

जनता बेहाल:राजकारण्यांचं ‘राजकारण’मात्र वरचढ
नागपूर,ता. ५ मे: आज जवळपास सर्वच प्रसार व प्रचार माध्यमात महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत‘ड्राईव्ह-इन’लसीकरणातले वृत्त व छायाचित्रे झळकले मात्र महाराष्ट्राच्या उपराजधानीत मात्र लसीकरणाच्या पहील्या तर सोडा दूसरा डोज घेणारे हे नैराश्यतेत मनपाच्या सर्वच केंद्रांवर भटकत असतानाचे दृष्य होते कारण त्यांना लस घेऊन ४५ दिवसांचा काळ उलटला होता.
वेळेवर लस मिळणार नाही तर पहील्या डोजचा देखील उपयोग होणार नसल्याची भीती त्यांच्या मनात बसली असून काहीही करुन त्यांना लसीचा दूसरा डोज घेऊन जीवघेण्या करोना संसर्गापासून आपला व कुटुबियांचा जीव वाचवायचा आहे.
मुंबईत लसीची मुबलक उपलब्धता बघून उपराजधानीतील नागरिकांचे डोळ्यांचे अक्ष् र:पारणे फिटले!मुंबईत अगदी कारमध्ये बसल्या बसल्याच लस टोचली जात आहे नागपूरात मात्र केंद्रांवर रांगा लाऊनसुद्धा लस मिळाली नाही.

उपराजधानीसोबत हा दूजाभाव ठाकरे सरकार का करीत आहे?याचे कोडे नागपूरकरांना पडले असून लसीत देखील ’आपले-तुमचे’या राजकारणाप्रति संताप व्यक्त केला जात आहे.आज देखील राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडून १५ लाख लस उपलब्ध झाल्या असल्याची माहिती दिली,प्रश्न हा आहे या १५ लाख लसीतून उपराजधानीच्या वाट्याला किती येणार आहेत?
मुंबईत वेगाने झालेल्या लसीकरणामुळे तेथील मृत्यूसंख्या आटोक्यात आली आहे एवढंच नव्हे तर बाधितांची संख्याही अडीच हजारांवर स्थिरावली,उपराजधानीत अद्यापही संसर्गाचा ज्वर ४३९९ वर पोहोचला असून नागपूर शहरात २४९८ जणांना आज करोनाचा नव्याने संसर्ग झाला असल्याची प्रशासकीय आकडेवारी आहे.८२ मृतक असून नागपूर शहरात आज ४० मृत्यू झाली असल्याची नोंद आहे.
विशेष म्हणजे आजच प.बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराविरोधात भारतीय जनता पक्ष्ाचे सत्ताधारी व आमदार हे आंदोलनाला बसले.शहरातील प्रत्येक गल्ली,नुक्कडवर भाजपच्या ३ ते ४ कार्यकर्ता आंदोलनाला करीत होते. स्वत:माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस हे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे,आ.प्रवीण दटके व इतर मान्यवरांसह टिळक पुतळा,महाल येथे आंदोलनाला बसले मात्र हेच आंदोलन केंद्र किवा राज्य सरकारच्या विरोधात नागपूरकर जनतेला लस मिळण्यासाठी केले असते तर ते जास्त ‘सुखावह’ असते असा सूर सोशल मिडीयामध्ये उमटला आहे!
तिथे बंगालमध्ये हिंसा होते ही बाब निषेधार्ह्यच आहे मात्र हे सर्व नेते नागपूरकरांच्या मतांनीच विधान सभेत पोहोचले आहेत त्यामुळे त्यांची बांधिलकी ही सर्वात आधी नागपूरकरांचा जीव वाचवण्याप्रति असली पाहिजे,नागपूरकर तसेच वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना गेल्या १ मे पासून शहरातील एकाही केंद्रावर तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये लसच मिळाली नाही,दररोज मोठ्या आशेने हा ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग लसीसाठी घराबाहेर जीव धोक्यात घालून पडतो मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडतेय.
मनपाच्या जनसंपर्क विभागाकडून गेल्या ४ दिवसांपासून ‘आजही लस उपलब्ध होणार नाही’ असाच संदेश प्रसूत होतोय,मनपा प्रशासनासाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून आपल्या शहरातील नागरिकांना अत्यावश्यक आरोग्य सेवा तर सोडाच मात्र मुबलक लसी उपलब्ध करुन देण्यातही मनपा प्रशासन व पदाधिकारी हे कुचकामी ठरत असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.
सर्वसामान्य जनतेला, केंद्र सरकार महाराष्ट्राला लसीचा पुरवठा करतेय की नाही,राज्य सरकार विदर्भावर लसीबाबतही अन्याय करते का?याबाबीमध्ये कोणताही रस नसून आमचे स्थानिक खासदार,आमदार व राजकीय नेते लस उपलब्ध करुन देण्यास काय प्रयत्न करीत आहे?याकडे त्यांचे लक्ष् लागले आहे.
एकीकडे ज्येष्ठ नागरिक आपला दूसरा डोज घेण्यासाठी वणवण भटकत असताना मुंबईत मात्र कारमध्ये बसल्या बसल्या लस टोचल्या जात असल्याचा तीव्र संताप आता उपराजधानीत उमटला आहे.आज मराठा आरक्ष् णाचा वाद ही चांगलाच पेटला आहे.मात्र आज जीव वाचविण्याला प्राधान्य असायला हवे,तुमचे ‘राजकारण’करोना हद्दपार झाल्यानंतरही आम्हाला झेलता येईल,आज लसींचं काय ते बघा!असा सूर समाज माध्यमात उमटला आहे.
मुंबईरांचेही प्राण महत्वाचे आहेत यात दूमत नाही मात्र आज देखील विदर्भात सर्वाधिक रुग्णसंख्या आणि मृत्यू दर असताना विदर्भाच्या वाट्याला वेगाने लसीकरण यायला हवे होते,एकीकडे स्वीझरलॅण्डसारख्या ६० लाखांच्या देशाने करोनावर पूर्णपणे मात केली असून ६० लाख लोकसंख्येत फक्त ३१ मृत्यू आहेत,नागपूरची लोकसंख्या ही प्रशासन ३० लाख सांगत असले तरी अनाधिकृत आऊटर भागातील लोकसंख्या धरुन ५० लाखांच्या घरात ही लोकसंख्या जाते.मात्र मृत्यू हा हजाराेंचा आकडा कधीचाच ओलांडून गेला आहे.केवळ आणि केवळ वेगाने लसीकरणच मृत्यू दर आटोक्यात आणू शकातो हे जगातील इतर देशांनी दाखवून दिले असताना ही भारतात लसीकरणाच्या बाबतीत सर्वकाही ‘आलबेल’आहे!
ब्रिटेनने तिस-या लाटेनंतर तिस-या लसीकरणालाही सुरवात केली,भारतात मात्र दूसरी लाट उच्चांकावर असताना पहीलेही लसीकरण धड पूर्ण झाले नाही.अमेरिकेत लसीकरण केल्यावर तब्बल १०० डॉलर व एक बियरची बाटली मोफत दिली जात आहे,ज्या चीनने जगभरात करोनाचा विषाणू प्रसारित केला त्या चायनाचे दृष्य हे भारतीय लोकांच्या डोळ्यातले पारणे फेडतात आहेत,तिथे पर्यटनस्थळावर तूफान गर्दी दिसून पडते आहे.हे सर्व चायनाला लसीकरणाच्या बळावरच शक्य झाले आहे.जगात इस्त्राईल या देशाने सर्वात वेगवाग लसीकरणाचा मान पटकावला आहे,पंतप्रधान मोदींनी किमान काही नाही तर या आपल्या मित्राकडून लसीकरणाचे ‘फंडे’तरी शिकून घ्यायला हवे होते,अशी मिश्किल टिका समाज माध्यमात उमटली आहे.
नागपूरात मनपाद्वारे पुढील काळात सर्वाधिक लसीकरणाचा मान जर कोणत्या आरोग्य केंद्राला द्यायचे झाल्यास ते नि:शंकपणे मनपाच्या ’स्व.प्रभाकरराव दटके रोगनिदान केंद्रालाच प्राप्त होणार’ याविषयी शंकाच नाही कारण गेल्या ४ दिवसांपासून मनपाच्या जनसंपर्क विभागाकडून ‘आज ही ज्येष्ठांचे लसीकरण नाहीच’अशी माहिती प्रसिद्ध होते त्याच माहितीत ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना केवळ महाल येथील स्व.प्रभाकरराव दटके रोगनिदान केंद्रातच लस उपलब्ध होणार असून मनपाच्या इतर कोणत्याही केंद्रावर लस उपलब्ध नाही’अशी चमत्कारिक व आश्चर्यजनक माहिती प्रसिद्धी करीता अतिरिक्त आयुक्त राम जोशी हेच देत आहेत!
नागपूरात लसींचा एवढा तुटवडा असताना फक्त दटके रोग निदान केंद्राकडेच लसींचा मुबलक साठा कसा?याविषयी विचारणा करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांना संपर्क केला असता,फोन बंद मिळतो.मनपाच्या प्रत्येक केंद्रावर लसीकरण वेगाने करण्याची मागणी आता सर्वसामन्य जनता करीत आहे.नागपूर व विदर्भात मृत्यूचा दर सर्वाधिक असताना सर्वच पक्ष्ाच्या राजकारणी नेत्यांनी आपल्या मतदार नागरिकांच्या जिवितेच्या सुरक्ष्ि ततेसाठी लसीकरणासाठीच या पुढे ‘जीव तोडून’ प्रयत्न करावे,अशी मागणी समाज माध्यमात उमटली आहे.
आज मनपाकडून जारी केलेल्या पत्रकानुसार शहराकरीता राज्य शासनाच्या कोटयातून लसीचा साठा प्राप्त झाल्यामुळे शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांच्या सुविधेकरीता एकूण ९६ केन्द्रांवर आता उद्या गुरुवार,दि. ६ मे पासून लसीकरण करण्यात येईल,असे जाहीर केले. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC) येथे ३ केंद्रावर कोव्हॅक्सीन, इंदीरागांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २ केंद्र व अ.भा. आर्युविज्ञान संस्था (AIMS) मध्ये ४ येथे कोव्हिशिल्ड याप्रमाणे मनपा व शासकीय मिळून ९६ केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.मात्र लसीकरणाची हीच गती राहील्यास नागपूरच्या एकूण ३० लाख जनतेचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागणार?असा प्रश्न उपस्थित करुन जुलै-ऑगस्टमध्ये आरसीएमआरने दिलेल्या करोनाच्या तिस-या लाटेची वाट पहाणार आहेत का?असा संताप व्यक्त केला जात आहे.
१८ ते ४४ वयोगटासाठी अतिरिक्त ३ केंद्रे-
१८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तिसाठी अतिरिक्त ३ केन्द्र सुरु करण्यात आले असून यामध्ये कोव्हेक्सीन लसीकरण स्व.प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केन्द्र, छाप्रु सर्वोदय मंडळ हॉल छाप्रुनगर सेंट्रल एव्हेन्यू व मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (UPHC) या ठिकाणी करण्यात येईल. त्याशिवाय पाचपावली सुतिकागृह रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर व आयसोलेशन केंद्रांवर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तिसाठी अतिरिक्त ३ केन्द्र सुरु करण्यात आले असल्याची माहीती मनपा प्रशासनाने दिली.




आमचे चॅनल subscribe करा
