फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान

Advertisements

मतदान पथके मतदानस्थळी रवाना

नागपुरातून २६ तर रामटेकमधून २८ उमेदवार निवडणूक रिंगणात

मतदानाचा हक्क बजावून ‘मिशन डिस्टिंक्शन’ यशस्वी करण्याचे आवाहन

नागपूर, दि. १८ एप्रिल २०२४: जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी उद्या शुक्रवार दि. १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.नागपूर आणि रामटेक मतदारसंघ मिळून एकूण ४२ लाख ७२ हजार ३६६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी रामटेकमध्ये २४०५ तर नागपूरमध्ये २१०५ मतदान केंद्र असणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून नागपूर आणि रामटेक मतदारसंघात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष दिले जात आहेत.

मतदान केंद्रातील आवश्यक सुविधा व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व जबाबदारी अधिकारी, कर्मचारी समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला आहे.

मतदान केंद्रांवर आवश्यक व्यवस्था-

मतदान केंद्रांवर आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.यात प्राथमिक वैद्यकीय सुविधा, प्रायोगिक तत्वावर टोकन पद्धती, पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा, व्हिलचेअरची व्यवस्था आदी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मिशन डिस्टिंक्शन यशस्वी करण्याचे आवाहन-

जिल्ह्यातील निवडणुकीतील मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी जिल्हा प्रशासनाने मिशन डिस्टिंक्शनचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे मिशन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मतदान करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. इटनकर यांनी केले आहे.

नागपुरातून २६ तर रामटेकमधून २८ उमेदवार निवडणूक रिंगणात-

नागपूर लोकसभा मतदार संघात २६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर रामटेकसाठी २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. १६ मार्च रोजी जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली होती. २० मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. २७ मार्चपर्यंत अर्ज सादर करण्यात आले. २८ मार्च रोजी अर्जांची छाननी करण्यात आली. तर ३० मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्यात  आले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ‘इपिक’सह बारा ओळखपत्र ग्राह्य-

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक२०२४ करीता निवडणूक आयोगाने मतदान करण्यापूर्वी मतदारांची ओळख पटविण्याकरीता मतदान ओळखपत्रासह (EPIC) 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरलेले आहे.

नागपूर आणि रामटेक लोकसभा क्षेत्रात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी स्वतःची ओळख पटविण्याकरीता निवडणूक आयोगाने बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहे. त्यामुळे आता लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदान करतांना मतदारांची ओळख पटविणे शक्य होणार आहेत. या ओळखपत्रात आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक व पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या फोटोसह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, कामगार मंत्रालयाने जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र व राज्य सरकार / पीएसयू / पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्रे, खासदार, आमदार यांना जारी केलेल्या अधिकृत ओळखपत्रांचा समावेश आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येणार नाही. ते आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या