

९ ऑगस्ट क्रांती दिनी करणार बेमुदत उपोषण
नागपूर,ता. २६ जुलै: मंगळवारी तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी आम आदमी पार्टीने साई मंदिर नवी मंगळवारी तलाव येथे आंदोलन केले.
उत्तर नागपूर प्रभाग ५ अंतर्गत नवी मंगळवारी भागात सुमारे ३०० वर्ष जुना तलाव असून गेल्या २० ते ३० वर्षापासून हा तलाव दुर्गंधीयुक्त झाला असून रोगराईस आमंत्रण देणारा ठरला आहे . हा तलाव पूर्वी तीन एकर परिसरात होता . या तलावाचे पाणी परिसरातील लोक पिण्यासाठी वापरत होते . कालांतराने तलावाच्या आजूबाजूस अतिक्रमण झाल्यामुळे तलाव फारच लहान झालेला आहे . या तलावात गडर लाईनचे पाणी तसेच आजूबाजूची घाण, कचरा व निर्माल्य टाकण्यात येत असल्यामुळे तलाव दूषित झाला आहे . यामूळे परिसरातील नागरिकांना अनेक प्रकारच्या आजाराशी सामना करावा लागत आहे .

तलावाची स्वच्छता व सौंदर्यीकरण करण्याकरिता येथील नागरिकांनी स्थानिक नगरसेवक , स्थानिक आमदार व खासदारांना व मनपा अधिकारी यांना निवेदने दिलीत परंतू याकडे दुर्लक्ष केल्या गेले .यापूर्वी २६ मार्चला सहायक आयुक्त सतरंजीपूरा झोन यांना आम आदमी पक्षाचे वतीने निवेदन देण्यात आले . तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यांत आला , परंतू प्रशासनाने निवेदनाला केराची टोपली दाखविली . नागपूरला स्मार्ट सिटी बनविण्याच्या दृष्टिने प्रयत्न केले जात असतांना उत्तर नागपूरातील या ऐतिहासीक तलावाकडे स्थानिक पदाधिकारी व प्रशासनाचे दूर्लक्ष दिसून येते .
आम आदमी पार्टी उत्तर नागपूरचे सह संयोजक विजय नंदनवार यांच्या नेतृत्वात संजय निपाणे अतिरिक्त आयुक्त , नागपूर महानगर पालिका यांना निवेदन देण्यांत आले . सौंदर्यीकरणाच्या कामास सुरुवात झाली नाही तर आम आदमी पक्षाच्या वतीने दिनांक २६ जुलै दुपारी २ ते ४ या वेळात नारे निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला होता. .आज दि. २६ जुलै ला या वेळात नारे -निदर्शने आंदोलन करण्यांत आले.
या उपरोक्त ही कार्यवाही न झाल्यास , ३ ऑगस्ट ला दुपारी १२ ते २ या वेळांत सतरंजीपूरा झोन कार्यालयावर लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यांत येईल व ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून तलावाजवळ बेमुदत साखळी उपोषण करण्यांत येईल असा इशारा देण्यांत आला .
हे आंदोलन नागपूर शहर सचिव भूषण ढाकुलकर नागपूर संघटन मंत्री शंकर इंगोले, उत्तर नागपुर संयोजक रोशन डोंगरे यांच्या मार्गदर्शनात व उत्तर नागपूर संघटन मंत्री प्रदीप पौनिकर, प्रभाग ५ संयोजक विजय नंदनवार, प्रभाग ५ चे सचिव राज कुंभारे यांच्या नेतृत्वात झाले.या ठिकाणी प्रामुख्याने उत्तर नागपूर सचिव गुणवंत सोमकुवर, प्रभाग ५ युवा संयोजक योगेश पराते, उत्तर नागपूर युवा अध्यक्ष स्वप्नील सोनकुँवर उपस्थित होते.
यावेळी आम आदमी पक्षाचे सलीम भाई, पंकज मेश्राम, हरीश वेळेकर, विजय धकाते, आकाश कावळे, प्रभात अग्रवाल, मोरेश्वर मौंदेकर, स्वीटी इंदूरकर, लीना गजभिये, आशा रंगारी, शुभम मोरे, हरीश निमजे, जगदीश गजभिये, मानसिंग अहिरवार, नितेश परसराम, आशिष हातीपर्शॅल, निळकंठ टाकळीकर, मंगेश ढवळे, अमित अंबादे, सोमेश पाटील, किशोर मौंदेकर, गणेश राऊत पदाधिकारी, इतर कार्यकर्ते व परिसरातील इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
