फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपुरातील क्रीडांगणांच्या विकासासाठी १५० कोटी : फडणवीस

नागपुरातील क्रीडांगणांच्या विकासासाठी १५० कोटी : फडणवीस

Advertisements
खासदार क्रीडा महोत्सवाचा थाटात समारोप

पॅरालिम्पिक युवा खेळाडू शीतल देवी यांची विशेष उपस्थितीत
नागपूर,२ फेब्रुवरी २०२५: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला खासदार क्रीडा महोत्सवामुळे खेळाडूंना व्यासपीठ मिळाले आहे. शहरातील क्रीडा मैदानांच्या विकासासाठी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी सहकार्याची मागणी केली. त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्य सरकारकडून नागपूर शहरातील क्रीडांगणांच्या विकासासाठी १५० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सर्वात तरुण भारतीय पॅरालिम्पिक पदक विजेती शीतल देवी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटर मोहित शर्मा यांची उपस्थिती होती. मंचावर आमदार प्रवीण दटके, जेसीबी इंडियाचे उपाध्यक्ष जसमीत सिंग, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, माजी सुधीर दिवे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, सर्व क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते
पुढे बोलताना मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस म्हणाले, गडकरी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून शहरातील क्रीडा विकासाला नवा आयाम दिला आहे. सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून  गडकरी यांनी शहरातील कलाकार आणि खेळाडूंना प्रतीभा सादर करून पुढे जाण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला. खेळाडूंनी क्रीडा स्पर्धांमध्ये जय-पराजयाची चिंता न करता मनापासून आपली प्रतिभा सादर करावी, असे आवाहन देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनावरून उपस्थितांनी मोबाईलचे फ्लॅश लाईट लावून  नितीन गडकरी यांचे आभार मानले. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी यांनी रिमोटची बटन दाबून खासदार क्रीडा महोत्सवाच्या सातव्या पर्वातील क्रीडा ज्योत शांत केली. हंबीरराव मोहिते यांनी खासदार क्रीडा महोत्सवाचा ध्वज सन्मानपूर्वक खाली उतरवला.
पुढील वर्षी एक लाख खेळाडूं खेळणार : नितीन गडकरी 
शहरातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतून खासदार क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली. यावर्षी १२ जानेवारी २०२५ ला खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले. २० दिवस शहरातील ७३ क्रीडांगणांवर ५८ खेळांच्या स्पर्धा पार पडल्या. विविध ५८ खेळांच्या तब्बल २९०० चमू, ६००० ऑफिसियल्स, ८० हजार खेळाडूंचा महोत्सवात समावेश होता. एकूण १३१०० स्पर्धा खेळविण्यात आल्या यात खेळाडूंना १२३१७ मेडल्स आणि ७६२ ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना १ कोटी ५० लक्ष रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. यात मराठा लॉन्सर्स आणि भारत व्यायाम शाळा यासारख्या संस्थांना सन्मानित करण्यात आले. खासदार क्रीडा महोत्सवामुळे खेळाडूंना होत असलेला लाभ पाहता विदर्भातील वेगवेगळ्या भागातून स्पर्धांमध्ये सहभागाविषयी मागणी येत असते. पुढील वर्षी महोत्सवामध्ये जास्तीत जास्त खेळ विदर्भस्तरीय घेण्याची सूचना खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक गडकरी यांनी केली. पुढील वर्षी खासदार क्रीडा महोत्सवात एक लाख खेळाडू सहभागी होतील, अशी घोषणा देखील त्यांनी केली.
पराभवाने मागे वळून पाहू नका : शीतल देवी 
खेळामध्ये जय-पराजय हे ठरलेले असते त्यामुळे पराभवामुळे खचून जाऊ नका, मागे वळून पाहू नका, असा मंत्र सर्वात तरुण भारतीय पॅरालिम्पिक पदक विजेती शीतल देवी यांनी खेळाडूंना दिला. यावेळी त्यांनी आपल्या कारकीर्दीबद्दल माहिती दिली. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहनाची गरज असते पण अनेक लोकांकडून निराशा केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. क्षमता प्रत्येकामध्ये असते फक्त मेहनतीची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.

पराजयाची भीती नको, खेळ एंजाॅय करा : मोहित शर्मा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटर मोहित शर्मा यांनी खेळाडूंना पराभवाची चिंता न करता खेळ एंजाॅय करण्याचे आवाहन केले. त्यांनी खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे आभार मानले व अभिनंदन केले.
खासदार क्रीडा महोत्वाच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये सुनील रायसोनी यांना उत्कृष्ट क्रीडा संघटक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठा लॉन्सर्स आणि भारत व्यायाम शाळा यांना उत्कृष्ट क्रीडा संघटन पुरस्काराने गौरविण्यात आले. यासोबतच तिरंदाजी स्पर्धेचे प्रशिक्षक मोहम्मद झिशान, बॅडमिंटन प्रशिक्षक किरण माकोडे आणि दिव्यांग क्रीडा स्पर्धांमधून अनेक खेळाडूंना नवी दिशा देणारे विनय उपासनी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सर्वांना प्रत्येकी ५१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. यावर्षी विविध खेळांच्या २९ खेळाडूंना क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. या खेळाडूंना प्रत्येकी ३१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविकमध्ये संदीप जोशी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या आतापर्यंतच्या प्रवासाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन आरजे आमोद यांनी केले व आभार खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर यांनी मानले. कार्यक्रमात सुरुवातीला श्री सागर यांनी बहारदार गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
खासदार क्रीडा महोत्सव-७चे क्रीडा भूषण पुरस्कार विजेते-
सुनिल भास्कर पांडे (आट्या-पाट्या), हर्षल विलास चुटे योगा, सिया देवधर (बास्केटबॉल), प्रांजल पवन खोब्रागडे (कुस्ती), रोहन रवि गुरबानी (बॅडमिंटन), मनिषा रायसिंग मडावी (खो-खो), नेहा विशाल ढबाले (अॅथलेटिक्स), मिताली दिपक भोयर (मॅरेथॉन), मृणाली प्रकाश पांडे (दिव्यांग (ब्लाइंड बुद्धीबळ)), प्रतिक मंगेश मोपकर (टेबल टेनिस (एम.आर)), निधी विनोद तरारे (मुकबधिर (अॅथलेटिक्स)), हेरंभ सुरज पोहाणे (लॉन टेनिस), श्री. साईप्रसाद राजेन्द्र काळे (ज्युदो), हिमानी शरद गावंडे (हॉकी), अनन्या लोकेश नायडू (रायफल शुटींग), क्षितीजा नरेन्द्र सावरकर (कबड्डी), रहनुमा सरवर आलमशेख (सॉफ्टबॉल), दिग्विजय शरद आदमने (स्वीमींग), नील शैलेन्द्र हिंगे (धनुर्विद्या), समक्षा प्रदिप सिंग (बॉक्सींग), विवान विजय सारोगी (बुद्धीबळ), ईशान प्रशांत काळबांडे (जिमनॅस्टिक), कस्तुरी दिनेश ताम्हनकर (स्केटिंग), यश शुक्ला (फुटबॉल), ओम महेन्द्र मारशेट्टीवार (तायक्वाँदो), शहनवाज खान (सेपक टॅकरा), स्नेहल जोशी (ट्रायथोलॉन), रूतीका व्ही. अरायकर (कराटे), निखिल विलास लोखंडे(कॅरम)
…………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या