

नागपूर,ता.१४ एप्रिल : गेल्या आठ वर्षांपासून निःस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशन, हुडकेश्वर (खुर्द)तर्फे महामानव क्रांतीसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त फळ वाटपाचा उपक्रम पार पाडला जातो.यंदा देखील नि:स्वार्थ फाऊंडेशनतर्फे संस्थापक सचिन घोडे यांच्या नेतृत्वाखाली १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फळवाटपचा उपक्रम पार पडला.
आज भव्य भीमरॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान फाऊंडेशनतर्फे फळवाटप करण्यात आले. प्रारंभी भीमप्रतिमेस माल्यार्पण करून, केक कापून आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित निःस्वार्थचे संयोजक भरत चरडे, संकेत घोडे, गोपाल हटवार, तुषार देशमुख, प्रशांत घोडे, सोनू लांडगे, मनोज चरडे, मयूर धरमारे, सचिन गायधने, दिलीप काष्टे, उमेश भोयर, हरीश बाळबुधे, वृषाली नवलकर, हर्षाली घोडे, प्रीती गजभिये, आरती मेंढे, राहुल मेंढे, गजानन लुंगे, रत्नपाल भगत, मनीष नवलकर, रोशन खोब्रागडे, अक्षय दादा, आदित्य भोयर, करण चरडे आदींचे सहकार्य लाभले.




आमचे चॅनल subscribe करा
