फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपूरची निवडणूक,मुस्लिम मते आणि दावे-प्रतिदावे

नागपूरची निवडणूक,मुस्लिम मते आणि दावे-प्रतिदावे

Advertisements


गडकरींना मिळणार सत्तर टक्के मुस्लिम मतांचा दावा ठरणार का फोल?

नागपूर,ता.१७ एप्रिल २०२४ : लोकसभा निवडणूकीचा प्रचार नागपूर,रामटेकसाठी आज सायंकाळी ६ वाजता थांबला असून, परवा शुक्रवार म्हणजे जुम्मेच्या दिवशीच मतदान होणार आहे.नागपूरात यंदा सर्वाधिक चर्चा राहीली ती मुस्लिम मते ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांना मिळणार असल्याची.या संदर्भात गडकरी यांचे सुपुत्र सारंग गडकरी यांचा एक व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ते मुस्लिम बांधवांना गडकरी यांना मत देण्यासाठी आवाहन करताना,नागपूरची ही सीट कधीही भाजपची नव्हतीच व फक्त गडकरी यांच्यामुळे ही सीट भाजपला जिंकता आल्याचा दावा करीत आहेत.गडकरी यांनी कधीही जात,धर्म,पंथ,भाषा किवा पक्षीय राजकारण केले नसल्यामुळे मुस्लिमांनी गडकरी यांना मतदान करावे,असा रोख त्या व्हिडीयोमधील आवाहानाचा होता.

यंदा काँग्रेस पक्षाने पश्‍चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी घोषित केली.विशेष म्हणजे काँग्रेसमधील सर्वच गटा-तटाचे नेते हे विकास ठाकरे यांच्या निवडणूकीची प्रचार धुरा आपल्या खांद्यावर घेऊन नागपूरच्या रस्त्यांवर उतरलेले दिसून पडले. नुकतेच ईद निमित्त गडकरी यांनी मोमिनपुरा येथे जाऊन ईदच्या शुभेच्छा मुस्लिम बांधवांना दिल्या तर टेका येथून त्यांची प्रचार रॅलीही गेली.गडकरी यांनी मागील दहा वर्षात नागपूर शहराचा केलेला विकास व त्यांचे भेदभाव रहीत राजकारणी व्यक्तीमत्व बघता,यंदा त्यांना मुस्लिम बहूल भागातून देखील प्रचंड प्रतिसाद मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.

गडकरींचा विजय हा दीड ते दोन लाखांच्या जवळपास असणा-या मुस्लिम मते मिळण्यावर तसेच तेवढेच प्राबल्य असणा-या आंबेडकरी मतांच्या विभाजनावर निर्भर असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करतात.एकूण दहा वर्षांंच्या कारभाराचा हिशेब जनतेला यंदा नागपूरचे लोकप्रतिनिधी म्हणून गडकरी यांनाच द्यायचा आहे त्यात यंदाच्या निवडणूकीत मतदान करणारे नागपूरातील २२ लाख मतदारही सहभागी असून यात दीड ते दोन लाख मतदार हे मुस्लिम समाजाचे आहेत.गडकरी यांना २०१ टक्के तर कोणी ७० टक्के मतदान मुस्लिम समजाचे मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.

‘सत्ताधीश’ने आज मुस्लिम बहूल असणारा टेका नाका येथील मुस्लिमांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता काही मुुस्लिम बांधवांनी गडकरी यांच्यावर तर काहींनी त्यांच्या भाजप पक्षातील एक सर्वेसर्वा असणारे अमित शहा यांच्यावर कठोर टिका केली.
दावा केला जात होता की सव्वा दोनशे कोटींचा खर्च करुन ताजाबादचा विकास गडकरी यांच्या पुढाकारातून झाला असल्यामुळे मुस्लिम समाज हा गडकरी यांच्यावर प्रचंड खुश आहे,त्यामुळे देखील यंदा मुस्लिम मते गडकरींकडे वळतील.

मात्र,‘सत्ताधीश’ला ज्या स्वरुपाचा फिडबॅक मुस्लिम बहूल भागातून मिळाला त्यातून यंदाच्या निवडणूकीत गडकरी यांच्या मागे सत्तर टक्के मुस्लिम समाज उभा असल्याचा दावा ‘फोल’ ठरला आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे गडकरी यांचा एक जुना व्हिडीयो मुस्लिम बहूल भागातील प्रत्येक मुस्लिमांच्या मोबाईलवर दिसून पडतोय ज्यामध्ये ते या समाजासाठी एक अपशब्द वापरत असल्याचे दिसून पडतंय.

परवाच्या मतदानानंतर भाजपचे गडकरी तसेच काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यापैकी कोणत्या समाजाची किती मते ही कोणाच्या बाजूने झुकली व त्यांच्या जय-पराजयासाठी कारणीभूत ठरली हे ४ जून रोजी कळमना येथे होणा-या मतमोजणीनंतरच उलगडणार आहे.तूर्त तरी मुस्लिम मते ही कधीही भाजपची मतपेढी नव्हती व नसणार असेच चित्र उमटले आहे.
……………………………….

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या