

नागपूरात करोनाने निर्माण केली ‘डॉक्टर्स‘ही नवी अस्पृश्य जमात!
अनेक डॉक्टर्सना गृहसंकूल खाली करण्याबाबत सोसायटींचा दवाब
डॉ.ममता खांडेकर
(senior Journalist)
नागपूर,२३ एप्रिल: ‘करोना’या वैश्विक रोगाने संपूर्ण जगात माणसाच्या केवळ शारिरिक अंगावरच हल्ला केला नाही तर लोकांच्या मानसिक,भाविनक,वैचारिक मानसिकतेवर देखील किती सखोल परिणाम केला आहे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे, नागपूरातच अनेक डॉक्टर्स व त्यांच्या कुटुंबावर अनेक गृह निर्माण संस्था व गृह संकूलात घालण्यात आलेला ‘बहीष्कार’! नागपूरातील अनेक डॉक्टर्स हे गृहसंकुलातील पदाधिकारी,शेजारी, संकूलातील इतर सदस्य यांच्याकडून मिळणा-या अमानवीय वागणूकीमुळे फक्त त्रस्त नव्हे तर अक्ष् रश: दू:खी झाले आहेत. ‘करोना’या वैश्विक संकटाने जणू ‘डॉक्टर्स’ही नवी ‘अस्पृश्य’जमातच निर्माण केल्याचे हे द्योतक आहे.
नागपूरातील अनेक डॉक्टर्स यांनी व्हॉट्स ॲप ग्रूपवर आपापल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. कश्याप्रकारे त्यांना त्यांच्या निवास ठिकाणी अमानवीय वागणूक दिली जात आहे. अनेक गृह संकूलातील पदाधिकारी यांनी या संकुलातील डॉक्टर्सना आपापल्या घरातील खिडक्या,दारे ही सतत बंद ठेवण्याची सक्त ताकीद दिली आहे.एवढेच नव्हे तर संकुलातील पार्किंगमध्ये त्यांचे वाहन येताच इतर सदस्य हे पटापट आपापल्या घराची दारे बंद करतात. लहान मुलांना घरात घेतात. ‘देवदूत’असणा-या डॉक्टर्सनाच सध्या समाजाच्या या विचित्र आणि क्लेषकारक बहीष्काराला सामोरे जावे लागत असल्याचे दूर्देवी चित्र नागपूरात अनेक संकूलात बघायला मिळत आहे.
मनीष नगर,रामदास पेठ,धंतोली,मानेवाडा रोड,बेसा असो किवा अगदी नागपूरातील क्रिम भाग सिव्हिल लाईन्स,सदर असो. उच्च मध्यमवर्गीय लोकंच डॉक्टर्स लोकांसोबत अशी हीन वर्तवणूक करीत असल्याने याचे जास्त दू:ख असल्याची भावना नाव न छापण्याच्या अटीवर एका डॉक्टरने व्यक्त केली. गरीब लोकं हे तरी समजावले तर समजून घेतात मात्र समाजातील ही तथाकथित‘ सुशि क्ष्ति’ व ‘उच्चभ्रू ’ मंडळीच जेव्हा समाजाचा एक अत्यावश्यक घटक असणा-या डॉक्टर्स सोबत असा व्यवहार करतात तेव्हा अश्या लोकांचा राग करावा किंवा त्यांच्यावर दया करावी असा विचार येऊन पडतो.
ही तिच मंडळी आहेत ज्यांनी रात्री-अपरात्री आपातकालीन मदतीसाठी आपापल्या गृह संकुलातील या डॉक्टर्सकडे धाव घेतली होती आणि डॉक्टर्सने देखील आपले कर्तव्य फक्त डॉक्टर म्हणून नव्हे तर शेजार धर्म म्हणूनही निभावले होते. ‘करोना’च्या अकल्पित भीतीमुळे आता नागपूरातील अनेक रो-हाऊस,गृह संकूल इ. ठिकाणी मात्र हेच डॉक्टर्स आता संकुलातील सदस्यांना ईमारतीत नको आहेत. ज्यांची स्वत:ची घरे आहेत त्यांना ’बहिष्कृत’केले जात आहे,जे भाड्याने राहतात त्यांच्यावर घर मालकाने घर रिकामे करुन देण्यासाठी तकादा लावला आहे.
एवढ्या भीषण परिस्थितीत भाडेकरु असणारे डॉक्टर्स अाता कर्तव्य बजावतील कि नव्याने घर शोधतील?ही मानसिकता फक्त नागपूरातील नागरिकांचीच आहे असे नाही तर नागपूरवरुन रायपूरला गेलेल्या एका महिला डॉक्टरने देखील आपला विदारक अनुभव व्हॉट्स ॲपवर शेअर केला आहे.
देशात लागू झालेल्या आणिबाणिच्या परिस्थितीत डॉक्टर्स,वैद्यकीय सेवेतील संपूर्ण घटक, स्वच्छता कर्मचारी,पोलीस इ. यांचा वर्ग अत्यावश्यक सेवा पुरविणा-या गटात मोडतो.अश्यावेळी मानवतेची सेवा करणारे घटक म्हणूनच त्यांच्याकडे बघणे बंधनकारक असताना, त्यांना हीन वागणूक देण्यात येत असल्यामुळेच ठाणे येथील पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी नुकताच एक आदेश जारी केला.ठाणे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्या ज्या संकुलातील वैद्यकीय गटातील घटकांना असा अनुभव येत असल्यास त्यांना मानसिक त्रास देणा-या सदस्यांवर साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७,आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच भारतीय दंड संहितेच्या १८६० कलमाप्रमाणे गुन्हा नोंदवावा.
नागपूरातील अशी वर्तवणूक सहन करणा-या काही डॉक्टर्स मंडळींनी इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष् डॉ. झूनझूनवाला यांच्याकडे लिखित तक्रार नोंदवली असून लवकरच याबाबत पोलिस आयुक्तांकडे आयएमए हे पत्र सुपुर्द करणार आहे.
शेवटी स्वत:चा फ्लॅट असल्यामुळे आयुष्यभर त्याच सोसायटीमध्ये राहावयाचे असल्याने अनेक डॉक्टर्सनी त्यांना मिळणारी अशी अस्पृश्यासारखी वागणूक मुकाट्याने सहन केली.मात्र यामुळे संकुलातील पदाधिका-यांचे उलट मनोबल वाढले व त्यांनी आता या डॉक्टर्स मंडळीवर अनेक सक्तीचे नियम लादले.एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेला ,वैद्यकीय क्ष्ेत्रातील प्रत्येक घटक हे करोनाच्या या महासंकटात ‘देवदूत’असल्याचेच वारंवार सांगून त्यांचा योग्य तो सन्मान राखा,असे आवाहन करीत असताना,महाराष्ट्राच्या उपराजधानी या पवित्र क्ष्ेत्रात काम करीत असल्यामुळे विचित्र अनुभवांना व बहीष्काराला सामोरे जावे लागत असल्याचे दूर्देवी चित्र उमटले आहे.
करोनाच्या भीतीने ‘बहीष्कृत‘केल्या जाणा-या या डॉक्टर्सनीच जर ‘बहीष्काराचे’तंत्र उपसले तर….कुपमंडूक मानसिकतेच्या उच्चभ्रू व उच्च मध्यमवर्गीय वर्गातील घाबरट नागरिकांना मग देव ही वाचवू शकणार नाही,हे सत्य लवकरात लवकर समजून घेणे गरजेचे आहे,असेच म्हणावे लागेल.
[ Yes in our colony, I was asked repeatedly by flat owners – which doctor r u ? Why u going to clinic daily ? You will spread risk to us, etc? After explaining them the details of which doctor I m and how we r following all precautions, their anxiety was reduced and now they don’t hv any problem.
One instance from different colony of our community, a physiotherapist was asked to leave the premises. Her flat owner was not having any problem and she used to keep hot water ready for her as she came from duty daily, but neighbours had their anxiety. We as leadership intervened the matter and explained everyone that she is following all the protocols of govt and she is the corona warrior and if you people oppose her – you may be booked for this, then people realised and things are fine now.]
[We live in a duplex “Row house” in a society in Raipur. So No direct contact with any neighbour.
However, today our society people gathered in front of our house and asked my husband to leave the colony if he is going to continue to go to the hospital regularly. So, he has to either stay at home or leave the society.
So, he is being stopped by countrymen from serving their own countrymen.
So much for the “applaud” and “appreciation” 3 days back.
F***ing Bigots! ?]
[This country will never be able to fight any disaster ever. These people don’t have even an ounce of morality of what the Italians or the Spanish or the Americans have!]
[My first hand experience.. ?
I m staying in an apartment, I got a letter signed by all flat owners, to always keep my door and windows closed.
They shut their doors the moment my car enters in the parking zone.]




आमचे चॅनल subscribe करा
