फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपूरातून एसएनडीएल फ्रेंचायझी झाली हद्दपार: महावितरणकडे पुन्हा कारभार

नागपूरातून एसएनडीएल फ्रेंचायझी झाली हद्दपार: महावितरणकडे पुन्हा कारभार

Advertisements

महावितरणसाठी आणखी तीस कोटींची मंजूरी:पुढच्या काळात शंभर कोटी देणार
नागपूर: साल २०११ मध्ये एसएनडीएल यांनी जेव्हा नागपूरातील फ्रेंचाईझी घेतली तेव्हा नागपूरमध्ये वीज गळतीचे प्रमाण हे ३० टक्के होते. एसएनडीएलने हे प्रमाण १३.७४ वर आणले. मधल्या काळात मी उर्जा मंत्री झाल्यानंतर कंपनीच्या विरोधात नगरसेवक,महापौरच नव्हे तर जनतेच्या देखील अनेक तक्रारी आल्या.यावर मी समिती स्थापन केली. समितीच्या अहवालानुसर तीन वेळा नोटीस दिल्या. तक्रारीमधील ७० ते ८० टक्के तक्रारी कंपनीने दुरुस्त ही केल्या मात्र आता कंपनीच डबघाईस आल्यानंतर कंपनीने आम्हाला १२ ऑगस्ट तसेच ६ सप्टेंबरला,आम्ही आता काम करु शकत नसल्याचे पत्र दिले त्यामुळे ८ तारखेच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण शहराच्या वीज वितरणाची जबाबदारी ही महावितरण घेणार. येत्या वर्ष भरात पुन्हा महावितरणाचे संपूर्ण जाळे शहरात तयार होईल. मे.एसएनडीएल ने आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्यामुळें शहरातील विज वितरण व्यवस्था सांभाळंण्यास असमर्थंता दर्शवली व महावितरणला वरील क्षेत्राचा ताबा घेण्यास विनंती केली होती या अनुषंगाने ग्राहकांची गैरसोय टाळंण्यासाठी आज रविवार दि. 8 सप्टेंबर 2019 च्या मध्यरात्री पासुन महावितरणने नागपूर येथील वितरण व्यवस्था ताब्यात घेत असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा, नवीन व नविकरणिय ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकूळे यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मे. एस. एन. डी. एल. चे नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी यांना चर्चेव्दारे महावितरणच्या बाह्यस्त्रोत कर्मचार्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वितरण फ्रेंचाइझी क्षेत्रातील वितरणप्रणाली ताब्यात घेण्याच्या दृष्टीने महावितरणने 3 कार्यकारी अभियंते, 9 अतिरिक्त कार्यकारी अभियंते, 6 उपकार्यकारी अभियंते व 29 सहाय्यक अभियंता यांची नियुक्ती केली असल्याचेही त्यांनी सांगितले. वितरण फ्रेंचाइझी भागातील विद्युत वितरण प्रणालीच्या देखभालीकरीता महावितरणने एकुण 105 तांत्रिक कर्मचारी (35 विज वितरण केंद्राकरीता प्रत्येक पाळी करीता एक तांत्रिक कर्मचारी असे एकुण 105 तांत्रिक कर्मचारी) व 40 यंत्रचालकांची उपकेंद्र संचालनाकरीता प्रतिनियुक्ती केली असून ही सर्व प्रतिनियुक्ती वितरण प्रणालीचा अभ्यास करण्याकरीता केलेली आहे. याशिवाय फ्रेंचाइझी भागातील कार्यभार सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने मंडळं कार्यालयात विशेष नियंत्रण कक्षाची (मोबाईल क्रमांक 7875760070) स्थापणा करण्यात आलेली आहे, त्याकरीता प्रत्येक पाळीत सहाय्यक अभियंता नियुक्त करण्यात आला असून ग्राहकांना उत्तम सेवा देण्यास महावितरण कटीबद्ध आहे. सर्व ग्राहकांनी सद्य परिस्थितीत महावितरणला नेहमीप्रमाणेच सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहनही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

एसएनडीएलकडे २२५ कोटी रुपये थकीत-
हस्तांतरणाच्या आजच्या तारखेपर्यंत एसएनडीएलकडे महावितरणचे २२५ काेटी रुपये थकीत आहे मात्र २२४ कोटी महावितरणलाच कंपनीला द्यायचे असल्यामुळे फारसे नुकसान झाले नाही. याशिवाय एसएनडीएलला ग्राहकांकडून तीन महिन्यांचा लाईव्ह एरिअस ७० कोटींची वीज वसूली करायची होती ती आता महावितरण करणार. ९ ता.पासून शहरातील एसएनडीएल कंपनीची सेवा संपुष्टात येणार असून नागरिकांना २४ तास वीज उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी महावितरणची राहील. यासाठी पुन्हा संपूर्ण यंत्रणा उभी करावी लागणार आहे त्यासाठी मागेच महावितरणला ५५ कोटी रु.देण्यात आले होते. पुन्हा ३० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून पुढच्या काळात १०० कोटी रु.गूंतवणूक करणार असल्याची माहीतीती वाबणकुळे यांनी दिली. १३ टक्के पर्यंत वीज गळती असल्यामुळे आता नागपूर शहराला फ्रेंचायझीची गरज नसल्याचे ते म्हणाले. पत्र परिषदेत आ.कृष्णा खोपडे,अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, डॉ.मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार, भाजप शहर अध्यक्ष् प्रवीण दटके तसेच महावितरणचे पदाधिकारी उपस्थित होते.
भिवंडी-कळव्यात फ्रेंचायझीला विरोध-
महाराष्ट्रात औरंगाबाद, जळगांव व नागपूरमधून फ्रेंचायझी संपुष्टात आली असून भिवंडी व कळव्यात ६५ टक्के वीज गळती असल्यामुळे त्या ठिकाणी फ्रेंचायझी मंजूर करण्यात आली आहे. मालेगांवसाठी देखील निविदा काढण्यात आली आहे. जळगाव,औरंगाबाद मॉडेल फसलं हे मान्य करावं लागेल.एसएनडीएलही फसली. ते आर्थिक दृष्टया नवीन गुंतवणूक करु शकत नसल्यामुळे त्यांनी माघार घेतली. सध्या फक्त भिवंडीमध्ये सुरु आहे. कर्मचारी संघटना यांचा या फ्रेंचायझीला विरोध नसून वीज चोरी करणारे यांची ही ओरड असल्याचे बावणकुळे म्हणाले. जे कर्मचारी फ्रेंचायझीला विरोध करीत आहेत,तेच वीज चोरी का कमी करत नाही? दर वर्षाला वीज गळतीचे प्रमाण ०.५० ने वाढत आहे,फ्रेंचायझीच ही वीज गळती थांबवू शकते. एसएनडीएलच्या कर्मचारी व कंत्राटदारांचे ३५ कोटींचे थकीत बिल आहे ते महावितरण देणार असल्याचे बावणकुळे म्हणाले.
पोहरा व नागनदीचे आंदोलन हे राजकीय दृष्टिेने प्रेरित-
पोहरा व नागनदीत महापालिका ही ५०० एमएलडी पाणी सोडते. त्यातील ३३० एमएलडी पाणी महाजेनको वापरते तर १२० एमएलडी पाणी या दोन्ही नद्यांमध्ये साेडले जाते. जनतेच्या मनात मुद्दामून हा संभ्रम निर्माण करण्यात आला, मात्र रात्री त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत १२० एमएलडी पाणी हे दोन्ही नद्यामध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केले. ५० टक्के पाणी उपलब्ध असूनही गावकरी फक्त १० टक्के पाण्याची उचल करतात,येत्या काळात महाजेनको हे अस्वच्छ पाणी वापरणार असल्याची माहिती बावणकुळे यांनी दिली. नागपूरात पाणी पुरवठा करणारे तोतलाडोहमध्ये सध्या ६५ टक्केच्या वर पाणी उपलब्ध झाले आहे. येत्या तीन वर्षात मध्य प्रदेश सरकारशी बाेलून व केंद्राच्या मदतीने ३.५० कोटींचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.यासाठी ६० किमीची अंडर ग्राऊंड टनेल खोदली जाणार यामुळे तोतलाडोह हा कायम भरुन राहणार आहे.याशिवाय ४० कोटी खर्च करुन कन्हानमध्ये पॅकबेल तयार करण्यात येणार असून नागपूर शहराला २४ तास पाणी मिळावे यासाठी दीर्घ मुदतीच्या व लघू मुदतीच्या योजना शासन राबविणार आहे.
२० वर्षांचा बॅकलॉग आहे..खड्डे तर होणारच!
पालकमंत्री या नात्याने पत्रकारांनी शहरातील जीवघेण्या खड्ड्यांविषयी वावणकुळे यांच्याकडे विचारणा केली असता, २० वर्षात नागपूरला एक ही पैसा राज्य सरकारने दिला नाही. फक्त पाच वर्षात मेट्रो,डीपी रोड, आऊटर, इनरोड रिंग रोड,सिमेंट रस्ते इ.सर्व प्रकल्प एक साथ सुरु असल्यामुळे २० वर्षांचा बॅकलॉग भरल्या जात आहे त्यामुळे खड्डे तर होणारच. २० वर्षांचा बॅकलॉग भरण्यासाठी नागपूर तर खोदावंच लागेल ना,असा सवाल ही त्यांनीच केला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या