फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपूर बससेवा तातडीने सुरु करा:आ.विकास ठाकरे यांचे मनपा आयुक्तांना पत्र

नागपूर बससेवा तातडीने सुरु करा:आ.विकास ठाकरे यांचे मनपा आयुक्तांना पत्र

Advertisements

नागपूर,ता. १९ ऑक्टोबर: शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याचे कार्य नागपूर महानगरपालिका करीत असते,या पैकी शहर बससेवा ही सुद्धा नागपूर शहरातील अत्यंत महत्वाची सेवा असून शहरातील नागरिकांना बससेवा पुरविणे अत्यंत गरजेचे आहे. त्याबाबत भारतीय संविधानाच्या आर्टिकल कलम २४३/डब्ल्यू तसेच मुंबई म्यून्सिपल कॉरपोरेशन एक्टमध्ये सविस्तर माहिती दिली आहे.

परंतू,मागील सात महीन्यांपासून मनपा प्रशासनाने बससेवा बंद ठेवली असून ‘आपली बस’सेवा अंतर्गत कार्यरत चालक, वाहक व अन्य कर्मचारी असे अंदाजे ३०० कर्मचारी माहे मार्च २०२० पासून बेरोजगार अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट ओढवले असून उपासमारीची वेळ आली असल्याचे पत्र काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना लिहले.

जागतिक आरोग्य संघटना तसेच आरोग्य मंत्रालय व कुटुंब कल्याण विभाग यांच्या निर्देशानुसार १.८ मिटर अंतर ठेउन सर्व सेवा सुरु करता येईल,असे सूचविण्यात आले आहे,त्यानुसार बससेवेत नियमांचे पालन करुन बससेवा सुरु करता येईल,असे आ.विकास ठाकरे यांनी पत्रात नमूद केले.

राज्यातील अनेक मुख्य शहरामधील बससेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच खासगी वाहतूक सेवा व दिशानिर्देशनुसार, अटी व शर्थींच्या अधीन राहून सुरु करण्यात आलेली आहे,महाराष्ट्र राज्य परिवाहन विभागातील बससेवासुद्धा पूर्णपणे सुरु करण्यात आली आहे.

परंतू मागील सात महिन्यांपासून नागपूर शहरातील शहर बस सेवा संपूर्णत:बंद असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा आर्थिक भुर्दंड भरावा लागत असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले.नागपूर शहरातील सर्व सेवा सुरु झाल्यामुळे नागरिकांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे,त्यामुळे रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहेत. काही नागरिकांजवळ वाहनांची पूर्तता नसल्यामुळे नाईलाजस्तवाने घरी बसावे लागत आहे. त्यातच वाढत्या पेट्रोलचे दर लक्ष्ात घेता दूचाकी वापरणेही अवघड झाले आहे, शहर बस सेवा बंद असल्यामुळे याचा सर्वात मोठा फटका महीलांना सोसावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

नागपूर शहरातील अनेक हे नागरिक बुटीबोरी,हिंगणा तसेच कळमेश्‍वरसारख्या औद्योगिक क्ष्ेत्रामध्ये कामावर आहेत. कारखानाधारकांनी त्यांचे वेतन आधीच कमी केलेले आहे. त्यातच शहर बस सेवा सुरु नसल्याने त्यांना ऑटारिक्क्ष्ासारख्या खासगी वाहनांचा वापर करावा लागत असून प्रवासा करिता अधिकचे पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेला कामागार वर्ग आर्थिक अडचणीत येऊन त्याच्या पुढे परिवाराच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झालेला आहे.

त्यातच नागपूर शहर बस सेवा अद्याप सुरु करण्यात आलेली नसून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार महानगरपालिका प्रशासनकडून होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

नागपूर शहरातील बससेवा सुरु नसल्याने होत असलेल्या हाल-अपेष्टांची गांर्भीयाने दखल घेऊन नागपूर बससेवा तातडीने सुरु करण्यात यावी,अशी मागणी ठाकरे यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना लिहलेल्या पत्रात केली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या