फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपूर विद्यापीठात उमटले स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळा दहनाचे पडसाद

नागपूर विद्यापीठात उमटले स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळा दहनाचे पडसाद

Advertisements


भाजप युवा मोर्चातर्फे रातुम नागपूर विद्यापीठात आंदोलन

प्र.कुलगुरुंचा केला घेराव:कुणाल राऊतवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नागपुर,२ फेब्रुवरी २०२४: काँग्रेसचे उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत यांचे पुत्र व युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांनी काल विद्यापीठ परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.याचे तीव्र पडसाद उमटून ,आज भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्च्यातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र.कुलगुरु यांचा घेराव घालून तीव्र आंदोलन करण्यात आले.

भारतीय जनता पक्ष नागपुर महानगर अध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्या मार्गदर्शनात, भाजप नागपूर महानगर संघटन महामंत्री विष्णू चांगदे यांच्या प्रमुख उपस्थितीत, भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगर अध्यक्ष बादल राऊत यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरा तर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे कुलगुरू उपस्थित नसल्याकारणाने प्र कुलगुरू यांना घेराव घालून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी प्र-कुलगुरू यांच्या केबिनमध्ये जाऊन नारेनिर्देश करण्यात आले तसेच त्यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले.
जोपर्यंत विद्यापीठातर्फे कुणाल राऊत विरोधात तक्रार करण्यात आली नाही तोपर्यंत युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्र.कुलगुरुंच्या कक्षातच ठिय्या आंदोलन केले.

यावेळी, कुलगुरूंनी अंबाझरी पोलीस स्टेशन येथे दूरध्वनि करून कुणाल राऊत यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली व तसेच एक लेखी पत्र लिहून ते पत्र सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर वाचून दाखवले. ते पत्र अंबाझरी पोलीस स्टेशन येथे पाठविण्यात आले.

ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला तिथेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करून, कुणाल राऊतचा निषेध करण्यात आला .यावेळी प्र-कुलगुरूंना सावरकरांची प्रतिमा भेट देण्यात आली.

यावेळी प्रामुख्याने भा.ज.यु.मो नागपूर शहर महामंत्री सागर घाटोळे, सौरभ पराशर, अमेय विश्वरूप, भाजप दक्षिण पश्चिम मंडळ उपाध्यक्ष निलेश राऊत, भा.ज.यु.मो प्रदेश उपाध्यक्ष पारेन्द्र पटले, प्रदेश सचिव श्रेयस कुंभारे, शहर संपर्कप्रमुख संदीपण शुक्ला, शशांक समुद्रे, आशिष मेहर, मंडळ अध्यक्ष अक्षय ठवकर, गुड्डू पांडे, आशिष मिश्रा, विद्यार्थी आघाडी, संयोजक शिवेश हारगोडे,मनमित पिल्लारे, सह प्रचार प्रसिद्धी प्रमुख वेदांत जोशी, सहयुती प्रमुख कामाक्षा रेणके, प्रज्वल मांगर, विकी वगैरे पिंकेश पटले, गुणव हुडा, उदय मिश्रा, स्वप्निल खड़गी, अक्षय शर्मा, दीपेश यादव, सौरभ शाहू, दानिश शेख, आशुतोष भगत, चिन्मय गोरंटीवार, तेजस जोशी, शंतनू झाडे, अभिषेक पिल्लारे, प्रतीक पाचकवडे, सनी झेंडे, अनुप साळवे, अक्षुन खापरे, भावेश माताघारे, पूर्व नागपूर युवती प्रमुख अदिती लांजेवार व तसेच भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या