फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपूर महानगरपालिकेने केले नागपूर शहरात १३४३० वैयक्तिक शौचालयांचे निर्माण

नागपूर महानगरपालिकेने केले नागपूर शहरात १३४३० वैयक्तिक शौचालयांचे निर्माण

Advertisements

अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची माहिती : पुढील वाटचालीकरिता मनपाचे प्रयत्न

नागपूर,ता.२४ : नागपूर महानगरपालिकेने नागपूर शहरात १३४३० वैयक्तिक शौचालयांचे निर्माण करीत हागणदारीमुक्त नागपूरच्या पुढील वाटचालीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शौचालय निर्माण करीत अनेक कुटुंबांना स्वच्छता अभियानाचे महत्त्व पटवून सांगितले आहे. आता महानगरपालिका ओडीएफ प्लस प्लसच्या मानांकनासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

नागपूर शहराला महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच हागणदारीमुक्त घोषित केले आहे. शहरात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरात वैयक्तिक शौचालय निर्माण करण्यासाठी २४ हजार २८४ अर्ज प्राप्त झाले होते. त्याची छाननी झाल्यानंतर १३४३० पात्र लाभार्थ्यांसाठी नागपूर महानगरपालिकेकडून वैयक्तिक शौचालय निर्माण करण्यात आले आहे.  शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये ९९ सामूहिक शौचालयाचे निर्माण  करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त शहरात ६८ सार्वजनिक शौचालयाचे निर्माण झाले असून पाच शौचालयाचे कार्य प्रगतीपथावर आहे. वदर्ळीच्या जागी हे शौचालये निर्माण करण्यात आले आहे. यामध्ये नेताजी मार्केट, बुधवार बाजार, गोकुळपेठ, भाजीमंडई, फुले बाजार, मेहाडिया चौक याठिकाणी सुलभ शौचालयाचे निर्माण करण्यात आले आहे. शहरात सार्वजनिक शौचालयाचे नियंत्रण हे सुलभ शौचालय प्रकल्पाअंतर्गत करण्यात येत आहे. सामूहिक शौचालयाची स्वच्छता ब्रिस्क या कंपनीकडे आहे.

जुन्या शौचालयांचे नूतनीकरणसुद्धा करण्यात येणार असून यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.शहर हागणदारीमुक्त शहराच्या पलिकडे जाण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेची वाटचाल करित आहे. या शौचालयाच्या निर्मितीमुळे गरीब कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

कचरा वर्गीकरण करूनच संकलित करावा

शहरातील कचरा ओला आणि सुका असे वर्गीकरण करून नागरिकांनी द्यावा. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणे सुरू आहे. सुका कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण आवश्यक असून ओला आणि सुका कचरा स्वतंत्र द्यावा, असे आवाहन आरोग्य अधिकारी (स्वच्छता)डॉ. सुनील कांबळे, स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी केले आहे. कचऱ्याचे वर्गीकरण झाले तर, कचरा डेपोमध्ये कचऱ्याचे ढीग वाढणार नाही. कचरा डेपोमध्ये कचरा साठल्याने मिथेन गॅस निर्माण तयार होतो. कचऱ्याला आग लागते व धूर पसरतो. यामुळे प्रदूषण वाढते. कचरा वर्गीकृत केल्याने कचऱ्याची लगेच विल्हेवाट लागेल व प्रदूषण वाढणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

स्वच्छता ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन

शहरातील स्वच्छतेसंदर्भात कुठलीही तक्रार करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत  स्वच्छता ॲप तयार केलेली आहे. या ॲपवर तक्रार केली तर १२ तासात तक्रार सोडविण्यात येईल. नागरिकांनी ही ॲप जास्तीत जास्त संख्येने डाऊनलोड करावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे. ‘स्वच्छ मंच’ या पोर्टलवर आपल्या संस्थेचे व वैयक्तिक पर्यावरणाशी संबंधित कार्य व त्याचे फोटो अपलोड करू शकता, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या