या मेळाव्यात येणा-या जिल्हा परिषद,महानगरपालिका,नगर पंचायत इत्यादी निवडणूकीत पक्षातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना निवडणूकीच्या तयारी संदर्भात पक्षाचे शीर्षस्थ नेत हे मार्गदर्शन करतील.बूथ पदाधिकारी यांना देखील मार्गदर्शन केले जाईल यामध्ये राज्यातील महायुती सरकारमधील तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याद्वारे जनकल्याणकारी योजना राबविण्यात येणा-या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी.
याशिवाय सभासद मोहिमेच्या संदर्भात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा या मेळाव्यात घेण्यात येईल. सभासद मोहीमेत आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून विदर्भात अनेक जिल्ह्यात इतर पक्षाचे दमदार पदाधिकारी आमच्या संपर्कात असून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश‘इनकमिंग‘होण्याचे संकेत याप्रसंगी जैन यांनी दिले.शुक्रवार दिनांक २३ तारखेला पार पडणा-या मेळाव्यात देखील काही दमदार राजकीय पदाधिकारी हे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
शुक्रवार, दि. २३ मे रोजी सकाळी ११.०० ते सायं. ५.०० वा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष,कार्याध्यक्ष, महिला, युवक, विद्यार्थी, युवती, सामाजिक न्याय, ओबीसी व अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष तसेच आजी व माजी खासदार आमदार, प्रदेश पदाधिकारी व प्रमुख पदाधिकारी यांचा मेळावा “परवाना भवन नागपूर” येथे आयोजित करण्यात आलेला असल्याची माहिती नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी दिली.
या मेळाव्यास प्रफुल पटेल मार्गदर्शन करणार आहेत. येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करनार असल्याचे सांगून शाहु , फुले, आंबेडकर यांच्या आदर्शावर चालणा-या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विदर्भात वाढती ताकद , प्रफुल पटेल यांचा विदर्भातील जनसंपर्क, कार्यकर्त्यांच्या भेटी, तसेच राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा सातत्याने होत असलेला विदर्भ दौरा, या मुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन, जनतेचा कौल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने झालेला असून ,पक्षाची ताकद कांग्रेसच्या तुलनेत अधिकच जास्त बळकट झालेली आहे आणी जनता सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजुने असल्याचा दावा याप्रसंगी प्रशांत पवार यांनी केला.
येणाऱ्या महानगरपालिका निवडणूका , नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज असून जास्तीत जास्त उमेदवार रिंगणात उतरवले जाईल,असे राजेंद्र जैन म्हणाले.मेळावा संपल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यास प्रत्येकी अर्धा तासाचा वेळ चर्चेसाठी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या मेळाव्यास आमदार व माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम, आ.राजकुमार बडोले, आमदार राजू कारेमोरे, आ.संजय खोडके, आ.सुलभा खोडके, आ.अमोल मिटकरी, आ. मनोज देवानंद कायंदे व माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित राहणार आहेत.तसेच प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर , प्रदेश सरचिटणीस राजेश माटे,महिला अध्यक्षा सुनिता येरने, नागपूर शहर युवक अध्यक्ष विशाल खांडेकर,ओबीसी विभाग नागपूर शहर अध्यक्ष सुखदेव वंजारी, नागपूर शहर विद्यार्थी अध्यक्ष विश्वजीत तिवारी,मध्य नागपूर विधानसभा अध्यक्ष रवि पराते , दक्षिण-पश्चिमचे अध्यक्ष संदीप सावरकर, उत्तर विधानसभा अध्यक्ष राकेश बोरिकर, पश्चिम विधानसभा अध्यक्ष समीर रहाटे, पूर्व विधानसभा अध्यक्ष अमरीश ढोरे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष अरविंद भाजीपाले, सामाजिक न्याय अध्यक्ष कपिल मेश्राम, व्यापारी आघाडी अध्यक्ष आशिष मतदान , अल्पसंख्याक अध्यक्ष मुनाफ बंदुकिया उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेत माजी आमदार व विदर्भ निरीक्षक राजेन्द्र जैन ,शहराध्यक्ष प्रशांत पवार,जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा)गुजर, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवनकर आदी उपस्थित होते.