फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमनाट्यकर्मी सलीम शेखने केले हिंदू देवतांची विटंबना करणा-या पोस्ट टाकणा-याचे समर्थन!

नाट्यकर्मी सलीम शेखने केले हिंदू देवतांची विटंबना करणा-या पोस्ट टाकणा-याचे समर्थन!

Advertisements

लवकरच गुन्हा नोंदवण्याची शक्यता नागपूरकर कलावंतांनी केली व्यक्त

चारुदत्त जिचकारला जामीन मंजूर: ‘मी निर्मोही’ संस्थेच्या अध्यक्ष पदावरुन हकालपट्टी

नागपूर,ता.१९ मे : मधुरिका साऊंड स्टूडियोचे मालक व ज्येष्ठ साऊंड रेर्कोडिस्ट चारुदत्त जिचकार याने काल आपल्या फेसबुकवर हिंदू देवी-देवतांविषयी अतिशय गलिच्छ शब्दात अवमानकारक अशी पोस्ट टाकली होती.भगवान शिव व माता पार्वती यांच्याविषयीची ती पोस्ट वाचताच नागपूरच्या संगीत जगतात,नाट्य जगतात तसेच कीर्तनकार जगतामध्ये प्रचंड संताप उमटला.विश्‍व हिंदू परिषद,बजरंग दल तसेच भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्ते तसेच संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत सहमहामंत्री अमर कुलकर्णी,शहरातील काही ज्येष्ठ कीर्तनकार तसेच कलावंतांनी गणेशपेठ तसेच बजाज नगर पोलिस ठाण्यात चारुदत्त जिचकार याच्याविरोधात तक्रार दाखल केल्याने जिचकार याला गणेशपेठ पोलिस ठाण्यात पाचारण ही करण्यात आले होते मात्र नाट्य परिषद महानगर शाखेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नाट्यकर्मी सलीम शेख यांनी चारुदत्त जिचकार याच्या पोस्टच्या समर्थनार्थ फेबसबुकवर पोस्ट व्हायरल करताच त्यांच्याप्रतिही तीव्र संतापाची लाट नागपूरकर कलावंतांमध्ये उमटली.

‘दादा मीच नव्हे तर नागपूरच्या अनेक हौशी रंगकर्मींचे तुम्ही हक्काचे दादा..मी तुमच्यासोबत आहे दादा’अशी पोस्ट व्हायरल होताच शेख यांच्याबद्दल हिंदू धर्मियांच्या मनात तीव्र संतापाची लाट उसळली.जिचकार याने हिंदू देव-देवतांचा अपमान करणारी तसेच हिंदू धर्मियांची धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट व्हायरल केली त्याचे समर्थन महानगर शाखेच्या अतिशय जवाबदार पदी असणा-या अध्यक्ष असणा-या सलीम शेखने चारुदत्त जिचकारला समर्थन देणारी पोस्ट टाकली याचा अर्थ त्यांनीही हिंदू देव-देवतांच्या अपमानाचे उघडपणे समर्थनच केले असल्याने आता त्यांच्याही विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चारुदत्त जिचकार याने हिंदू धर्माऐवजी इतर कोणत्याही धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट टाकली असती किंवा सलीम शेख यांच्याच आराध्यांविषयी अश्‍या अश्‍लील शब्दात पोस्ट व्हायरल केली असती तरीही सलीम शेख याने चारुदत्त जिचकाराचे असेच उघडपणे समर्थन केले असते का?असा प्रश्‍न आता विचारल्या जात आहे.या उलट कोणत्याही हिंदूने इतर कोणत्याही धर्माविषयी कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट टाकली असती तरी हिंदू असूनही आम्ही त्याचा विरोध केला असता असे कीर्तनकार व कलावंत मंडळी सांगत आहेत.आमचा कोणत्याही धर्माविषयी आकस नाही मात्र आम्ही आमच्या धर्माची निंदा करणा-यांनाही माफ करु शकत नाही असे ते सांगतात.

जिचकार याला जामीन-
राज्यात सध्या केतकी चितळे हिची राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी शेअर केलेली पोस्ट व यावरुन तिला झालेली अटक,राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांकडून तिला झालेली मारहाण,तीन दिवसांची पोलीस कोठडी,१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी,तिच्या घराची ठाणे गुन्हे शाखेच्या तब्बल १२ पोलिस अधिका-यांकरवी झालेली झाडाझडती,तिचा घरातून लॅपटॉप,मोबाईल,संगणक जप्त करने, या घटनांमुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना नागपूरातील एक ध्वनि मुद्रक(साऊंड रेर्कोडिस्ट)स्वत:च्या फेसबुक पेजवर ‘शेअर केलेली नव्हे’ तर स्वत: हाताने टाईप करुन हिंदू देवी-देवतेचा अवमान करणारी अतिशय निंदनीय पोस्ट व्हायरल करतो तरीही त्याला लगेच जामीन मिळतो!फेसबुकशी संबंधित गुन्हे सारखेच असताना मात्र एक पोस्ट राजकीय तर एक धार्मिकतेशी संबंधित, मात्र एकच राज्य,एकच कायदा,एकच पोलिस विभाग आणि गुन्ह्याचा एकच प्रकार असतानाही जिचकार याला तातडीने जामिन मंजूर होतो,ते बघता न्यायाच्या बाबतीच खरेच सर्व समान आहेत का??यावर बरीच खलबते समाज-मनात आज रंगली.जिचकार याच्या विरोधात गोंदिया येथे ही गुन्ह्याची नोंद झाली असल्याची माहीती पुढे आली आहे.

जिचकार याची नागपूरातील सुप्रसिद्ध संगीत संस्था ’मी निर्मोही’च्या अध्यक्ष पदावरुन आज तातडीची बैठक घेऊन हकालपट्टी करण्यात आली व उपाध्यक्ष असणारे सुप्रसिद्ध तबला वादक सचिन ढोमणे यांची नियुक्ती संस्थेच्या अध्यक्ष पदी करण्यात आली आहे.

इतर धर्माविषयीची पोस्ट असती तर रान पेटलं असतं जे घडलं त्याचे समर्थन मुळीच करता येत नाही:नरेश गडेकर(अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती,मुंबईचे अध्यक्ष)-कलाकारांनी जाती,धर्म,भाषा,प्रांत इत्यादी भेदाभेदच्या पलीकडे जाऊन कलेची साधना करावी.खरा कलाकार हा सर्व जाती,धर्माविषयीचा अादर करीत असतो.कलाकार हाच मुळी निधर्मी असतो.एखाद्या रंगकर्मीने चुकीचे काही घडत असेल तर समजावून सांगायला हवे मात्र त्याचे समर्थन करता कामा नये,असे माझे मत आहे.हीच पोस्ट हिंदू देव-देवतांविषयी नसून इतर धर्मियांविषयीची असती तर आतापर्यंत रान पेटलं असतं.अश्‍या पद्धतीच्या निषेधार्ह्य पोस्ट टाकण्यापासून ख-या कलावंतांनी दूरुच राहणे योग्य.कुणी अश्‍या पद्धतीच्या पोस्ट टाकत असेल वर इतर कोणी जर त्याचे उघडपणे समर्थन करीत असेल तर हे देखील चुकीचेच आहे.

 

धार्मिक भावना भडकविणा-या पोस्टला उघडपणे समर्थन हा देखील गुन्हाच-अमर कुलकर्णी(संस्कार भारती विदर्भ प्रांत सह-महामंत्री)
आपल्या समोर पार्श्वगायक मोहम्मद रफी हे आदर्श उदाहरण आहेत ज्यांनी मुस्लिम धर्मिय असतानाही भगवान श्रीरामाचे गाणेही तितक्याच तन्मयतेने गायली.कलाकार हा निधर्मीच असतो मात्र निधर्मी असणे याचा अर्थ आपल्या धर्माविषयीचा अभिमान न बाळगणे असा होत नाही.चारुदत्त जिचकार याने जी पोस्ट त्याच्या फेसबुकवर व्हायरल केली ती अतिशय निंदनीय होती.त्याला जर शहरातील एक ज्येष्ठ नाट्यकर्मी उघडपणे समर्थन देत असतील तर त्यांनी हे स्पष्ट करावे त्यांचे समर्थन नेमके कोणत्या मुद्दाला आहे.त्यांनी हे सविस्तरपणे जाहीर करावं की जिचकार याने जी पोस्ट टाकली ती चुकीची नाही,ती योग्य आहे.त्यात काहीही गैर नव्हतं तर जिचकार याने ती पोस्ट डिलीट का केली?पोलिस ठाण्यात माफीनामा का लिहून दिला?याचा ही खुलासा शेख यांनी करावा आणि नागपूरातील कला जगताचं अज्ञान दूर करावं.

समर्थन गैरसमजुतीतून:सलीम शेख(नाट्य परिषद महानगर शाखेचे अध्यक्ष)
चारुदत्त जिचकार हे नेहमीच भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राजकीय अश्‍या पोस्ट टाकत असतात.काल मला त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले एवढंच कळलं व मी त्यांना पूर्णपणे समर्थन देणारी माझी प्रतिक्रिया माझ्या फेसबुकवर व्यक्त केली मात्र आज सकाळी जेव्हा मी वीरेंद्र लाटणकर यांच्यासोबत बोललो तेव्हा मला कळले की जिचकार यांच्याविरुद्ध राजकीय नव्हे तर धार्मिक पोस्ट केल्यामुळे गुन्हे दाखल झाले आहेत आणि मी त्वरित माझी त्यांना समर्थन देणारी प्रतिक्रिया डिलिट केली.मी जिचकार यांच्या अश्‍या धार्मिक पोस्टचे समर्थन करु शकत नाही,माझा गैरसमज त्यांच्या राजकीय पोस्टविषयी झाला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या