

संविधान चौकात भाजपचे निषेध आंदोलन
नागपूर: काँग्रेसच्या नाकर्त्या सरकारने राफेल मुद्दावर सर्वोच्च न्यायालयाचा तो अपमान केला आहे, स्वच्छ प्रतिमेचे आणि पारदर्शी कारभार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राफेलच्या संदर्भात जे खोटे आरोप केले त्याबद्दल राहूल गांधी व त्यांच्या काँग्रेस पक्षाने देशातील एकशे पसतीस कोटी जनतेची माफी मागावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष् प्रवीण दटके यांनी केली.
शनिवार दि. १६ नोव्हेंबर रोजी संविधान चौकात त्यांच्या नेतृत्वात ‘निषेध’आंदोलन करण्यात आले.यात बहूसंख्येने भाजपचे नेते,पदाधिकारी,नगरसेवक व कार्यकर्ते यांचा समावेश होता. काँग्रेस व राहूल गांधी यांच्या विरोधात यावेळी जोरदार नारेबाजी करण्यात आली.याप्रसंगी दटके म्हणाले,की देशातील वैमानिक असलेला सैनिक हा वाचला पाहीजे, सैन्याला अद्यावत तंत्रज्ञानाचे विमान मिळाले पाहिजे, यासाठी स्वत: काँग्रेस सरकारने यूपीए-१ व यूपीए-२ च्या दहा वर्षांच्या कार्यकाळात काहीच केले नाही उलट राफेलची डील ही मध्यस्थांसाठी लटकवली गेली. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या काँग्रेस पक्षाने बोफोर्स घोटाळा केला, टू-जी घोटाळा केला, महाराष्ट्रात ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला,राफेलसाठी देखील त्यांनी मुद्दामून देशाच्या हिताचा असणारा हा करार लटकवला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याची गरज लक्षात घेऊन आणि देशाच्या सुरक्ष्ेसाठी कोणत्याही मध्यस्थाला जागा न देता फ्रांस सरकारसोबत सरळ करार केला.
लोकसभेच्या निवडणूकीत काँग्रेसचे अध्यक्ष् राहूल गांधी यांनी तर दर वेळी प्रचार करताना राफेलची किंमत वेगवेगळी सांगितली.एवढेच नव्हे तर राफेल कराराच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेत मात्र न्यायालयाने पंतप्रधानांना क्लिीन चिट दिली. पुन्हा काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली या ही वेळी ते तोंडघशी पडलेत, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला राफेल करारात सीबीआय चौकशीची कोणतीही गरज नाही, परिणामी राहूल गांधी आता देशाची माफी मागतील का?असा सवाल त्यांनी केला.‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही‘राहूल गांधी यांचे वर्तन अशाच प्रकारचे असल्याचा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रात काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परवा पुन्हा राफेल प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली.काँग्रेस पक्ष् आणि या पक्ष्ाचे नेते हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत का?याचे उत्तर त्यांनी देशातील जनतेला द्यावे. ज्या पंतप्रधानांना देशानेच नव्हे तर जगाने स्वीकारले त्या नेत्याचीच नव्हे तर देशाची बदनामी सातत्याने करण्याचे काम जगात काँग्रेस पक्ष् ,या पक्षाचे अध्यक्ष् आणि या पक्षाचे नेते करीत आहेत,भारतीय जनता पक्ष् त्यांच्या या कृतीचा निषेध करतो व त्यांना आव्हान करतो त्यांनी आपल्या स्वार्थासाठी देशाची जी दिशाभूल केली त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची तसेच देशाच्या एकशे पसतीस कोटी जनतेची माफी मागावी.
यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन ‘नही चलेगी झूठ की आंधी…माफी मांगो राहूल गांधी’जन जनता श्योर है..केंद्र सरकार प्योर है’‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’’भारत माता की जय’ ‘सच्चाई का फिर अपमान..नही सहेगा हिंदुस्थान’,‘देशभक्तो का नारा है..भारत प्राणो से प्यारा है’ ‘झूठे प्रचार की रोको आंधी..शर्म करो राहूल गांधी’मुर्दाबाद मुर्दाबादच्या घोषणांनी संविधान चौक परिसर दणाणला. निषेध मोर्च्यात महापौर नंदा जिचकार,उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी महापौर अर्चना डेहनकर, विक्की कुकरेजा,नगरसेविका वर्षा ठाकरे, प्रगती पाटील यांच्यासह समस्त पदाधिकारी व युवा मोर्च्याचे कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसने घेतले टूकडे-टूकडे गँगचे वकीलपत्र-आ.अनिल सोले
गेल्या आठ दिवसात सर्वोच्च न्यायालयाने देशातील अनेक महत्वपूर्ण मुद्यांवर निकाल जाहीर केले त्यात एक मुद्दा हा राफेलचा होता.याहीवेळी सर्वोच्च न्यायालयाने या करारात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही असा निकाल दिला मात्र हा निकाल मान्य न करता टूकडे-टूकडे गँगचे समर्थक असणारे व देशाच्या विरोधकांचे वकीलपत्र घेणारे ॲड.प्रशांत भूषण,आपचे संजय सिंह हे पुर्नविचार याचिका घेऊन सर्वोच्च न्यायालयात गेले. याही वेळी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी निर्णय देताना करारातील तांत्रिक बाजू एंजसींनी तपासून निर्णय घेतला असून यावर पुन्हा आदेश देण्याची गरज नसल्याचा निकाल दिला.भाजपच्या दिल्लीतील नेत्या ॲड.मीनाक्ष्ी लेखी यांनी देखील राहूल गांधी लोकसभा निवडणूकीत करीत असलेल्या भ्रामक व खोट््या प्रचाराच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.कोणताही आधार नसताना राहूल गांधी यांनी लोकसभा निवडणूकीत ’ राफेल’हा भाजपची बदनामी करण्यासाठी प्रचाराचा मुद्दा बनवला. त्यांचे खोटे आता उघडे पडले आहे.
काँग्रेस पक्षाने ७० वर्षात अनेक मुद्दे हे टांगणीला लटकवून ठेवले होते.राफेल करारात देखील दहा वर्षे बोलणी करुन देखील एजेंसी फिक्स करण्यात वेळ घालवला. दहा वर्षे देशाचे सैन्य हे नव्या तंत्रज्ञान आणि नव्या यंत्रापासून वंचित राहीली.एकीकडे चीन सारखा शक्तीशाली शत्रू तर दुसरीकडे पाकिस्तानसारखा परंपरागत शत्रू भारताच्या डोक््यावर असताना त्यांना उत्तर देण्यासाठी सैन्याला मजबूत करणे गरजेचे असताना काँग्रेसने फक्त भ्रष्टाचार केला.युपीए-१ व युपीए-२ ही भ्रष्टाचाराने बरबटलेली होती. आपलं म्हणनं खरं आहे हे पटवून देण्यासाठी राहूल गांधी यांनी तर चक्क सर्वोच्च न्यायालयाचाच आधार घेतला.याच विरोधात भाजप नेत्या ॲड.मिनाक्ष्ी लेखी यांनी दाद मागितली असता राहूल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयात ‘लेखी माफिनामा’ लिहून द्यावा लागला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करणारे राहूल गांधी व काँग्रेसच्या नेत्यांव कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे.सर्वोच्च न्यायालयाचा आधार घेऊन राहूल गांधी यांनी असत्य गोष्ट सत्य भासवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्ष्ाने,राहूल गांधींनी,सोनिया गांधींनी एवढे मोठे बदनामीचे कारस्थान रचले,नरेंद्र मोदी सरकारला बदमान करण्याचे काम केले,हा सामाजिक गुन्हा आहे. राहूल गांधींच्या वक्तव्यांचा आधार पाकिस्तानने घेतला,त्यांनी देशाची माफी मागितलीच पाहिजे म्हणून हे निषेध आंदोलन करण्यात आले.
राहूलप्रमाणेच महाराष्ट्रातही बालिश नेता-धर्मपाल मेश्राम
देशाला संविधान देणारे डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरच भाजपतर्फे संविधानाचा व सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करणारे राहूल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी नेत्यांनी रेटून धरली. देशाच्या इतिहासात पहील्यांदा भ्रष्टाचाराचा एवढा गंभीर आरोप भाजप सरकारवर लावण्यात आला.राहूल गांधी हे ‘बालिश ’आहेत त्यांच्याचसारखे बालिश नेता सध्या महाराष्ट्रातही दिसून पडतोय,असा टोला भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष् धर्मपाल मेश्राम यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता हाणला.असे बालिश नेते संवैधानिक देशाला स्वीकार्य नाहीत मग ते राहूल गांधी असोत किंवा आणखी कोणी . महाराष्ट्राच्या बारा काटी जनतेवर आताही बालिश नेता थोपवण्याचा प्रयत्न चालला आहे,असे बोलून सध्याच्या सत्तानाट््यावर त्यांनी भाष्य केले. राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाने सारे सत्य बाहेर आले. ‘एक-विधान-एक संविधान-एक निशान’साठी श्यामकांत मुखर्जी बलिदान झाले.दीनदयाल उपाध्येय यांनी काश्मीरमधील परमिट राज संपवण्यासाठी लढा दिला. काल परवाचे बालिश नेते यांना हे बलिदान समणार आहे का?नुकतेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष् शरद पवार हे नागपूरात येऊन गेलेत. उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत यांच्या घरी जाणारे पवार यांना नामांतरणाच्या लढ्यात जी २७ प्राणाहूती गेली त्या शहीदांच्या स्मारकाला भेट देण्याचा वेळ मिळाला नाही किवा त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या काळात याच ठिकाणी जे ११४ गोवारी बळी गेलेत ज्यात सर्वाधिक महिला व लहान मुले होती,त्या स्मारकाला देखील त्यांनी भेट दिली नाही,ही या देशाची नेते मंडळी आहे,अशी आगपाखड त्यांनी केली.युवा मोर्चाच्या अध्यक्षा शिवाणी दाणी यांनीही राहूल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवित त्यांनी नागपूरच्या जनतेची नव्हे देशाच्या जनतेची माफी मागावी,अशी मागणी केली. २०१९ च्या निवडणूकांमध्ये जे घडले त्यापेक्षाही वाईट अवस्था काँग्रेसची होईल,असा इशारा ही दिला.




आमचे चॅनल subscribe करा
