फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपूर नाट्य परिषदेत नाटकांचे एकूण किती अंक?

नागपूर नाट्य परिषदेत नाटकांचे एकूण किती अंक?

Advertisements

नागपूरात पार पडलेल्या ९९ व्या नाट्य संमेलनाचे पैसेही अद्याप अनेकांना मिळालेच नाही!

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता ७ ऑक्टोबर: शहरातील नाट्य परिषद ही शाखा कलावंतांची मातृशाखा समजली जाते.अनेक ज्येष्ठ नाट्य कलावंत यांच्या भावना व संवेदना खोलवर या संस्थेशी जुळलेल्या आहेत मात्र गेल्या पंधरा वर्षांपासून ’मीपणाचा’जो अभिशाप या परिषदेला लागला आहे त्यामुळे नागपूर शहरातील सांस्कृतिक चळवळ ही साचलेल्या पाण्याप्रमाणे गढूळ झालेली आढळून येते. शहरात आजही अनेक गुणी नाट्य कलावंत आहेत,कुशल संघटक आहेत मात्र ते या नाट्य परिषदेच्या सांगण्याप्रमाणे चालणारे नाहीत त्यामुळे परिषदेमधील पदाधिका-यांना देखील ते चालत नाहीत,परिणामी याचे सर्वाधिक नुकसान हे नागपूरातील नाट्य चळवळीचेच झालेले आहे,असे म्हणावे लागेल.

विशेष म्हणजे या नाट्य परिषदेची निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी पार पडली,आतापर्यंत एक ही बैठक न घेता निवडणूकीचा अजेंडा ठरला कधी,कोणत्या वृत्तपत्रात जाहीराती निघाल्या,किती उमेदवारांनी अर्ज भरले?नाट्य परिषदेच्या किती सभासदांनी मतदान केले?या विषयी जरी नाट्य परिषदेचे ‘पदसिद्ध’१९ पदाधिकारी बोलायला तयार नसले तरी शहरातील नाट्य कलावंतांमध्ये याविषयी बरीच ‘खदखद’ आहे.
मध्यवर्तीच्या घटनेप्रमाणे, लोकशाही मार्गाने नागपूरात ही निवडणूक यंदाही पार पडलीच नाही,महत्वाचे म्हणजे या नाट्य परिषदेचा हजारो कलावंत जुळलेले असलेला ‘ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर ’ हा व्हाॅट्स ॲप ग्रूप आहे,या ग्रूपवर देखील निवडणूकीची माहिती टाकण्यात आली नाही!या ग्रूपवर हेच पदाधिकारी मात्र गुड मार्निंग ते गूड नाईट व इतर थिल्लर जोक्स पोस्ट करण्यास विसरत नाही मात्र,एवढी महत्वाची माहितीच टाकण्याचा विसर पडतो?याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

(छायाचित्र- आमसभा????)

या निवडणूकीची जाहीरात नागपूरात ज्याचा सर्वाधिक कमी खप आहे अश्‍या लहानश्‍या वृत्तपत्रात देण्यात आली! मध्यवर्तीच्या घटनेप्रमाणे शहरातील सर्वाधिक खप असणा-या वृत्तपत्रात अशी जाहीरात प्रसिद्ध करणे बंधनकारक होते.याहून कळस म्हणजे या परिषदेच्या या पदाधिका-यांना ’जे जे लोकं पाहिजे होते,त्यांनाच आपल्या घरी अर्ज भरायला बोलावून घेण्यात आले!’एका पदाधिका-याने तर आपली बायको,बहीण-जावई,सख्खी बहीण आणि स्वत:चा वाहन चालक यांच्याच नावाचे पाच अर्ज भरले!

आधीचे १९ व हे पाच अशी २४ नावे झालीत,यानंतर हे पाच अर्ज बाद करण्यात आल्याचा देखावा करण्यात आला, पुन्हा हीच १९ मंडळी पदाधिकारी पदावर कायम!अध्यक्ष् पदी प्रफूल्ल फरकासे,उपाध्यक्ष् पदी शेखर सावरबांधे………..!

घटनेप्रमाणे परिषदेची बैठक होणे बंधनकारक होते.या बैठकीत निवडणूक अधिकारीची निवड करणे गरजेचे होते. यानंतर सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्रात निवडणूकीची जाहीरात देणे क्रमप्राप्त होते,येणारे अर्ज,त्याची छानणी,मतदान,मतमोजणी ही संपूर्ण लोकशाहीची निवडणूक प्रक्रियाच डावलून गेल्या अनेक दशकांपासून ‘पदसिद्ध’असणारेच पुन्हा ‘पुर्नस्थापित’झालेत! विशेष म्हणजे परिषदेची जी आमसभा पार पडली त्यातही फक्त पाचच सदस्य उपस्थित होते!ते ही ज्यांना बोलवण्यात आले होते,तेच हजर राहीले,आमसभेची याहून क्रूर थट्टा होऊच शकत नाही,असा संताप देखील व्यक्त करण्यात आला.

नाटकाचा दूसरा अंक ’पैसा गेला कुठे?’
गेल्या वर्षी २२,२३ व २४ फेब्रुवारी २०१९ मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचे ९९ वे संमेलन नागपूरात भट सभागृह तसेच रेशीम बाग मैदानावर पडले.या ९९ व्या नाट्यसंमेलनातील अनेक कलावंतांचे,नेपथ्यकारांचे,दिंडी प्रमुख,बॅण्डवाले अनेकांचे पैसे आजतागत देण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती ’सत्ताधीश’ला मिळाली.याचा पुरावा म्हणजे त्या व्हॉटस ग्रूपमधील चॅट्स,ज्यात वारंवार पैशांची मागणी या कलावंतांनी केली आहे.

या कलवतांनी याबाबतची तक्रार मध्यवर्तीकडे केली असता,नागपूरातील नाट्य परिषदेने २१ ऑगस्ट २०२० रोजी मध्यवर्तीला कळवले,सर्वांचे पैसे देण्यात आले आहे! संमेलन हे मध्यवर्तीचे असते.नागपूरातील नाट्य परिषद ही शाखा फक्त आयोजक होती,तरीही हे कलावंत पैसे मिळाली नसल्याची तक्रार वारंवार मध्यवर्तीकडे करत असेल तर मध्यवर्तीला मध्यस्थी करणे क्रमप्राप्त आहे.
मात्र यात ही नाटकात ‘राजकारण’हे आलेच,विदर्भातील निवडून आलेल्या सात नाट्यकर्मींच्या भरवश्‍यावर मध्यवर्तीतील पदाधिका-यांना आपली सीट तिथे साबूत ठेवायची असल्यानेच त्यांनी नागपूरातील या कलावंतांच्या ’न्याय’ तक्ररीकडे चक्क दूर्लक्ष् केल्याचे सांगितले जात आहे.मध्यवर्तीच्या या भूमिकेमुळे भरडला गेला तो खरा कलावंत!गेल्या पंधरा वर्षांपासून या १९ पदाधिका-यांची ‘घरगूती’संस्था झालेल्या या नाट्य परिषदेचा ख-या रंगकर्मींना कोणता फायदा झाला?असा गहन प्रश्‍न आता रंगकर्मींना पडला आहे.नटेश्‍वरांकडे ते एकच प्रार्थना करत आहे ’हे नटेश्‍वरा यांना एक तर बुद्धि दे किवा यांना आता बाजूला कर!’

या परिषदेतर्फे कोणताही उपक्रम राबविला जात असल्यास फक्त ’पाच’पदाधिकारी व त्यांचे संपूर्ण कुटुंबिय त्यात सहभागी होतात,उपक्रम संपला की हॉटेलमध्ये जेवण,संपला कार्यक्रम!

नाटकाचा तिसरा अंक-’सुपर फ्लॉप ९९ वे नाट्य संमेलन’
९९ वे अ.भा.मराठी नाट्य संमेलन हे मोठा गाजावाजा करुन नागपूरात भरवण्यात आले. नागपूरकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण वैदर्भियांसाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब होती.मात्र पहील्याच दिवशी संमेलनाध्यक्ष् असणारे प्रेमानंद गज्वी यांच्या प्रदीर्घ व जातिवाचक भाषणानंतर संमेलनाचा फज्जा उडणार हे लक्ष्ात आले. नाट्य संमेलनाला पुणे-मुंबईहून अनेक कलावंत आले होते. याशिवाय अश्‍या संमेलनात सुजाण प्रेक्ष् क वर्ग येत असतो,त्यांना फक्त कलेविषयी आस्था असते मात्र अश्‍या भाषणानंतर काहीच वेळात अर्धे रेशीम बाग मैदान हे रिकामे झाले होते.

गिरीश गांधी यांचा आग्रह होता,नागपूरात संमेलन होत असल्याने संमेलनाध्यक्ष् हे विदर्भातीलच राहतील.नियामक मंडळात गज्वी यांच्या नावाला प्रचंड विरोध झाला होता मात्र मध्यवर्तीचे अध्यक्ष् कांबळी यांनी मतदान घेण्याचे टाळले. नागपूरातील भूषणावह नाव म्हणजे महेश एलकूंचवार,यांना स्वागताध्यक्ष् बनविण्यात आले. मात्र तरी देखील पहील्याच दिवशी संमेलनाचा जो सूर बेसूर झाला तो अखेरपर्यंत गवसलाच नाही,त्यावेळी वृत्तपत्रांतील मथळे देखील हेच होते ‘उद् घाटनाला सूर गवसलाच नाही!’

या संमेलनापासून केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील समारोपाच्या दिवशी फारकत घेतली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: नागपूरकर असून देखील संमेलान स्थळी फिरकलेच नाहीत!समारोपाच्या दिवशी रेशीम बाग मैदानात अवघे साढे तीनशे प्रेक्ष् क देखील नव्हते! गडकरी यांचा ताफा रेशीम बाग समोरुन सक्कदराला गेला मात्र रेशीम बागेत थांबला नाही,यातच सगळं आलं….!

पुण्याच्या कलावंतांची ही मार्मिक प्रतिक्रिया होती ’नागपूर १० वर्षे मागे गेला!’तीन दिवस संमेलन म्हणजे फक्त औपचारिकता उरली होती,पहील्याच दिवशी मनपातील अनेक सत्ताधा-यांनी या संमेलनातून आपले अंग काढून घेतले होते. या संमेलनासाठी मनपातर्फे सव्वाशे कोटी रुपये देण्यात आले होते,याशिवाय मध्यवर्तीकडून ४७ लाख रुपये नागपूर नाट्य परिषदेला प्राप्त झाले होते,याशिवाय भीष्म पितामह म्हणून ओळख असणारे गिरीश गांधी यांनी देखील लाखोंची देणगी उभारली होती,तरी देखील हा संपूर्ण पैसा गेला कुठे?या संमेलनाचा पैसा अद्याप नेपथ्यकार,.िंदंडी मालक,बॅण्डवाले यांना मिळालाच नाही तर परिषदेचे अध्यक्ष् प्रफूल्ल फरकासे जे स्वत: मनपामध्ये ‘ऑफिसर ऑन स्पेशल डयूटी’(ओएसडी)होते व मनपातून सव्वाशे कोटी संमेलनाला प्राप्त झाले होते,त्यांनीच उत्तर द्यावे,संमेलनाचा पैसा गेला कुठे?असा सवाल शहरातील अनेक रंगकर्मी आता करीत आहेत.

महापौर नंदा जिचकार यांच्यावर प्रेक्ष् कांनी ओढले ताशेरे!

गडकरी समारोपाला येणार असल्याची आशा गिरीश गांधी यांना शेवटपर्यंत होती,परिणामी समारोपाच्या भाषणासाठी उभ्या झालेल्या तत्कालीन महापौर नंदा जिचकार या बोलायला उभ्या झाल्या मात्र गिरीश गांधी यांनी त्यांना सूचना केली,वेळ निभावून न्या,बोलत रहा..परिणामी वेळेवर त्यांना जे सूचलं त्या ते बोलत राहील्या,याचा फार वाईट परिणाम त्या अल्प संख्येत उपस्थित प्रेक्ष् कांवर झाला.प्रेक्षकांमध्ये चुळबुळ सुरु झाली. या किती वेळ असंच असंबध बोलणार?किती वेळ यांना झेलणार?अशी संतप्त प्रतिक्रिया प्रेक्ष् कांकडून येऊ लागल्या,शेवटी त्यांनी जोरजोरात टाळ्या वाजवायला सुरवात केली,अखेर गिरीश गांधी यांनी त्यांना भाषण समाप्तीचा निरोप दिला…मात्र जो काही परिणाम व्हायचा होता तो होऊन चूकला होता,समारोपानंतर गांधी हे संमेलन स्थळावर क्ष् णभर ही न थांबता केंद्रियम मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीत बसून निघून गेलेत…!पुण्या-मुंबईहून जे १६ कलावंत समारोपासाठी उपस्थित होते ते देखील यानंतर संमेलन स्थळी जेवलेच नाहीत….!

नाटकाचा ४ था अंक-’धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार’

मध्यवर्तीने लॉक डाऊनच्या काळात १ कोटी २० लाख रुपये हे संपूर्ण राज्यातील शाखांना वाटप केल्याचे सांगितले जात आहे.यात ५० लाख मध्यवर्तीचे ४० लाख राष्ट्रवादी सांस्कृतिक शाखेने तर उरलेले पैसे इतर शाखांमधून जमा करण्यात आले होते. हा संपूर्ण पैसा राज्यातील नेमक्या कोणकोणत्या शाखेला, कोणकोणत्या रंगकर्मींना वाटप करण्यात आला,याची माहिती धर्मादाय आयुक्तांनी घ्यावी,अशी तक्रार करण्यात आली होती.

नागपूरातही नाट्य परिषदेला १० हौंशी रंगकर्मींसाठी रुपये प्राप्त झाले होते मात्र प्रत्येकी अडीच हजार रुपयांची मदत यावेळी देखील ‘ख-या गरजूंनाच’ मिळाली ते म्हणजे…बायको,बहीण-जावई, सख्खी बहीण,वाहन चालक…!’असे उपहासाने चर्चिल्या जात आहे.

आणखी एक बाब म्हणजे नाट्यकर्मी देवेंद्र दोडके व संजय भाकरे यांनी देखील घरोघरी जाऊन रंगकर्मींसाठी देणग्या गोळा केल्या मात्र मदत नेमकी दिली कुणाला?हे पत्र परिषद घेऊन सांगणार होते,आजपर्यंत ही पत्र परिषद पार पडली नाही!

भरत जाधव यांचा मोठेपणा-
या सर्व नाटकांच्या अंकामध्ये डोळ्यात भरला तो मात्र सुप्रसिद्ध कलावंत भरत जाधव यांच्या मनाचा मोठेपणा. त्यांचा रात्री ११ वा. भट सभागृहात ’सही रे सही’प्रयोग हा हाऊस फूल्ल गेला मात्र त्यांच्या सहकलाकरांसाठी नाटकापूर्वी कोणतीही व्यवस्था परिषदेच्या पदाधिका-यांनी करुन ठेवलीच नाही,यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय झाली होती,याविषयी भरत जाधव यांनी उघडपणे आपली नाराजी माध्यमांकडे व्यक्त केली होती,यानंतर पदाधिकारी यांनी माफी मागितली असता,त्यांनी पुन्हा हा विषय कधीही चर्चिला नाही,फार मोठ्या कलावंताची हीच खरी ओळख असते.

नाटकाचा शेवटचा अंक-नरेश गडेकर यांचा ना ‘राजीनामा’-
नागपूरातील परिषदेचे प्रमुख कार्यवाह असणारे नरेश गडेकर यांनी आपल्या पदाचा ७ मार्च रोजी राजीनामा दिला. मात्र संजय रहाटे, प्रफूल्ल फरकासे, प्रमोद भुसारी आदी विभूती यांनी अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही.नाट्य परिषदेचे पदसिद्ध पदाधिका-यांना ९९ व्या नाट्य संमेलनातील खर्चाचा हिशेब देणे गडेकर यांच्याशिवाय शक्य नसल्याने तो राजीनामा स्वीकारल्या जाणार ही नसल्याचे रंगकर्मी सांगतात.

शेवटी नागपूरातील रंगभूमीची ‘दयनीय दशा’ जर पुढील काळात सुधारायची असेल तर वर्षानुवर्षे कुंडली मांडून बसलेल्या या मंडळींची उचलबांगडी होणे गरजेचे असल्याचे अनेक रंगकर्मी सांगतात.यासाठी मतदार यादीतील घोळ आधी सुधारावा लागेल. या पदाधिका-यांनी दहा हजार मतदार हे आपले भाजीवाले,कामवाली बाई,घराजवळील लॉन्ड्रीवाला अश्‍या लोकांना बनवले असल्याचे सत्य मांडले जात आहे. मागे मध्यवर्तीसाठी नागपूरातून तीन रंगकर्मी निवडून गेले त्यासाठी संपूर्ण जाेर गिरीश गांधी यांनी कसा लावला होता,याच्या अनेक सुरस कथा अद्यापही रंगकर्मीमध्ये उत्साहाने चर्चिला जाताे,नंदनवनच्या महीला महाविद्यालयात गिरीश गांधी या निवडणूकीसाठी या वयातही भर उन्हास पाच तास बसले होते…..!

खरा व सुजाण प्रेक्ष् क हा जोपर्यंत नागपूरातील नाट्य परिषदेचा मतदार होणार नाही तोपर्यंत नागपूरची रंगभूमी ही अशीच उपेक्ष्ति व दयनीय राहणार अशी व्यथा काही रंगकर्मी व्यक्त करतात…..!विशेष म्हणजे हे मतदार बनवणे,अर्ज स्वीकारणे, हा अधिकार देखील याच ५ जणांच्या कंपूच्या अधिकार क्ष्ेत्रात असल्यामुळे रंगभूमीची दशा पुढील अनेक दशके सुधारणार नाही….अशी निराशा देखील व्यक्त केली जात आहे..!

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या