Advertisements

पदवीधर निवडणूकीसाठी फक्त १,१०,९५ मतदारांची नोंद
पदवीधरसाठी प्रारुप यादी प्रसिद्ध:विभागीय आयुक्तांची पत्रकार परिषदेत माहिती
नागपूर,ता.३ डिसेंबर २०२५: निवडणूक आयोगाने राज्यातील पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणीचा कार्यक्रम १४ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर केल्यानंतर पदवीधर मतदार नोंदणीसाठी प्रशासन देखील सज्ज झाले मात्र,आज प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १,१०,९५६ पदवीधर मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रारुप यादी अकराही राजकीय पक्षांना सुपुर्द करण्यात आली असून उद्या डिजिटल स्वरुपात या मतदारांची यादी त्यांना दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
विधान परिषदेचे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार काँग्रेसचे ॲड.अभिजित वंजारी यांची मुद्दत ६ डिसेंबर २०२६ मध्ये संपणार आहे.१ नोव्हेंबर २०२५ रोजी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर मतदार नोंदणीची ऑन लाईन व ऑफ लाईन प्रक्रिया सुरु झाली.नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याकरिता कार्यक्रम घोषित करण्यात आला.त्या अनुषंगाने आज प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून,नागपूर जिल्ह्यातील नागपूर,भंडारा,गोंदिया,वर्धा,चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातीतून ऑफ लाईन ९१,६८९ तर ऑन लाईन अर्ज १९,२६७ अर्ज आले आहेत.स्त्री व पुरुष मतदार मिळून एकूण मंजूर अर्जाची संख्या १०७२१५ असून ३७४१ अर्ज नामंजूर करण्यात आले असल्याची माहिती या प्रसंगी विभागीय आयुक्त बिदरी यांनी दिली.६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ११०९५६ अर्ज प्राप्त झाले होते.यात पुरुष ६७३१८ असून स्त्री मतदारांची संख्या ३९८९० एवढी आहे.
नागपूरमध्ये १ ते १३९ मतदान केंद्र असून ६ नोव्हेंबर पर्यंत ३६४१२ अर्ज प्राप्त झाले.यामध्ये १९७४९ पुरुष मतदार असून १५२१३ स्त्री मतदार आहेत.इतर(टी/जी)५ असे एकूण ३४९६७ अर्ज प्राप्त झाले हाेते.यातील १४४५ अर्ज नामंजूर झाले असून एकुण नोंद झालेल्या मतदारांची संख्या ३६,४१२ एवढी आहे.
थोडक्यात,नागपूर शहर तसेच नागपूरातील सहाही जिल्ह्यात पदवीधरांची संख्या फार मोठी असून केवळ ११०९५६ मतदारांची नोंद झाली असून, पुढील कालावधीत पुन्हा मतदानासाठी अर्ज खुले होणार असून मोठ्या संख्येने पदवधीरांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन याप्रसंगी बिदरी यांनी केले.मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया ही निरंतर असून नमुना-१८ हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरुपात स्वीकारले जात आहेत.६ नोव्हेंबर २०२५ नंतर देखील प्राप्त झालेले नमुना-१८ हे पुरवणी स्वरुपात अंतिम मतदार यादीसोबत एकत्रितपणे संलग्न केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पदवीधर मतदाराला काही कारणास्तव प्रत्यक्षात नोंदणी करणे शक्य नसल्यास कुटूंबियांकडून देखील नोंदणी अर्ज स्वीकारले जातील मात्र,पत्ता सारखा हवा,अशी अट असल्याची माहिती त्यांनी दिली.
राजकीय पक्षांनी आजच्या बैठकीत बुटीबोरी,वडसा इत्यादी पदवीधर मतदार केंद्रांबाबत काही सुझाव दिले आहेत,त्यावर देखील विचार केला जाईल,असे त्या म्हणाल्या.
असे आहे कार्यक्रमाचे टप्पे-
६ नोव्हेंबर २०२५ अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत.
हस्तलिखित स्वीकारणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई २८ नाेव्हेंबर २०२५,
प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी ३ डिसेंबर,
दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ३ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२५
दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे ५ जानेवरी २०२६
मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी १२ जानेवरी २०२६
(बातमीशी संबधित व्हिडीयो Sattadheesh official युट्युब चॅनलवर उपलब्ध)
……………………………….
Advertisements

Advertisements

Advertisements
