फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपूरात कोरानामुळे चौथा मृत्यू: ३९ वर्षीय सारीचा होता रुग्ण

नागपूरात कोरानामुळे चौथा मृत्यू: ३९ वर्षीय सारीचा होता रुग्ण

Advertisements

शहरात आज आणखी दोन पॉझिटीव्ह:एकूण संख्या २९८

नागपूर,ता.११ मे: शहरात आज कोरोनामुळे चौथा मृत्यू झाला असून ३९ वर्षीय या व्यक्तिला ६ मे रोजी मेडीकलमध्ये दाखल करण्यात आले होते. पांढराबोडी येथील हा रुग्ण सारीने पीडीत होता. या रुग्णाचा कोरोना चाचणीचा अहवाल हा काल मध्यरात्री म्हणजे रविवारी कोराना पॉझिटीव्ह आला होता. यानंतर मनपा प्रशासनाने पांढराबोडी येथील या रुग्णाचा परिसर हा सील केला होता.
या रुग्णाचा स्वॅब ६ मे रोजी घेण्यात आला होता.रविवारी अहवाल पॉझिटीव्ह आला.या रुग्णाचा मेडीकल येथे आज सायंकाळी ६.३० वाजता मृत्यू झाला.शहरात आता कोरोनाने मृत्यू पावलेल्यांची संख्या ही ४ झाली आहे. शहरात कोरानामुळे पहीला मृत्यू हा ५ एप्रिल रोजी सतरंजीपुरा येथील ६८ वर्षीय रुग्णाचा झाला होता.यानंतर २५ दिवसांच्या अंतरानंतर ३० एप्रिल रोजी मोमिनपुरा येथील ७० वर्षीय रुग्णाचा झाला. तिसरा मृत्यू हा नुकताच पार्वतीनगर येथील २२ वर्षीय तरुणाचा ५ मे रोजी झाला तर आज सोमवार दि. ११ मे रोजी पांढराबोडी येथील सारीच्या रुग्णाचा झाला.

शहरात आज आणखी दोन पॉझिटीव्ह-
आज सामेवार दि. ११ मे रोजी आणखी दोन कोरोना बाधितांची भर पडली. हे दोन्ही रुग्ण पुरुष असून मोमिनपुरा येथील नागरिक आहेत. ते आमदार निवास येथे विलगीकरणात होते.
मेयामधून आज ३ रुग्णं बरे होऊन घरी गेले. सध्या मेयोमध्ये १७ रुग्ण भरती झाले असून त्यांची तपासणी सुरु आहे. सोमवार दि. ११ मे रोजी एकूण ८२ कोरोना बाधित हे मेयोमध्ये भरती असून हा आकडा दर तासाला बदलत असल्याचे मेयोचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया यांनी सांगितले.

रामेश्‍वरीत आणखी काही नागरिकांचे विलगीकरण!
रामेश्‍वरीत सायंकाळी ६.३० वा. मनपा परिवहन विभागाच्या ६ बसेसे उभ्या असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. महापालिकेतर्फे मात्र आज त्या भागातील किती नागरिकांचे विलगीकरण करण्यात आले,या विषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. जयभीम नगर येथील बनोदे किराणा स्टोर्स जवळून अंदाजे ४० ते ४५ नागरिकांचे विलगीकरण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. रामेश्‍वरीत एका २२ वर्षीय करोना बाधित तरुणाचा मृत्यू नुकताच ५ मे रोजी झाला होता. यानंतर त्याच्या संपर्कात आलेले आणखी दोन जणांचा अहवाल हा कोरोना पॉझिटीव्ह आला होता. या भागात एकूण ४ पॉझटीव्ह रुग्ण आढल्याने प्रशासनाने रामेश्‍वरी,पार्वतीनगर, जयभीम नगर तसेच आजूबाजूचा तीन किलोमीटरचा संपूर्ण परिसर हा सील केला आहे. मृत तरुणाच्या संपर्कात आलेल्या दोन व्यक्तिंचा अहवाल हा पॉझिटीव्ह आल्यावर प्रशासनातर्फे या भागातील गुरुवारी १५० तर यानंतर ४८ नागरिकांचे विलगीकरण केले होते.आज विलगीकरण करण्यात आलेले व्यक्ति हे पॉझिटीव्ह आढळलेल्या दोन्ही रुग्णांचे जवळचे नातेवाईक व शेजारी असल्याचे सांगितले जात आहे.

एकट्या मेडीकलमध्ये सारीचे ५० रुग्ण!
कोरोना बाधितांसोबतच एकट्या मेडीकलमध्ये मागील ८ दिवसात ‘सारी’(न्यूमोनियाची शेवटची स्टेज)च्या ५० रुग्णांची नोंद झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे सारीचे रुग्ण हे कोरोनाबाधितही होत असल्याचे समोर येत आहे. मागील दोन दिवसांमध्ये सारीच्या ५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे प्रयोगशाळेतून पुढे आले आहे.

मेडिकलमध्ये ट्रॉमा केअर युनिटचे कोव्हिड-१९ रुग्णालयात परिवर्तित करण्यात आले आहे. या रुग्णालयात सारीच्या एकूण १४ रुग्णांना दाखल करण्यात अाले असून ३ मे रोजी ४ रुग्ण,४ मे रेाजी ५ रुग्ण तर ८ मे रोजी १६ अशी वाढती संख्या सारीच्या रुग्णांची होती.
सारी आणि कोरोना या दोन्ही आजारांची लक्ष् णे जवळपास सारखीच आहेत. सारीचे रुग्ण कोव्हिड रुग्णालयात ठेवण्यामागील उद्देश्‍य त्यांच्यावर कोरोना बाधितांप्रमाणे याेग्य उपचार होतील हा आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या