फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपूरात गर्दी जोमात अन् करोना कोमात...

नागपूरात गर्दी जोमात अन् करोना कोमात…

Advertisements

सीताबर्डीवर गर्दीने तोडले सर्व रेकॉर्ड

नागपूर,ता. ८ नोव्हेंबर: अश्‍विन महिना लागताच जनसामान्यांना लागतात ते कार्तिक महिन्यात साजरी होणा-या दिन..दिन ..दिवाळीचे वेध.या वर्षी मात्र कराेना नावाच्या विषाणूने मार्च महिन्यापासूनच कहर केल्याने एप्रिल महिन्यापासून प्रारंंभ होणा-या गुढीपाडव्यापासून मराठी भाषकांना नूतन वर्ष साजराच करता आला नाही.त्या पाठोपाठ भाद्रपदमधील विघ्नहर्त्याचे आगमन देखील घरच्या घरीच झाले.अश्‍विन महिन्यातील दूर्गोत्सव हा देखील मनामधील श्रद्धेतच साजरा झाला मात्र ‘दिवाळी’म्हटली की घरातील अबाल बालवृंद यांना नवीन कपडे,फटाके,मिठाई घेण्यावाचून जगातील कोणताच ‘करोना’थांबवू शकत नाही,आज नागपूरातील सीताबर्डीवरच्या सुपर संडेचे हे दृष्य बघितले असता,असेच म्हणावे लागेल.

नुकताच कराेनाचा उद्रेग हा जरा कमी झाला आहे,लॉक डाऊन ब-याच अंशी शिथिल झाला असला तरी हा संसर्ग पूर्णपणे हद्दपार झाला नाही. मात्र तरीही नागपूरकरांची एवढी हलगर्जी बघून काळजात धस्स झाले…!जून आणि सप्टेंबर महिन्यात देशात करोनाने उच्चांक गाठला होता,सध्या देशात करोना महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद(आयसीएमआर)ने नुकतीच वर्तवली असून सणासुदीला बाजारात होणारी तूफान गर्दी आणि त्यातून होणारा करोनाचा संसर्ग हेच कारण तज्ज्ञांनी विशद केले आहे.
आज बाजारात झालेली गर्दी बघता लवकरच देशात करोनाची तिसरी लहर येण्यावाचून कोणी राखू शकणार नाही,असेच आता म्हणावे लागेल.जणू करोना हद्दपार झाला किंवा या शतकातील ही शेवटची ‘दिवाळी’आहे अश्‍या बेफिकिर वृत्तीने नागपूरकरांनी आज आपल्या लहान-लहान मुलांना घेऊन बाजारात गर्दी केली.सुरक्ष्ति अंतरचा तर अक्ष् रश: फज्जा उडाला होता.

तब्बल आठ महिन्यांच्या ठाणबंदी व अंशत: शिथिलतेनंतर व्यापारी वर्गही जोमात होता.थंडी ही करोनाच काय तर कोणत्याही विषाणूसाठी पोषक वातावरण निर्माण करते हे माहिती असून देखील बाजारात कोणतेही सुरक्ष्ेच्या उपाययोजना पाळल्या गेल्या नाहीत.प्रत्येकाला आठ महिन्यात झालेले नुकसान याच दिवाळीत भरुन काढण्याची लालसा होती.

कपडे,सोने चांदीची दूकाने,इलेक्ट्रीक माळा,आकाश कंदील,लाह्या,बताशे,पणत्या,इलेक्ट्रीकल सामान,मिठाईची दूकाने,अशी एक ही दूकान नव्हती जिथे ग्राहकांनी ‘कराेना’ची भीती डावलून तूफान गर्दी केली नाही….!आपल्यासोबत आपल्या चिमूकल्यांचा,कुटुंबियांचा तसेच जे शहरवासी आज घरात सुरक्ष्ति बसले,त्यांचाही जीव आज नागपूरकर ग्राहकांनी धोक्यात आणला.दिवाळी तोंडावर आली व नोकरदारांना रविवारीच उसंत मिळते हे जरी खरे असले तरी या वर्षी करोनासारख्या जागतिक महामारीने अनेकांच्या कुटुंबातील आप्त-स्वकीयांना त्यांच्यापासून कायमचे हिरावले आहे,याचे देखील भान ग्राहकांनी ठेवले नाही.करोनामुळे ज्या शेकडो नागरिकांचा जीव गेला त्यांच्या घरी कायमची ‘दिवाळी’ ही अंधारमय झाली आहे.किमान त्यांच्याकडे बघून तरी सावधगिरी बाळागायला हवी होती.

दिवाळी दर वर्षी येणार आहे.मात्र अश्‍या या बेजवाबदार मनोवृत्तीमुळे करोनाची तिसरी लाट जर आली तर त्यात गमावला जाणारा जीव परत येणार नाही कारण अद्याप या विषाणूवर प्रभावी लस जगातील कोणत्याच बलाढ्य देशांना देखील शोधता आली नाही.
आजची ही रेकॉर्डब्रेक गर्दी बघून शेवटी ‘नागपूरात गर्दी जोमात अन् करोना कोमात’असेच आता म्हणावे लागेल.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या