फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपुरात करोनाचा पहिला बळी: सतरंजीपुरा भाग सील करण्याचे आदेश

नागपुरात करोनाचा पहिला बळी: सतरंजीपुरा भाग सील करण्याचे आदेश

Advertisements

नागपुर : नागपुरात ६८ वर्षीय वृद्धाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. नागपुरातला करोनामुळे झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. या रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने मेयो रुग्णालयात ४ एप्रिल रोजी दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णाला रुग्णालयात आणण्यात आल्यापासून त्याच्याजवळ कुणीही नातेवाईक आले नाहीत. त्यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतरही नातेवाईक आले नाहीत. पोलिसांसह आरोग्य विभागातील कर्मचारी मृत रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचां शोध घेत आहेत.

हा ६८ सतरंजीपुरा भागातील आहे. त्यामुळे सतरंजीपुरा हा भाग सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाग्रस्तांची देशातली संख्या ही ४ हजाराच्या वर गेली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या ८०० च्या वर गेली आहे. रुग्णसंख्या वाढणं हा चिंतेचा विषय ठरतो आहे. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून १४ एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे.

सतरंजीपूरा येथील बडी मस्जीद परिसरातील एका ६५ वर्षीय नागरिकाचा करोनाची बाधा झाल्याने रविवारी रात्री ११ च्या सुमारास इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्या घशातील स्त्रावाचा अहवाल सोमवारी सकारात्मक आल्याने यावर अधिकृत शिक्कामोर्बत झाले. त्यामुळे नागपुरातील हा करोनाचा पहिला बळी ठरला आहे. यातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे या करोनाबाधिताला कोणत्याही प्रवासाची पार्श्वभूमी नाही. त्यामुळे हा समुदाय प्रादुर्भावाचा पहिला बळी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सतरंजीपूरा येथील बडी मस्जीद परिसरातील ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला नातेवाईकांनी शनिवारी रात्री इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या दाखल केले होते. नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात आणल्यानंतर, त्याला जुलाबाचा त्रास होत असल्याचे सांगत दाखल करून घेण्यास दबाव आणला होता. मात्र त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे पाहून ही करोनासदृश्य आजाराची प्राथमिक लक्षणे असल्याने रुग्णालयाने त्याला तातडीने करोना वॉर्डात दाखल केले होते. याच दरम्यान उपचार सुरू असताना रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्याचे निधन झाले.

करोनासदृश्य आजाराचा संशय असल्याने तातडीने त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यानंतर मृतदेह मेयोतील शवागारात ठेवण्यात आला. त्याच्या घशातील स्रावाची सोमवारी प्राधान्यक्रमाने तपासणी करण्यात आली. त्यात त्याच्या नमुन्यात करोना विषाणूचा अंश आढळला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या