(अतिथीस्तंभ)

[शिवानी दाणी वखरे]
मागील काही दिवसांपासुन सतत एक नेरेटिव्ह सेट करण्याच्या प्रयत्न होतो आहे की ज्यात महाविकास आघाडी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की सुशिक्षित नागरिक किंव्हा मतदार हा भाजपा परिवार पासुन दुरावत चाललेला आहे. पण नुकत्याच झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठच्या अधिसभा (सिनेट) निवडणुकीमध्ये जो निकाल लागला तो सर्वांसाठी आश्चर्यजनक नव्हता.
महाविकास आघाडीला नक्कीच आरसा दाखविणारा होता आणि १० पैकी ८ उमेदवार हे अभाविप व शिक्षण परिषदेचे विजयी झाले आणि १ च उमेदवार हा महाविकास आघाडीचा विजयी झाला व तो पण उमेदवार महाविकास आघाडीचा नसुन तो सग्राम परिषदेचा मुळ कार्यकर्ता आहे. एकुणच महाविकास आघाडीची त्याला काय मदत झाली किंव्हा कुठली ही रचना त्यांच्या मदतीला आली हे नागपुरने काल मतमोजणीमध्ये नक्कीच पाहिले.
वरूण सरदेसाई असतील किंव्हा इतर नेते असतील जे नागपुरात गेल्या अनेक दिवसांपासुन ठाण मांडुन बसले होते पण त्यांचा कुठलाही फायदा हा त्यांच्या पक्षाला झालेला दिसलेला नाही. त्यांच्याकडे बैठक घेणारे नुसते कार्यकर्ते होते पण कुठल्याही मतदारांनी त्यांना साथ न देता त्यांच्याकडे पाठ फिरवली हे काल झालेल्या मतगणनेमुळे सर्वांसमोर जाहीर झाले. महाविकास आघाडीचा कुठला ही प्रभाव हा सुशिक्षित उमेदवारांवर नसुन मतदारांनी त्यांच्याकडे सपशेल पाठ फिरवली आहे, त्यांना मतदारांनी नकार दिलेला आहे हे या निवडणुकांमधुन जाहीर झाले.
महाविकास आघाडी ही फक्त नरेटिव्ह सेट करते आहे की सुशिक्षित मतदार हा भारतीय जनता पार्टी सोबत नाही आहे. पण ज्या मताधिक्याने प्रवर्गाच्या ५ ही सीट निवडुन आल्या आणि खुल्या प्रवर्गाच्या ३ सीट निवडुन आल्या व ४ थी सीट ही अगदी थोड्या फरकाने आम्ही गमावली ती पण सीट आम्ही निवडुन येऊ शकलो असतो. आम्ही राजकारणात कुठेतरी कमी पडलो. पण ऐकीकडे ८ सीट आमच्या व महाविकास आघाडीची नावसाठी एक सीट मुळात १ ही सीट नाही हे थेटपणे सांगते की सुशिक्षित मतदार हे कोणाच्या सोबत आहेत व सुशिक्षित मतदारांची काय मानसिकता आहे हे दिसले.

महाविकास आघाडी जे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करते आहे त्याला हा विजय छेद नसुन सणसणीत चपराकच आहे हे यावरून सिद्ध झालेले आहे. यात भारतीय जनता युवा मोर्चाचे दोन पदाधिकारी खुल्या प्रवर्गामध्ये विष्णु वसंत चागदे आणि राखीव प्रवर्गामध्युन वामन तुर्के हे दोन उमेदवार युवा मोर्चाचे पदाधिकारी म्हणुन सिनेट निवडणुकीत उमेदवार होते. दोघेही मोठ्या मताधिक्यांने विजयी झाले. तसेच विष्णु वसंत चांगदे हे विद्यापीठामध्ये सर्वात जास्त १ नंबरचे मत घेऊन निवडुण आले. कश्याप्रकारे सुशिक्षित युवक त्यांच्या मागे आहेत हेच यावरून सिद्ध झालेले आहे.
ही निवडणुक आम्ही भाजपा शहर अध्यक्ष. आ. प्रविण दटके यांच्या मार्गदर्शनात लढवली होती. निवडणुकीचे पालक संजय बंगाले, सह-निवडणुक प्रमुख विकास बुंदे, विधानसभा निहाय निवडणुक प्रमुख अण्णा पालकर, गोपल बोहरे, सतिराम सेलोकर, विनायक डेहणकर, विनोद कडु व भोलानाथ सहारे यांनी निवडणुक यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता अधिक महेनत घेतली.
भारतीय जनता पार्टी, अभाविप आणि शिक्षक परिषद व विद्यापीठ शिक्षण मंचने या निवडणुकीत विजयासाठी हातभार लावला त्यांचे खुप खुप अभिनंदन व खुप खुप आभार.
[शिवानी दाणी वखरे]
[प्रदेश प्रवक्ता, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
निवडणुक प्रमुख, रातुम विद्यापीठ सिनेट निवडणुक
महामंत्री, भाजयुमो महाराष्ट्र]
………………………………

आमचे चॅनल subscribe करा