

नागपूरात संक्रमितांची संख्या पोहोचली ५०१ वर
नागपूर,२९ मे: शहरात पहील्यांदाज एकाच कुटुंबातील तब्बल १५ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल प्राप्त झाला आणि या विषाणूच्या संसर्गाच्या तीव्रतेची जाणीव नागपूरकरांना झाली. गेल्या काही तासांमध्येच १५ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एकाच कुटुंबातील १५ सदस्यांना होणारा संसर्ग नागपूरकरांसाठी पहीलेच उदाहरण ठरले आहे. शुक्रवार, २९ मे रोजी दिवसभरात ४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले़. शहरात आता कोरोना बाधितांची संख्या ५०१ वर पोहोचली आहे.
शुक्रवारी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) च्या प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आलेल्या घशातील स्त्रावाच्या नमुन्यांमध्ये ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आलेत. यामध्ये पाचपावली येथील विलगीकरण केंद्रात असणा-या नाईक तलाव बांग्लादेश येथील २३ जणांचा समावेश आहे. यापैकी १५ जण हे एकाच कुटुंबातील सदस्य असल्याने प्रशासनासह नागपूरकरांसाठी ही बाब निश्चितच चिंता वाढविणारी अशी आहे.
याशिवाय मेयोमध्येच प्रसूतीसाठी दाखल झालेली एक गर्भवती महिला व सतरंजीपुरा येथील ३५ वर्षीय पुरुष व ४५, ४४ वर्षीय महिला व आणखी एकाला काेरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आत बुधवारी प्राप्त झाला. यातील नाईक तलाव येथील दोघे मेयो हॉस्पिटलमध्येच गेल्या काही दिवसांपासून संशयित म्हणून दाखल होते. तर मोमीनपु-यातील दोन व आझमशहा चौक येथील दोन रुग्णांचे अहवाल तसेच न्यूरॉन हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा अहवालही पॉझिटिव्ह आढळून आला आहे. न्यूरॉनमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) च्या प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आलेल्या अहवालामध्ये वनामती विलगीकरण केंद्रातील चार बाधितांचा समावेश आहे. यामध्ये २ हावरापेठ व २ वसंतनगर, रविभवन विलगीकररण केंद्रातील ३ बाधितांचा समावेश आहे. यामध्ये सेवासदन ईमारत व आरपीटीएस येथे विलगीकरणात असणा-या एका पोलिस दलातील कोविड योद्ध्याचाही समावेश आहे.
याशिवाय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (निरी) च्या प्रयोगशाळेमध्येही दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यातील एक हंसापुरी तर दुसरा गड्डीगोदाम येथील रहिवासी आहे. तर मेडिकलच्या प्रयोगशाळेत महादुल्यातील एका ३३ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता शहरातील एकूण बाधितांची संख्या ५०१ वर पोहोचली आहे.
विशेष म्हणजे मे महिन्यातच शहरातील संसर्गितांच्या संख्येने पाचशेचा आकडा पार केला. तर कोरोनामुक्त होणा-यांची संख्या ३७५ वर पोहचली आहे.शहरात आता अनेक नव्या भागात कोरोना संसर्गित आढळत असून विलगीकरणातील नागरिकांची संख्या ही देखील दिवसेंदिवस वाढत आहे.
लवकरच ५ वा लॉक डाऊन ब-याच शिथिलतेसह केंद्र व राज्य सरकार हे घोषित करणार आहे. चौथ्या लॉक डाऊनची मुदत ही ३१ मे रोजी संपत आहे.परिणामी लोकांचा वावर हा रस्तयांवर,सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी व बाजारात वाढणार आहे.यामुळे प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली असून विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्याचे पूरेपूर प्रयत्न करुन देखील यावर नियंत्रण मिळवणे मनपा प्रशासनाला चांगलेच जड जात आहे. एका नंतर दूसरे,दुस-यानंतर तिसरे,चौथे व आता पाचव्या लॉक डाऊनला नागपूरकर नागरिक हे सामोरे जाणार आहे. तरीही बाधितांची संख्या ही ५०० पार गेल्याने नागरिकांना लॉक डाऊनमधून सूटकेचा उपाय काही दिसत नाही तर मनपा प्रशासनाला लॉक डाऊनशिवाय इतर कोणताही प्रभावी उपाय सूचत नसल्याने नागपूरकर जनता आता मात्र चांगलीच त्रस्त झाली अाहे.
संसर्गापेक्ष्ाही नागरिकांना आता विलगीकरण केंद्रे व त्या केंद्रातील अपु-या सोयी यांची धास्ती वाटत असल्याचे तथ्य सामोरे आले आहे.
नाईक तलाव-बैरागीपुरा,मेहबूब नगर व संघर्षनगर परिसर सील-
महापालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग क्रमांक ७ मधील नाईक तलाव-बैरागीपुरा व आसीनगर झोनमधील प्रभाग ३ मधील मेहबूबनगर, संघर्षनगर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे हा परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले आहे.
मेहबूबनगर-संघर्षनगर प्रतिबंधित क्ष्ेत्र
दक्ष्णिपश्चिम-टिपू सुलतान चौक
दक्ष्णिपूर्वेस-शिवाजी चौक
पूर्वेस-प्लॉट क्र. ११७,अब्दुल अजीज अंसारी यांचे घर
उत्तरपूर्वेस-एस.एन.के.जी इंजिनिअरिंग वर्क्स
उत्तरपश्चिम-४१६,शेख सलीम यांचे घर
पश्चिमसे-शाही ट्रॅव्हल्स
नाईक तलाव-बैरागीपुरा प्रतिबंधित क्ष्ेत्र-
उत्तरपूर्वेस-रमेश अहिरकर यांचे घर
पूर्वेस- तावडे यांचे घर
पूर्वेस- गीरमाजी सावजे
दक्ष्णिपूर्वेस- मनपा गार्डन
-दक्ष्णिपश्चिमेस-केसरवानी यांचे घर
पश्चिमेस-विनोद माहुरे यांचे घर
उत्तर पश्चिमेस- गोपाल गाते यांचे घर




आमचे चॅनल subscribe करा
