

देवडीया भवनात प्राण घेण्याचाही झाला प्रयत्न!
आभा पांडे यांचा उद्या राष्ट्रवादी प्रवेश
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. ६ फेब्रुवारी: नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आपल्या झुंजार शैलीत सत्ताधा-यांना नामोहराम करणा-या नगरसेविका कोणी असेल तर त्या आहेत अपक्ष् नगरसेविका आभा पांडे.एकेकाळी काँग्रेस पक्ष्ाच्या चिन्हाखाली आपलं राजकीय अस्तित्व रुजवणा-या आभा पांडे यांनी‘ पंजा ’ चिन्हा पलीकडे आपलं राजकीय अस्तित्व घडविण्याची कथा ही तेवढीच रोचक आणि संषर्घमय आहे.उद्या दि.७ फेब्रुवारी रोजी आभा पांडे या उपमख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्ष्ात प्रवेश घेणार आहेत.काँग्रेस ते अपक्ष् आणि अपक्ष् ते राष्ट्रवादी असा हा त्यांच्या राजकीय प्रवासाचा खास ‘सत्ताधीश’ने घेतलेला हा वेध-
आभा पांडे यांच्या राजकीय कारर्कीदीचे सुरवात झाली १९९७ साली.त्यांच्या राजकीय प्रवासाला आता २३ वर्षे पूर्ण होत आली.१९९७ साली पती बिज्जू पांडे यांच्यासोबत प्रचारात त्या प्रथम उतरल्या.कार्यकर्त्यांना त्यांची घराच्या चार भिंतीबाहेरील ओळख हळूहळू पटू लागली.लग्नाला फक्त दोनच वर्ष झाली होती.१९९५ साली आभा पांडे यांचा काँग्रसेचे कार्यकर्ते असणारे बिज्जू पांडे यांच्याशी विवाह झाला.१९९७ साली मनपाची निवडणूक आली.ती अशी निवडणूक होती ज्यात काँग्रेस पक्ष्ाने ‘पंजा’हे चिन्ह फ्रिज केले.त्या वेळी वार्डनिहाय निवडणूका होत असे.त्या निवडणूकीतील प्रचारात पती बिज्जू पांडे यांच्यासोबत प्रचारात आभा यांनी हिरीरीने सहभाग घेतला मात्र…बिज्जू पांडे हे मागे राहीले.मात्र आभा पांडे यांची कार्यकर्ते व नेते यांच्या वर्तुळात वावरण्याची सुरवात झाली होती.
पुढची निवडणूक २००१ ची निवडणूक ही ३ प्रभागाची झाली.या वेळी हा प्रभाग महीलेसाठी अारक्ष्ति झाला.त्यावेळी डोक्यावर सतत पल्लू घेणा-या आभा ताई यांनी ही निवडणूक काँग्रेसतर्फे लढावी असा सल्लावजा आदेश डॉ.श्रीकांत जिचकार यांनी दिला.बिज्जू पांडे हे श्रीकांत जिचकार यांच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते समजले जात होते.जिचकार हे तिरोड्याला बिज्जू पांडे यांच्या घरी ही येत असत.बिज्जू यांनी घरी कुटुंबियांशी चर्चा केली.सासू यांना मात्र सून राजकारणा जात असल्यामुळे काळजी वाटली.फक्त पुरुषांचीच मक्तेदारी असणा-या राजकारणाच्या क्ष्ेत्रात चार भिंतीत राहणा-या सूनबाईचा कसा निभाव लागेल?या काळजीपोटी त्यांचा विरोध होता मात्र बिज्जू पांडे यांनी त्यांच्या माता-पित्याला मी सदैव सोबतच असणार आहे त्यामुळे काळजी नको म्हणून समजावले व आभा यांना निवडणूक लढण्याची घरातून परवानी मिळाली.
या निवडणूकीत आभा यांनी प्रतिस्पर्धांच्या पराभव केला.विशेष म्हणजे त्यांचा विरोधत हलबा,जैन समाजाचे उमेदवार असताना त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढून बाजी मारली.मात्र हे यश आभा पांडे यांचं नव्हतंच ना ते काँग्रेस पक्ष्ाचं यश होतं..बिज्जू पांडे या एकमेव नावामुळे राजकारणात नवख्या आभा पांडे यांना मतदारांनी भरभरुन मत दिले.ही निवडणूक आभा पांडे यांनी तब्बल १६०० मतांनी जिंकली.
२००५ साली आभा या स्थायी समितीच्या अध्यक्ष् झाल्या.त्यावेळी काँग्रेसचे नरेश गावंडे हे महापौर पदी होते.राजकारण समजत नव्हते.पत्रकार प्रश्न विचारायचे तेव्हा काहीबाही उत्तर मी देत असे,असे त्या आज हसून सांगतात.स्थायी समितीच्या अध्यक्ष् पदी असतानाही मी माझ्या वार्डातल्या पाण्याच्या बोअरवेलविषयी पत्रकारांशी बोलायचे!लवकरच मला ‘मीपणाची बाधा ही झाली’असे त्या प्रामाणिकपणे सांगतात.हे पद,ही सत्ता मला संघर्षातून मिळाली नव्हती त्यामुळे त्याची किमत ही कळत नव्हती.स्थायी समितीची अध्यक्ष् असताना मला एका गडललाईनच्या चेंबरची फाईल घेऊन मनपा मुख्यालयात जावे लागणार होते.माझ्या घराखाली असलेल्या माझ्या कार्यालयात बसले असताना पती बिज्जू पांडे यांनी ही फाईल तुलाच मुख्यालयात घेऊन जाणे गरजेचे असल्याचे समजावले मात्र…मला त्याचे इतके वाईट वाटले की मी चक्क वरती घरी येऊन सासूबाईंकडे रडले!गडरच्या चेंबरची फाईल मी घेऊन जावी?मात्र सासूबाईंचे एकच वाक्य धीर देऊन गेले ‘बिज्जू म्हणतोय ना?तर तुलाच ते घेऊन जाणे गरजेचे आहे’यानंतर फाईल कशी बनते,टीएस कसा मिळतो?कोटेशन कसे काढतात?या प्रशासकीय अनुभवात तरबेज होत गेले.
त्यावेळीही काँग्रेस चतुर्वेदी गट व विलास मुत्तेमवार गट अश्या दोन गटात विभागला होता.मी चतुर्वेदी गटातली होते…मनपाच्या इतिहासात पहील्यांदा मी अध्यक्ष् असताना स्थायी समितीचा बजेट पडला….! ६३० कोटींच्या जवळपास तो अर्थसंकल्प होता.
बजेट सादर करताना भारतीय जनता पक्ष्ाच्या महीला नगरसेविका या चक्क माईकच्या जवळपासच भोवताली होत्या व मला बजेट सादर करण्यापासून परावृत्त करीत होत्या.त्यांच्या या कृतीचा मला अत्यंत राग आला व मी आणखी त्वेषाने बजेट सादर केला.निगम सचिव बोलतात त्या ठिकाणाहून मी एवढ्या गोंधळातही एक तास बजेटवर बोलले.नाना श्यामकुळे यांनी मात्र माझ्या या हिंमतीची दाद दिली होती.
तो एक वर्षाचा कार्यकाळ कसा गेला कळलेच नाही.त्यावेळी स्थायी समितीच्या अध्यक्ष्ांना लाल दिव्यांची गाडी मिळत असे.माझ्यानंतर नंदीनी हाडके या अध्यक्ष् झाल्या नेमक्या त्याच वेळी अध्यक्ष्ांना लाल दिव्यांची गाडी देणे बंद झाले होते!
याच दरम्यान मी नागपूर सुधार प्रन्यासची विश्वस्त पदी होते.तो ही अनुभव शिकण्यासारखाच होता.बैठकीतील इतिवृत्तच अधिकारी हे अजेंडा लिहत असताना बदलून टाकीत असत!ही हेराफेरी लक्ष्ा त येताच मी बैठकीचे इतिवृत्त चक्क मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन ठेऊ लागले.
२००७ साली सतीश चतुर्वेदी यांची ईच्छा बिज्जू पांडे यांनीच मनपाची ही निवडणूक लढवावी अशी होती.मात्र त्यावेळी १५ टक्के हा आमचा तर ८५ टक्के आ.कृष्णा खोपडे यांचा प्रभाग जुळला होता.बाबुजी मानत नव्हते त्यांचा आग्रहच होता.तू फक्त अर्ज दाखल कर असे त्यांनी सांगितले.त्या निवडणूकीत खोपडे यांना २२६०,बिज्जू पांडे यांना २१०० च्या जवळपास तर मुस्लिम उमेदवार नाना असलम यांनी ६०० मते घेतली.ही निवडणूक हरल्याने बिज्जू हे निराश झाले.मात्र एक निवडणूक हरल्याने काहीही फरक पडल नसल्याचा निर्धार करुन पुन्हा नव्या जोमाने आपला मतदारसंघ बांधण्यास बिज्जू पांडे यांनी सुरवात केली.
२०१२ सालीच्या निवडणूकीत पुन्हा हा प्रभाग महिलेसाठी आरक्ष्ति झाला.त्यावेळी २ वार्डचा एक प्रभाग झाला.ती निवडणूक मी ८८० मतांनी जिंकली.सभागृहात मी प्रश्न मांडायला शिकले.आयुक्तांसारख्या आयएएस अधिका-यांसमोर वन टू वमुद्दे मांडण्याचा आत्मविश्वास आला.
सभागृहात काँग्रेसच्या प्रतिष्ठेचा ग्राफ उंचावत नेला.प्रभागाच्या चाकोरीतून निघून संपूर्ण शहराच्या समस्या मांडू लागले.मालमत्ता,पाणी कर,मनपा शाळा इ.अनेक मुद्दे गाजवले.आ.विकास ठाकरे हे त्यावेळी विरोधी पक्ष् नेते होते.शहरातील कचरा उचलणारी कनक एजंसीचा विषय जेरीस आणला यामुळे कनकला ९३ लाख रुपये दंड बसला.
२०१४ पासून मात्र काँग्रेसच्या नेत्यांना वाटलं आभा पांडे आता जड होत आहे.आपल्यापेक्ष्ा वरचढ होईल.हा दौर असा होता जेव्हा आपल्याच पक्ष्ामधून खूप त्रास देण्यात आला.मी २०१२ पासून महीला काँग्रेसच्या अध्यक्ष् पदी होती मात्र ते फक्त शोभेचं असावं,अशीच नेत्यांची ईच्छा होती.२०१४ साली मीच पक्ष्ाला विधान सभेची तिकीट मागितली.दिल्लीत पक्ष्ाचे अध्यक्ष् राहूल गांधी यांनी यादी फायनल केली त्यात ७ व्या क्रमांकावर माझे नाव होते.शोभा ओझा यांनी मला तसे कळवले देखील निवडणूकीच्या तयारीला लाग.
मात्र…दुस-या दिवशी यादी पार बदलली होती…ःमाझ्या ऐवजी नाव होते अनीस अहमद!रातोरात यादी ‘मॅनेज’झाली.जाती-धर्माचे गलिच्छ राजकारण खेळल्या गेले.त्या निवडणूकीत भारतीय जनता पक्ष्ाने हिंदू-मुस्लिम मतांचे चक्क ध्रुवीकरणच केले.भाजपची स्ट्रेटेजी लाभदायक ठरली.अनीस अहमद हरले.विकास कुंभारे मध्य मधून जिंकले. तर राष्ट्रवादीचे कमाल अंसारी योनी ३५०० मते खालली.
यानंतर मी मनपा सभागृहात सर्वात समोर बसणारी सर्वात मागे बसू लागले.एक जिंदाबाद एक मुर्दाबाद अश्या राजकारणा मागे जायचे नाही,असा निर्धार करुन पुढील निवडणूक अपक्ष् म्हणूनच लढवायची मी मनोमनी तयारी केली.
२०१७ उजाडले. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: फोन करुन भाजपतर्फे लढायचे आहे असा संदेश दिला.तेव्हा देखील १५ टक्के भाग हा मध्य तर ८५ टक्के पूर्वमध्ये माझा प्रभाग गेला होता.३ फेब्रुवारीला नामनिर्देशन अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती.मी १ फेब्रुवारीलाच अपक्ष् म्हणून अर्ज सादर केला होता.भाजप शहराध्यक्ष् प्रवीण दटके यांचा फोन आला,एक वेळा गडकरी यांच्याशी बोलून घ्या…!मात्र निरोप भाजपमधून आला होता त्यांना निर्णय कळवायचा होता..मी स्वत:हून विचारण्याचा प्रश्न आला कुठे?
आश्चार्यची बाब म्हणजे काँग्रेसमधूनही ऑफर आली.पक्ष्ातर्फे लढा!आभा पांडे मुळे प्रभागातील इतरही तीन जागा काँग्रेस काढू शकेल,असा यामागे काँग्रेस शहराध्यक्ष्ांचा होरा होता.माजी महापौर व ज्येष्ठ नेते अटलबहादूर सिंग यांनी स्वत: बाेलावणे पाठवले.मुलगी म्हणून समजावले.विचार करुन सांगते म्हणून कळवले.मात्र काँग्रेस पक्ष्ातर्फे लढायचे नाही,हा निर्धार पक्का होता.काँग्रेसतर्फे नाही लढायचे तर माझ्या लोकमंचतर्फे लढ असा सल्ला ही दिला मात्र लोकमंच व काँग्रेसचीयुती होती….!माझ्या मतदारांनी अपक्ष् म्हणून लढत असले तरी ‘सिलेंडर’हे निवडणूक चिन्ह लक्ष्ात ठेवले….!२ हजार मतांनी ही निवडणूक जिंकले….!
बहूजन समाज पक्ष्ाची उमेदवार तिस-या क्रमांकावर तर सिटींग उमेदवार शिवेसेनची उमेदवार अलका दलाल या चौथ्या क्रमांकावर होत्या.भाजप ५५०० तर काँग्रेसला ८००० मते पडली.माझ्यासाठी ही ‘करो या मरो‘निवडणूक होती माझ्या मतदारांनी मला निराश नाही केले.दोन हजार मतांनी मी यश खेचून आणले.
विकास कुंभारे व कृष्णा खोपडे यांनी माझ्या प्रभागात खूप प्रचार केला.आभा पांडेशिवाय कोणालाही मत टाका.मात्र आभा पांडे हीने जनतेसोबत फक्त विकासाबाबतच संपूर्ण निवडणूकीत संवाद साधला.आ.खोपडे हे तर मुद्दामून माझी जिथे सभा होत होती त्याच ठिकाणी सभा घेत असत.
राष्ट्रवादीतच जाण्याचा निर्णय का?
या प्रश्नावर बोलताना,काँग्रेस मे जाना नही था,काँग्रेस आज भी सुधरी नही,काँग्रेस नेतृत्वालाच शहरात पक्ष् वाढवण्यात रस नाही,दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते प्रफूल्ल पटेल नागपूरात पक्ष् वाढीसाठी तीन वेळा येऊन गेलेत.नुकतेच मंत्री जयंत पाटील यांनी नागपूरचा दौरा केला.यात संवादावर त्यांनी भर दिला.संघटन बळकट करण्यास काँग्रेसला रस नाही,माझ्यापेक्ष्ा मोठा नेता पक्ष्ात तयार झाला नाही पाहिजे हीच सावधगिरी काँग्रेस कायम बाळगते,असा घणाघाती आरोत आभा पांडे यांनी केला.
राष्ट्रवादी ही पक्ष् वाढविण्यात रस घेत आहे.अनेकांना भेटत आहे.नव्या लोकांना संधी देत आहे.काँग्रेस म्हणजे शहरात कोणती काँग्रेस?कोणाची काँग्रेस?असा संभ्रम कायम आहे.आता तर आ.दुष्यतं चतुर्वेदी हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना शिवसेनेत घेऊन जात आहेत!
भाजपशी लढा देण्याची मुकुल वासनिक,अविनाश पांडे यांची ईच्छा तरी आहे का?प्रत्येक प्रश्न,प्रत्येक समस्येसाठी राहूल से मिल लो,सोनियाजी से मिल लो….!ते जर अजून ही कार्यकारी अध्यक्ष् आहेत.त्यांच्या नंतर काय?काँग्रेस पक्ष्ात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची ताकद कोणाचीच नाही.त्यामुळेच ‘नाही कोणाशी वादावादी आता आम्ही राष्ट्रवादी’हे धोरण स्वीकारले आहे.
दिल्लीपेक्ष्ा बारामती बरी.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यात व्हिजन आहे.काँग्रेस पक्ष्ातील नागपूरचे पालकमंत्री ना गंभीर आहेत ना त्यांना पक्ष् वाढवायचा आहे.पवार यांच्या दूरदृष्टिमुळेच नागपूर शहरात राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे.गृहमंत्री अनिल देशमुख हे गांर्भीयाने यासाठी प्रयत्न करीत आहे.एकीकडे नितीन राऊत यांचे प्रयत्न बघा पक्ष्ासाठी दूसरीकडे अनिल देशमुख यांचे प्रयत्न बघा.
चांगल्या लोकांना पक्ष्ासोबत जोडून राष्ट्रवादी शहरात जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करीत आहे.राष्ट्रवादीत गेल्यानंतर जनतेसाठी जे प्रयत्न अपक्ष् म्हणून करीत होते आता त्या प्रयत्नांना सत्तेचे पाठबळ मिळेल,व जनतेच्या अपेक्ष्ा पूर्ण होऊ शकतील.सत्तेत नसताना जनतेची इतकी कामे होत होती ती सत्तेत असताना किती होतील?
गेल्या १५ वर्षां भाजपच्या सत्ताधा-यांनी महानगरपालिकेत जेवढा काही भ्रष्ट कारभार केला आहे तो समोर आणणार आहे.याशिवाय राष्ट्रवादी हा पक्ष् जनतेसाठी काय काय करु शकतो,हे ही जनतेला सांगणार आहे.
नितीन राऊत यांना कोव्हिडच्या काळात पालकमंत्री म्हणून खूप चांगली संधी होती जनतेसाठी खूप काही करण्याची मात्र…आड्यातच नाही तर पोह-यात कूठून येणार?त्यांनी खूप चांगली संधी गमावली,असे माझे वैयक्तीक मत आहे.
देवडीया भवनात प्राण घेण्याचाही झाला प्रयत्न!
काँग्रेस पक्ष्ात आभा पांडे मोठी होऊ नये म्हणून देवडीया भवनात १ मार्च २०१३ साली पार पडलेल्या बैठक संपल्यानंतर मला दूस-या मजल्यावरुन खाली उतरताना पाठीमागून चक्क खाली ढकलण्यात आले….!शुल्लक राजकीय असूयेतून हा माझा प्राण घेण्याचा अशलाघ्य प्रयत्न होता….!कांता पराते यांनी तो केला होता.याची तक्रार मी गणेशपेठ पोलीस ठाण्यात देखील केली होती.माझ्या मणक्याच्या हाडाला जबर मार बसला आहे.विशेष म्हणजे माझ्यासोबत असणा-या मुलाने बिज्जू यांना फोन करुन तातडीने बोलावले त्यांनी मला रुग्णालयात भर्ती केले मात्र देवडीया भवनात हजर असणा-या एकाही तथाकथित नेत्याने साधी विचारपूस देखील केली नाही,ना रुग्णालयात भेटायला आले ना चौकशीचा एक फोन केला!उलट कांता पराते हीचाच ‘झाशी ची राणी’म्हणून गौरव केला.आज ही ती नस चूकून दाबल्या जाते तेव्हा त्या वेदना भयंकर असतात.माझी मुले ही तेव्हा खूप लहान होती.मला आज ही ती नस दबल्यावर औषधांचा हॅवी डोज घ्यावा लागतो….!
काँग्रेस पक्ष्ाचा नागपूर शहराचा सेटअपच खराब!
२०१२ साली तिकीट वाटपाचा मजेदार किस्सा आभा पांडे यांनी ‘सत्ताधीश’ला सांगितला.हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये तिकीट वाटपाचा अर्थात बी फॉर्फ वाटपाचा कार्यक्रम सुरु होता.दूपारचे दीड वाजले होते.३ वा.नामनिर्देशीत अर्ज सादर करण्याची शेवटची वेळ होती. विकास ठाकरे,पर्यवेक्ष् क मुन्ना ओझा इ.विभूती ती वाटप करीत बसली होती.अभूतपूर्व असा गोंधळ सुरु होता.आम्ही घरीच वाट बघत होतो कारण आमच्या घरी बी फॉम पोहोचून देत असल्याचे फक्त ‘निरोप’आला होता.
हॉटेल सेंटर पॉईंटमधील गोंधळ कळताच आम्ही धावत पळत त्या ठिकाणी पोहोचलो.माझ्या मागे जुल्फीकार भुट्टो ही होते.आम्ही कसे तरी मंचापर्यंत पोहोचलो.फॉर्म कधी देणार असे विचारत अक्ष् र: ठाकरे यांच्या हातातून बी फॉर्म बिज्जू पांडे यांनी हिसकला,जुल्फीकार यांनी देखील तेच केले त्यांनी पण फॉर्म हिसकून पळ काढला.दुस-या लिफ्टने आम्ही खाली पळालो.धावत पळत अर्ज सादर केला.ही….काँग्रेसची अवस्था आहे…..!
नागपूर शहरातचा काँग्रेसच्या काही नेत्यांनी सेटअपच खराब करुन ठेवला आहे……!




आमचे चॅनल subscribe करा
