फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमनागपूर पोलिसांची अशीही माणूसकी...

नागपूर पोलिसांची अशीही माणूसकी…

Advertisements


आज्जीबाईच्या घरातले काढले पाणी

नागपूर,ता.१९ जून: खाकी वर्दीतील पोलिसांची प्रतिमा ही जनसामान्यात फारशी चांगली नाही. पोलिस म्हटले की भ्रष्टाचाराने बरबरटलेली सनदी नोकरशाही ही प्रतिमा जनसामान्यांच्या मनात ठासून भरली आहे अर्थात अशी प्रतिमा निर्माण होण्यास काही पोलिसांचा कारभारच कारणीभूत असतो. असे असले तरी पोलिस विभागात एकूणएक व्यक्ती ही भ्रष्ट असते असे नाही त्यात अनेक खाकी वर्दीतील माणसे ही माणूसकी जपणारी ही असतात , वेळप्रसंगी ते असहाय व गरजूंना मदत करण्यास ही कुचराई करीत नाही. याचाच प्रत्यय आज नागपूरातील शांतीनगर भागात आला.

पावसाळ्याचे दिवस असल्याने दररोज पाऊस पडत असतो. पावसाचे पाणी कवेलुच्या घरात घुसून पूर्ण घरच या भागातील एका ७० वर्षीय आजीबाईचे पूर सदृश्य झाले होते. घरात पुरुष मंडळी कोणीच राहत नसल्याने पावसाच्या पाण्यापासून संरक्षण कसे करावे हे त्या आज्जीला सुचलेच नाही. पाऊस थांबे पर्यंत ती तशीच विवंचनेत अडकून राहिली. पाऊस थांबल्या नंतर शांतिनगर येथील ही ७० वर्षीय आजीबाई घरातील पाणी काढू लागली .

ही माहिती डीसीपी झोन ३ चे लोहित मतानी आणि शांतिनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जामदार व स्टाफ यांना, शांतिनगर हद्दीत रूट मार्च करताना कळली. माणुसकीच्या नात्याने आज्जीबाईच्या घरातून पाणी काढण्यास त्यांनी मदत केली आणि आज्जीबाईच्या घरावर ताडपत्री बांधून देण्यात आली.

आज्जीबाई नर्मदा बावणकुळे या घरात एकट्याच राहतात. तिची दोन्ही मुले मरण पावली असल्याने व आयुष्याचा जोडीदार ४० वर्षांपूर्वीच त्यांना सोडून गेल्याने तिला मदतीसाठी कोणी नव्हते असे माहितीतून कळले.नागपूर पोलिसांचे हे कार्य ‘सज्जानांचे रक्ष् ण व दूर्जनांचे निर्दालन’या कृतीत व उक्तीत मोडणाराच ठरला. पोलिसांच्या या माणूसकीची दखल आज या परिसरात चर्चेचा विषय ठरला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या