फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपूरात करोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा दोननी वाढला!

नागपूरात करोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा दोननी वाढला!

Advertisements

शनिवारी एकूण करोना बाधितांचा आकडा झाला २७

नागपूर: गुरुवारी रात्री नागूरात करोना बाधितांचा आकडा हा २५ झाला होता. एकाच दिवसात यात दोननी भर पडून शनिवारी हा आकडा २७ पर्यंत पोहोचला. शनिवारी ज्या दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत त्यात नुकतेच सतरंजीपु-यातील ज्या करोनाबाधित इसमाचा मृत्यू झाला त्याच्याच जवळच्या ५३ वर्षीय नातेवाईकाचा अहवाल देखील शनिवारी पॉझिटिव्ह आला तर इंडोनेशियामधून आलेला जो इसम कोविड-१९ वाडॉत करोना पॉझिटिव्ह असल्यामुळे भरती होता त्याच्या पत्नीचा देखील अहवाल हा करोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती मेडिकलचे वैद्यकीय अधिक्ष् क डॉ.अविनाश गावंडे यांनी दिली.

इंडोनेशियाला जाऊन आलेल्या या इसमाची पत्नी ही देखील इंडोनेशियाला गेली होती. हा इसम मूळचा चंद्रपूर येथील असून पत्नीला देखील करोना बाधित होण्यास इंडोनेशियाची पार्श्वभूमी तसेच करोनाबाधित पतीचा संसर्ग कारणीभूत ठरला.

नागपूरात आता करोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ही २७ झाली असून या सर्वांवर मेडिकलमधील कोविड-१९ वॉर्डात उपचार सुरु आहेत. शुक्रवारी मात्र मेडिकलच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नागपूरातील ५९ नमुने निगेटिव्ह आले होते. ही निश्‍चितच नागपूरकांसाठी दिलासा देणारी बाब ठरली.

सतरंजीपुऱ्यतील करोना संशयित ६८ वर्षीय इसमाचा मृत्यू ४ एप्रिल रोजी झाला.या रुग्णाचे नमुने ६ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आले. याच दिवशी त्याच्या कुटुंबातील ३० वर्षीय मुलगा, त्याची २१ वर्षीय पत्नी,३५ वर्षीय जावई, त्याची ३४ वर्षीय पत्नी व त्यांचे ८ व १२ वर्षाची दोन मुले असे एकूण ६ संशयितांना मेडिकल मधील ‘ कोव्हिडं-१९’ वॉर्डात दाखल केले होते,त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.परिणामी गुरुवारी नागपूरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही २५ झाली होती.शनिवारी आणखी दोन रुग्णांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रशासनावरील ताण हा आणखी वाढला आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या