फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपूर जिल्ह्याला मिळणार आता २९९ कोटी:फडणवीस सरकारने केलेल्या तरतूदीत निम्मी कपात

नागपूर जिल्ह्याला मिळणार आता २९९ कोटी:फडणवीस सरकारने केलेल्या तरतूदीत निम्मी कपात

Advertisements

 

 

फडवीस यांनी पाच वर्षात विदर्भाचा बॅकलॉग भरुन काढला: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मत

नागपूर: फडणवीस सरकार हे जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांनी नियमाबाहेर नागपूर,चंद्रपूर तसेच रत्नागिरी जिल्ह्यासाठी निधीची तरतूद केली .एकट्या नागपूर जिल्ह्यासाठी फडणवीस सरकारच्या काळात ५२५ कोटींचा निधी देण्यात आला,हा निधी, निधी वाटपाच्या ठरलेल्या सूत्रानुसार फक्त २८८ कोटी एवढाच प्राप्त होणार होता अशी माहिती मंगळवार दि. २८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्र-परिषदेत दिली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात विदर्भाचा बॅकलॉक भरुन काढला आहे असेही ते म्हणाले.

. चंद्रपूर जिल्ह्यासाठी २१५ कोटींचे सूत्र ठरले असताना ३७५ कोटी देण्यात आले,१६० कोटींचा जास्तीचा निधी चंद्रपूर जिल्ह्यासाठी खर्च करण्यात आला तर सिंधूदूर्ग जिल्ह्यात सूत्रानुसार ११३ कोटींची तरतूद असताना २२५ कोटींचा निधी देण्यात आला,११२ कोटी सिंधूदूर्ग जिल्ह्याला जास्तीचे देण्यात आले,अशी माहिती अजित पवार यांनी याप्रसंगी दिली. उपमुख्यमंत्री म्हणून मी नागपूर जिल्ह्यासाठी २९९ कोटींची तरतूद केली असून सिंधूदूर्ग जिल्ह्याला ११८ कोटी ६५ लाखांचा तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी २२३ कोटी ६० लाख एवढा निधी देण्याचे ठरवले आहे. निधी हा नियमानुसार नव्हे तर सूत्रानुसार वाटप केला जातो असे त्यांनी सांगितले.

असे असले तरी विदर्भावर अन्याय होऊ देणार नसल्याचे ते म्हणाले. यावर्षीचे अंदाजपत्रक ९ हजार ५०० कोटींचे असून महाराष्ट्रातील सर्वच ३६ जिल्ह्यांचा यात समान वाटा आहे. नागपूर जिल्ह्यांच्या निधी वाटपाबाबत उर्जा मंत्री नितीन राऊत, क्रीडा मंत्री सुनील केदार तसेच गृहमंत्री अनिल देशमुख हे काहीसे नाराज असून आमदार विजय वडेट्टीवार यांनी देखील नारजी व्यक्त केली आहे मात्र निधी वाटपाच्या ठरलेल्या सूत्रानुसारच निधी देण्याचा मी माझ्या पातळीवर निर्णय घेतला असून मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली होणार्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. या तिन्ही मंत्र्यांच्या काही अपेक्ष्ा आहेत यातून काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करु. वेगळ्या पद्धतीने बजेटमध्ये पैसे देऊ असे आश्‍वासन अजित पवार यांनी याप्रसंगी दिले.

शेवटी नागपूर ही ‘उपराजधानी’आहे आणि विदर्भ हा राज्याच भाग आहे. मात्र राज्यातील ३६ जिल्हे डोळ्यासमोर ठेऊन ठरलेल्या सूत्रानुसारच प्रत्येक जिल्ह्याला निधी दिला जाईल.सिंचनासाठी १९ कोटींचा वेगळा निधी ठेवला असल्याची माहिती त्यांनी दिली.आमचे सरकार भेदभाव करणार नाही.मागच्या काळात ९ हजार कोटींचा घोळ झाला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. लोकसंख्येच्या प्रमाणात ३० टक्के निधी,ग्रामीण २० टक्के,शेततळे ३० टक्के तर मानव विकास निर्देशांकसाठी २० टक्के निधी दिला जातो.मात्र मागच्या सरकारने चार जिल्ह्यांचा निधी कमी करुन नागपूर, चंद्रपूर तसेच सिंधूदूर्ग जिल्ह्यात तो निधी वळता केला. सर्व जिल्ह्यांना इतरांच्या बरोबरीने आणणे ही सरकारची जवाबदारी असते.मात्र मागील सरकारने जिल्हा वार्षिक योजनेतील मुंबई व कोकण विभागातील ३७ कोटी,पुणे विभागातील ३१० कोटी,नाशिक जिल्ह्याचे १९६,औरंगाबाद ९१ कोटी कमी करुन एकूण ६५१ कोटी हे नागपूर विभागाकडे वळवून घेतले असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

मुंबई,पालघरचा निधी कमी करुन ११२ कोटी चंदूपरकडे वळता करण्यात आला आणि ११२ कोटी रत्नागिरीकडे वळते केले. फडणवीस हे नागपूरचे असल्यामुळे त्यांनी नागपूर जिल्ह्यासाठी जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला. अर्थमंत्री हे स्वत: चंद्रपूरचे होते तर राज्यमंत्री हे सिंधूदूर्गचे होते,परिणामी या तिन्ही जिल्ह्यात जास्तीचा निधी वळता करण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, सिंधूदूर्गचे आमदार उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त करुन जनतेला काय सांगायचे?गेल्या वेळी एवढा निधी दिला आता एवढा कमी निधी कसा?याचे जनतेला काय उत्तर देणार असे त्यांनी विचारले.याबाबत उद्या होणार्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल,असे ते म्हणाले.त्यांचे म्हणने रास्त असून यातून मार्ग काढावा लागणार असल्याचे ते म्हणाले.बजेट हा शेवटी संपूर्ण राज्याचा असतो. गेल्या वेळी इतर जिल्ह्यांमधून कपात करुन या तीन जिल्ह्यांना जास्तीचा निधी देण्यात आला होता याकडे त्यांनी लक्ष् वेधले.

महात्मा गांधी यांच्या १५० जयंती निमित्त ९५ कोटी-

केंद्रातर्फे महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम राबवले जात आहे त्या धर्तीवर राज्यात देखील ९५ कोटींची तरतूद केली असून आमदार रणजित कांबळे,सुनील केदार यांनी वर्धा जिल्ह्यात कार्यक्रमासाठी निधी देण्याची मागणी केली होती.वर्धा,सेवाग्रामसोबत महात्मा गांधी यांचे जवळचे नाते आहे.

गोंदिया-भंडारा जिल्ह्यात धान साठवण्यासाठी गोडाऊन बांधणार-

छत्तीसगड सरकारने तेथील शेतकर्यांसाठी चांगला उपक्रम राबवला असून गोडाऊन बांधून दिले आहेत त्याच धर्तीवर गाेंदिया-भंडारा जिल्ह्यात धान साठवण्यासाठी गोडाऊन बांधण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.याशिवाय रस्ते, शाळांची पडझड, मनरेगा यासाठी वेगळे पॅकेज देणार असल्याचे ते म्हणाले. पोलिसांच्या वाहनांसाठी देखील एक ते दीड कोटींची तरतूद करण्यात येईल, याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात सकारात्मक काम करणारे यांच्यासाठी जिल्हा किवा तालुकाच्या ठिकाणी घराची तरतूद करण्यासाठी १५ कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकर्यांचे दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करणार-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार शेतकर्यांचे दोन लाखांपर्यंचे कर्ज माफ करण्यात येईल. ३१ मार्च पर्यंत विभागीय आयुक्तालयाच्या मार्फत माहिती गोळा करण्यात येत आहे. मात्र ज्यांचे दोन लाखांपेक्ष्ा जास्त कर्ज आहे तसेच जे शेतकरी आजपर्यंत प्रामाणिकपणे कर्ज फेडत होते त्यांचाही विचार करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. कर्ज मुक्तीची रक्कम यावेळी बँकांना न देता शेतकरी यांच्या ‘कर्ज खात्यामध्ये’ वळती करण्यात येईल. दोन लाखांच्या वर कर्ज असणारे व प्रामाणिकपणे कर्ज फेडणारे यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली असून या समितीचा अहवाल मुख्यमंत्री यांना सोपवण्यात येईल तसेच मंत्री मंडळात याबाबचा निर्णय घेण्यात येईल.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या