळती! 

निकृष्ट काम, बोगस बिल आणि सुरक्षा अभावी मनपाच्या तिजोरीला ‘गळती! 

Advertisements
उद्यान घोटाळ्यावर राष्ट्रवादीचा ‘सिव्हिल लाईन्स’मध्ये घेराव!

दोषींवर तातडीने एफआयआर दाखल करण्याची मागणी
नागपूर,ता.२९ ऑक्टोबर २०२५: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नागपूर शहराने आज मनपाच्या उद्यान विभाग कार्यालयावर (सिव्हिल लाईन्स) उपायुक्तांचा घेराव घालून कोट्यवधी रुपयांच्या उद्यान घोटाळ्या संदर्भात निवेदन दिले. शहराध्यक्ष अनिल अहिरकर व कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपाच्या ढिसाळ आणि भ्रष्ट कारभाराचे प्रमुख पुरावे अधिकाऱ्यांसमोर सादर केले.
उद्यानांमध्ये बसविण्यात आलेले व्यायाम साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, ते महिनाभरातच गंजले आणि तुटले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या नावावर केवळ बोगस बिले पास करून निधीची लूट करण्यात आली असल्याचा आरोप याप्रसंगी त्यांनी केला.
 उद्यान विभागाकडे सुरक्षा रक्षकांच्या कंत्राटी भरतीसाठी निधी असूनही, बहुतेक उद्यानांमध्ये सुरक्षा रक्षक नाहीत. यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिक असुरक्षित असून, सुरक्षेच्या पैशांची अफरातफर झाली आहे.
उद्यानांमध्ये जनसुविधेचा अभाव असून उद्याने ही अस्वच्छ आहेत, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आणि बाकडे तुटलेले आहेत. देखभालीवर  खर्च होत असूनही, जनसुविधेचा पूर्ण अभाव दिसून येतो,असे निवेदनात नमूद करण्यात आले.शिष्टमंडळाने उपायुक्त गणेश राठोड  यांना दोन आठवड्यांचा वेळ देत, तातडीने निकृष्ट काम आणि बोगस मोजमाप पुस्तकांवर स्वाक्षरी करून निधीचा अपहार करणाऱ्या उद्यान अधीक्षक आणि संबंधित झोनल अभियंत्यांवर त्वरित निलंबनाची कारवाई करून, फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

याशिवाय निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवठा करणाऱ्या सर्व कंत्राटदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत  टाकण्यात यावे,करदात्यांच्या पैशांची झालेली उधळपट्टी व आर्थिक नुकसान कंत्राटदार आणि दोषी अधिकाऱ्यांकडून दंड आणि व्याजासह त्वरित वसूल करण्यात यावे,अशी मागणी केली.
यावेळी बोलताना श्रीकांत शिवणकर यांनी स्पष्ट केले की, मनपाचा उद्यान विभाग भ्रष्टाचाराचा केंद्र बनला आहे. जर पुढील पंधरा दिवसांत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि दोषींवर कारवाई सुरू झाली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनपा मुख्यालयाला टाळे ठोकून तीव्र जनआंदोलन करेल.
यावेळी महिला अध्यक्ष सुनीता येरणे, युवक अध्यक्ष विशाल खांडेकर, तानाजी वनवे,बजरंग सिंग परिहार, मुकेश रेवतकर, संदीप सावरकर, अभिदत्त फाले, राजू मिश्रा, मॉटी गंडेचा,  संतोष  भुजाडे,राकेश घोसेकर, विवेक वानखेडे, मेहबूब पठाण,राजेंद्र भोयर,  संजय जोशी,अनिल पवनीपगार,  प्रवीण पाटील, रेखा चरडे, संगीता अंबारे, शहाजा बाजी, मुमताज बाजी, कनीजा बेगम, राकेश लक्कीवार, ऋषी बोराटे, निलेश बोरकर, लक्ष्मणराव वाडबुदे, राजेश शुक्ला, चंद्रकांत नाईक, भरत शर्मा, कृष्णकांत मोहोळ  विलास पोटफोडे, मनोज जरेल, कनीजा बेगम, , अविनाश पार्डीकर भारत ठाकरे, दीपक कुबडे, निखिल चाफेकर, किशोर तराडे, रंगराव गचोटे,  प्रबुदास तायवडे, संदीप सातपुते, दिलीप ढकणे, अनिल ढाले, दीपक लाडसे, गौरव तिजारे, यश ढोबळे, सरचित धार्मिक,नजमा बेगम शारदा शेख, अकिला शेख, शबाना शेख, नसरीन मानव, आवेदा पठाण रुकसाना परवीन, नसरीन बेगम ,सईद बेगम, आदि पदाधिकारी  व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो sattadheesh official युट्युब चॅनलवर उपलब्ध)
…………………………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या