Advertisements

आरोपी मुस्तफा खान वल्द खान माेहम्मद या २२ वर्षीय आरोपीला अटक
गुन्हे शाखा युनिट क्र.दोनची कामगिरी
जवाहर वसतीगृहासमोर धारदार शस्त्राने केली ४८ वर्षीय महिलेची हत्या
नागपूर,ता.२३ जुलै २०२५: आज दूपारी नागपूर शहर घरेलू कामगार असलेल्या ४८ वर्षीय महिलेच्या निघृण हत्येने हादरले.सिताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जवाहर वसतीगृहा समोर आज दूपारी साढे अकरा वाजता, माया मदन परसेकर या(राहाणार जवाहर वसतीगृहा मागे सिव्हिल लाईन्स)या पायी घरी जात असताना त्यांच्या मागे धारदार शस्त्र घेऊन त्यांच्या गळ्यावर वार करीत त्यांचा निघृण खून करण्यात आला.भर दूपारी महिलेसोबात घडलेल्या या घटनेने पोलिस विभागात खळबळ माजली.मात्र,अवघ्या काही तासात गुन्हे शाखा यूनिट क्र.दोन कडून या खूनाचा उलगडा होऊन, आरोपी २२ वर्षीय मुस्तफा खान वल्द खान मोहम्मद(राहाणार,गजानन नगर एमआयडीसी,पठाण यांच्या घरी भाड्याने मात्र, मूळचा आलीमयो हतीन,पलवल,हरियाणाचा राहणारा)याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा नागपूर शहरतर्फे करत असताना तांत्रिक व गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.मृतक महिला यांची मुलगी गीता परसेकर हिचा चार वर्षांपूर्वी मुस्तफा नावाच्या इसमासोबत प्रेमविवाह झाला आहे.या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुस्तफा याला ताब्यात घेऊन विचारपूस केली.यात मुस्तफा याने खूनाची कबुली दिली.

(छायाचित्र : मृतक माया मदन परसेकर)
मृतक महिलेच्या मुलीने मुस्तफाकडून ५ लाख रुपयांची रक्कम आपल्या आईला दिली होती.मुस्तफा व मृतक माया यांच्यात पैसे परत न दिल्याने वाद सुरु होता.याशिवाय मृतक महिलेचा या प्रेमविवाहाला विरोध होता.याची परिणीती माया परसेकर यांच्या हत्येमध्ये झाली.मृतक महिला ही घरेलू कामगार होती.आज दूपारी एका इमारतीत घरकाम आटोपून परतत असताना,दबा धरुन बसलेल्या मुस्तफाने पाठीमागून धारदार शस्त्राने महिलेचा गळा चिरला.
आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सीताबर्डी पोलिसांना आरोपीस ताब्यात देण्यात आले.आरोपीवर कलम १०३(१),१०३(२)भा.न्या.सं अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खूनाच्या आरोपीला अतिशय वेगाने तपास करुन गुन्हे शाखा पथक दोन यांनी अटक केल्याने पोलिस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांनी यूनिट क्र.दोनच्या तपास अधिकारी व अंमलदार यांना बक्षीस जाहीर केले आहे.
ही कामगिरी पोलिस आयुक्त व सह पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी,वसंत परदेशी ,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे शाखा)अश्विनी पाटील,पोलिस उप आयुक्त(डिटेक्शन)अभिजित पाटील,साहायक पोलिस अायुक्त (गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश सागडे,सहायक पोलिस निरीक्षक गजानन चांभारे,मनोज राऊत,हवालदार राजेश तिवारी,संदीप चंगोले,शैलेष जांभुळकर, नापोअं,सुरेश तेलेवार,पोअं.सुनिल कुंवर,कमलेश गहलोद व मंगल जाधव यांनी पार पाडली.
……………………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
