फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपूर मनपाच्या ११५३७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

नागपूर मनपाच्या ११५३७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

Advertisements

मनपा कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण: पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रयत्नांना अखेर यश

नागपूर दिनांक ८ डिसेंबर: नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर आज महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत आयुक्त नागपूर महानगरपालिका यांना आदेश निर्गमित केले.
भाजपाच्या नेतृत्वाखालील नागपूर मनपाने फेब्रुवारी महिन्यात मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देणे शक्य नसल्याचे राज्य सरकारला कळविले होते मात्र पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारताच डॉ. नितीन राऊत हे खंबीरपणे मनपा अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहत वारंवार महाविकास आघाडीकडे पाठपुरावा करीत होते. डॉ.नितीन राऊत यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचेशी चर्चा विनिमय करून मा.मुख्यमंत्री महोदयांना भेटले. त्यानुसार २५ नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत वेतन आयोग लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आणि आज अखेर नगर विकास विभागाने सुधारित वेतनश्रेणी १ जानेवारी २०१६ आणि प्रत्यक्ष वेतन १ सप्टेंबर २०१६ पासून देय असल्याच्या आशयाचे आदेश निर्गमित केले.

पालकमंत्री यांचा सिंहाचा वाटा-
नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे सुरुवातीपासूनच या निर्णयासाठी प्रयत्नशील होते. महाविकास आघाडी सरकारकडे वारंवार पाठपुरावा करीत होते.

अश्या घडल्या घडामोडी-
आज दिनांक ८ डिसेंबर रोजी पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी नगरविकास मंत्री यांची भेट घेतली. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार आदेश जारी करण्याबाबत उभयतांमध्ये चर्चा झाली आणि तात्काळ नगर विकास विभागाचे उप सचिव यांच्या स्वाक्षरीने आदेश काढण्यात आले. नंतर पालकमंत्री आणि नगर विकास मंत्री यांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली असता त्यांनी उभयतांचे अभिनंदन केले.

राज्य शासनाने त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना नियत काळाप्रमाणे २०१६ मध्येच सातवा वेतन आयोग लागू केला होता मात्र नगर विकास विभागाने याबाबत निर्णय न घेतल्यामुळे नागपूर महानगर पालिकेचे कर्मचारी यापासून वंचित राहिले होते. अश्यातच मनपातील भाजप प्रणित सत्ताधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात अधिकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे शक्य नसल्याचे राज्य शासनाला कळविल्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. वेळप्रसंगी आंदोलनेही उभी राहिली होती. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सातवा वेतन आयोग लागू करणार असा त्यांना विश्वास दिला होता तो त्यांनी सार्थ ठरविला.
आज आदेश निर्गमित करण्याच्या प्रसंगीं डॉ. नितीन राऊत आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह तानाजी वनवे विरोधी पक्षनेता मनपा तथा नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, सुरेंद्र टिंगने मनपा संघटना पदाधिकारी, कृष्णकुमार पांडे काँग्रेस सेवादल पदाधिकारी, ईश्वर मेश्राम पदाधिकारी मनपा कर्मचारी संघटना, प्रवीण तंत्रपाळे मनपा कर्मचारी रंजन नलोडे मनपा कर्मचारी, बाबा श्रीखंडे, अरुण तुरकेला, विनोद राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.

या निर्णयामुळे मनपा कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून मुख्यमंत्र्यानी मनपा अधिकारी-कर्मचाऱ्याचे अभिनंदन केले. अखेर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रयत्नांना भरीव यश आले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या