फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपूरचा काव्य अग्रवाल ठरला भगवद् गीता लिहणारा सर्वात छोटा लेखक

नागपूरचा काव्य अग्रवाल ठरला भगवद् गीता लिहणारा सर्वात छोटा लेखक

Advertisements


वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी भगवद् गीता लिहून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले नाव

नागपूर,२९ डिसेंबर २०२१: आपल्या नागपूर शहराचा लिटिल वंडर १० वर्षीय काव्य अग्रवाल ने अनेक विक्रम रचले आहेत! काव्यने ‘किडटास्टिक’ नावाची भगवद् गीता लिहली असून, असे करणारा काव्य हा सर्वात छोटा लेखक बनला आहे. ‘किडटास्टिक‘ मध्ये, काव्य ने भगवद् गीतेच्या श्लोकांचा अर्थ सांगितला आहे, अध्यायांचे स्वतःच्या शब्दात भाषांतर केले आहे आणि प्रत्येक अध्यायातून ‘काव्य काय शिकला’ हे देखील लिहले आहे.

आज प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना काव्य म्हणाला की, लहान वयातच भगवद् गीतेबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याकडे त्याचा कल होता. नंतर त्याने भगवद् गीतेवरील कार्यशाळा पूर्ण केली, ज्याने त्याला संस्कृत श्लोक शिकण्यास आणि वाचण्यास आणि भगवद् गीतेचे विविध आयाम समजून घेऊन संशोधन करण्यास प्रेरित केले.

आई-वडील आणि आजी-आजोबांच्या पाठिंब्यामुळे काव्यला पुस्तक लिहिण्यास प्रोत्साहन मिळाले. काव्य जिथे जातो तिथे तो आपल्या भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सोबत घेऊन जातो. काव्यने मूर्तीशी एक जवळीक साधली आहे आणि काव्यचा असा विश्वास आहे की मूर्ती त्याला आयुष्यात चांगले काम करण्यासाठी प्रेरित करते.

काव्यने स्वतःच्या व्हिज्युअलायझेशनद्वारे पुस्तकाच्या डिझाइनमध्ये योगदान दिले आहे. पुस्तक वाचताना मुलांची आवड लक्षात घेऊन काव्यने रंगीबेरंगी चित्रे, भगवान कृष्णाच्या कथा आणि रंगरंगोटीची जागा समाविष्ट केली आहे.

भगवद् गीता आणि भगवान कृष्ण हे आपली प्रेरणा आहेत असे काव्यचे मत आहे. त्याला मार्गदर्शन करण्यात आणि पुस्तक लिहिण्यात या पवित्र धार्मिक ग्रंथाचा मोलाचा वाटा आहे. काव्य सांगतो की भगवद् गीता ही जगभरातील मानवांच्या समस्यांवर उपाय आहे.

काव्यचे आई-वडील रश्मी अग्रवाल आणि राज अग्रवाल यांनी काव्यला त्याच्या सर्व उपक्रमांमध्ये साथ दिली आहे. तसेच त्याचे आजोबा महेश आणि आजी मीना अग्रवाल आणि आजी-आजोबा अनिता आणि महेंद्र अग्रवाल हे काव्यच्या संस्कृत आणि शास्त्रांकडे असलेला कल बघता अतिशय आनंदी आहेत.

संस्कृत भाषेतील त्याच्या अनेक कर्तृत्वाव्यतिरिक्त, काव्य उत्कृष्ट चित्रकार आहे आणि बंगाल बोर्डाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये तो विजयी झाला आहे. बंगाल बोर्डातून शास्त्रीय संगीताची परीक्षाही त्याने दिली आणि जिंकली. काव्य गिटार खूप छान वाजवतो. काव्य सार्वजनिक वक्ता आहे आणि इंग्रजी भाषेवर त्याचे या वयातच चांगले प्रभूत्व आहे. काव्य संस्कृत श्लोक आणि कवितेचे सादरीकरण करतो. तो योगाचा राष्ट्रीय विजेता देखील आहे.

काव्यला इतरही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे ज्यात-
• सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट पुणे द्वारा “ग्रोथ आयकॉन”. हा पुरस्कार भगवद् गीता या ग्रंथाशी संबंधित आहे.
• ससंस्कृत राष्ट्रीय ऑलिम्पियाड, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र आणि २५ हजारांचे रोख पारितोषिक.
• संस्कृत श्लोक पठणासाठी इंडिया स्टार आयकॉन किड्स अचिव्हर अवॉर्ड
• ऑक्सफर्ड बिग रीड, जागतिक विजेता. यामध्ये काव्यला आयपॅड देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षी याच स्पर्धेत तो उपविजेता ठरला होता.

काव्यचं पुस्तक ऑनलाइन उपलब्ध आहे. (https://www.amazon.in/dp/8195181805/ref=cm_sw_r_apan_glt_fabc_16PTPFKVM2QJDP5ZKBWK)

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या