फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागरिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ दिल्या घोषणा

नागरिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ दिल्या घोषणा

Advertisements

 

त्रिमूर्ती नगर, आदर्श कॉलनी परिसरातील नागरिकांशी साधला संपर्क 

नागपूर १२ ऑक्टोबर: दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार क्षेत्रातील भाजपचे लोकप्रिय उमेदवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ भाजप पदाधिकाऱ्यांच्यावतीने शनिवारी सकाळी प्रचार पदयात्रा काढण्यात आली होती. भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि नागपूर महानगर पालिकेतील सत्तापक्ष पुढारी संदीप जोशी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने भाजप कार्यकर्ते, युवा वर्ग आणि सामान्य नागरिक सहभागी झाले होते. या दरम्यान नागरिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ घोषणा देत त्यांच्या लोकाभिमुख कार्याची स्तुती केली तसेच स्थानिक भागातील माता-भगिनींनी पदयात्रेत सहभागी ज्येष्ठ पुढाकाऱ्यांची आरती ओवाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे भावी मुख्यमंत्री असतील, असा विश्वास व्यक्त केला. काही वस्त्यांमध्ये पदयात्रेवर पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानसभा क्षेत्राचा भाग असलेल्या त्रिमूर्तीनगर येथून पदयात्रेला सुरुवात झाली. यानंतर ही पदयात्रा आदर्श कॉलनी, जय दुर्गा कॉलनी, लोक सेवा नगर, भामटी, साईनाथ नगर, गेडाम ले-आउट, प्रियदर्शिनी नगर, एमआयजी क्वॉर्टर, आजाद हिंद नगर, जयताळा रोड, गोरले ले-आउट, द्रोणाचार्य नगर, नेलको सोसाइटी या परिसरातून फिरली.

दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचा मुख्यमंत्र्यांना मिळणारा उदंड प्रतिसाद हा त्यांच्या लोककल्याणकारी कामाची ग्वाही देत होता. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या परिसरात नियमित स्वच्छता केली जाते. युवा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि  लहान मुलांना खेळण्यासाठी उद्याने तयार करण्यात आली आहेत. जय दुर्गा कॉलनी, लोक सेवा नगर, भामटी, साईनाथ नगर, गेडाम ले-आउट, प्रियदर्शिनी नगर, एमआयजी क्वॉर्टर, आजाद हिंद नगर, जयताळा रोड, त्रिमूर्ती नगर आदी परिसरात पक्के रस्ते तयार करण्यात आले आहेत. यासोबतच मागील ५ वर्षांत झालेल्या इतर विकास कार्यांमुळे नागरिक आनंदी आहेत. भाजपच्या पदयात्रेला मिळत असलेला प्रतिसाद बघता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत १ लाखपेक्षा जास्त मतांनी जिंकून येतील, असा विश्वास संदीप जोशी यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ निघालेल्या या पदयात्रेत  नगरसेवक प्रकाश भोयर, नगरसेवक लहुकुमार बेहते, नगरसेविका पल्लवी शामकुळे, नगरसेविका मिनाक्षी तेलगोटे, शंकर भूते, जितेंद्र टिचकुले, अमित रहांगडाले, लता सावरकर, संगीता पाटील, मधु पटोदिया, माधुरी पडोळे, उषा पटले, अनीता बेहेते, प्रफुल्ल आंबुलकर, संजीवनी देशपांडे, संदीप नानोटी, प्रवीण कुंभारे, संगीता पोहरकर, साधना दाते, स्वप्ना रोडी, मनोज परसवानी, गिरीश श्रीरामे, इंदर केशवानी, राहुल बैस, श्रीकांत बोहरे, स्नेहल गोतमारे, संजय देशमुख, श्रुती देशपांडे यांच्यासह हजारो भाजप कार्यकर्ते आणि इतर नागरिक सहभागी झाले होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या