फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजनागपूरच्‍या डिंपल गजभियेने पटकावला 'मिसेस फिटनेस' किताब

नागपूरच्‍या डिंपल गजभियेने पटकावला ‘मिसेस फिटनेस’ किताब

Advertisements

मिसेस वेस्‍ट इंडिया इम्‍प्रेस ऑफ वेस्‍ट इंडिया – 2020 सीझन 3

नागपूर, गोवा येथे झालेल्‍या मिसेस वेस्‍ट इंडिया इम्‍प्रेस ऑफ वेस्‍ट इंडिया – 2020 सीझन 3 च्‍या अंतिम फेरीत नागपूरची सौंदर्यवती डिम्‍पल गजभिये यांनी देशभरातून आलेल्‍या सर्व स्‍पर्धकांवर मात करीत ‘मिसेस वेस्‍ट इंडि‍या फिटनेस’ चा किताब पटकावला.

दिवा प‍िजेंट्सच्‍यावतीने अलिला दिवा, गोवा येथे मिसेस वेस्‍ट इंडिया इम्‍प्रेस ऑफ वेस्‍ट इंडिया – 2020 सीझन 3 च्‍या अंतिम फेरीचे आयोजन करण्‍यात आले होते. महाराष्‍ट्र, गुजरात व गोवा या राज्‍यांचे प्रतिनिधीत्‍व करणा-या 47 विवाहीत सौंदर्यवतींनी या स्‍पर्धेत सहभाग नोंदवला होता. स्‍पर्धेत 20 ते 36 वर्षे वयोगटासाठी सिल्‍व्‍हर आणि 37 व त्‍यावरील वयोगटासाठी गोल्‍ड असे दोन गट करण्‍यात आले होते. डिंपल गजभिये सिल्‍व्‍हर गटात सहभागी झाल्‍या होत्‍या.

31 वर्षीय डिंपल या नागपुरातील वनराई नगर, मानेवाडा येथील रहिवासी असून मध्‍य रेल्‍वेच्‍या डीआरएम कार्यालयातील कंट्रोल ऑफिस मध्‍ये कार्यरत आहेत. लहानपणापासूनच त्‍यांना फ‍िटनेसची आवड असून 2019 मध्‍ये झालेल्‍या मॅरॅथॉनमध्‍ये त्‍या उपविजेत्‍या ठरल्‍या होत्‍या. संगीत, मॉडेलिंग, ड्राइंगची आवड असलेल्‍या डिंपल यांनी मिसेस वेस्‍ट इंडिया इम्‍प्रेस ऑफ इंडिया सौंदर्य स्‍पर्धेत झालेल्‍या फे-यांमध्‍ये आपण किती फिट आहोत हे सिद्ध केले. त्‍या म्‍हणतात, नोकरी व कौटुंबिक जबाबदा-यामुळे मला कोणताही विशिष्‍ट डायट प्‍लॅन अंगिकारणे शक्‍य झाले नाही. पण योग्‍य, पौष्टिक आहार घेण्‍यावर मी भर दिला आणि तेलकट, मसालेदार पदार्थ टाळले. त्‍यामुळेच मला फिट राहता आले.

डिंपल यांना पहेल ही एक मुलगी असून तिलादेखील विविध स्‍पर्धांमध्‍ये आणि परीक्षांमध्‍ये सहभागी होण्‍यासाठी त्‍या प्रोत्‍साहन देतात. डिंपल यांनी आपल्या यशाचे श्रेय दिवा पिजेंट्सचे आयोजक अंजना मॅम आणि कार्ल मस्कारी यांना तसेच, त्यांचे पती रेल्‍वेत कार्यरत असलेले सुरज गजभिये, मुलगी पहेल यांच्‍यासह वरिष्‍ठ त्रिलोक जिवने व सर्व रेल्वे कर्मचा-यांना दिले आहे.

 

 

 

विनय अरान्‍हा हे या स्‍पर्धेचे प्रमुख प्रायोजक होते तर जहांगीर ओरा केअर डेंटल सेंटर सहप्रायोजक होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्‍हणून केंद्रीय राज्‍यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांची उपस्थित होते. अभिनेत्री महक चहल, अभिनेत्री ब्रुना अब्‍दुल्‍ला, सुहानी मॅडोन्‍सा, डिझायनर ग्‍वेन डी, विवेक मॅडोन्‍सा हे प्रख्‍यात परीक्षक लाभले. या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेते अमन वर्मा यांनी केले होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या