फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनवनर्वाचित बालरोग तज्ज्ञांच्या नागपूर शाखेचा पदग्रहण सोहळा २१ फेब्रूवारीला

नवनर्वाचित बालरोग तज्ज्ञांच्या नागपूर शाखेचा पदग्रहण सोहळा २१ फेब्रूवारीला

Advertisements

आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करू नका: बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनेची सूचना 

नागपूर, ता. १७ : कोरोनाच्या संसर्गानंतर तब्बल वर्षभरानंतर शाळा, महाविद्यालये सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र नुकतेच कोरोनाची दुसली लाट आली असल्याचे चित्र दिसत आहे. या मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास इतरांमध्ये संक्रमणाची गती वाढण्यासाठी मुले कोरोनाचे वाहक ठरू शकतात. तसेच लहान असल्याने त्यांच्यासाठीही धोकादायक ठरु शकते, असा गंभीर इशारा देत आठवीपर्यंतच्या शाळा सूरू करण्यात येऊ नये, अशा सूचना भारतीय बोलरोग तज्ज्ञांच्या संघटनेच्या नवनिर्वाचीत नागपूर शाखेतर्फे करण्यात आल्या आहेत.

नवनर्वाचित बालरोग तज्ज्ञांच्या नागपूर शाखेचा पदग्रहण सोहळा २१ फेब्रूवारीला सकाळी १० वाजता येथील हॉटेल सेंटर पॉंईट येथे आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. विजय धोटे, सचिव डॉ. पंकज अग्रवाल, डॉ.अविनाश गावंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. धोटे म्हणाले, आठवीपर्यंतची मुले कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात सक्षम नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात न घालता क्लब अभ्याक्रमचा पर्याय आहे. शाळा सुरू करू नका. असे सांगताना उर्वतीर ९ ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निकषाचे पालन करीत महाविद्यालये सुरू करण्यात हरकत नाही. संघटनेच्या पुढील वर्षासाठी डॉ.राजकुमार किरतकर यांचा समावेश आहे. तर उर्वरित कार्यकारिणीतील

डॉ. संजय पाखमोडे, डॉ. संजय देशमुक, डॉ. योगेश पापडे, डॉ. अर्चना जयस्वाल, डॉ. निशिकांत दहिवले, डॉ.अमित डहाट, डॉ. अंजू कडू, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. आशिष चांडक, डॉ. आशिष वैद्य,डॉ. आशिष लोथे, डॉ. दिनेश सरोज, डॉ. मीना देशमुख, डॉ.गिरिश चरडे, डॉ. महेश तुरले, डॉ. निलेश कुंभारे, डॉ. प्रीतेश खटवार, डॉ. ऋषी लोढया, डॉ. शिल्पा भोयर, डॉ. स्मिता देसाई, डॉ. सोनिया अरोरा, डॉ. विशाल महंत, डॉ. कुश झुनझुनवाला, डॉ. किर्तीश बालपांडे इत्यादी पदग्रहण करतील. पत्रकार परिषदेला डॉ. जयंत उपाध्याय, डॉ. वसंत खडतकर, डॉ. संजय मराठे, डॉ. अविनाश गावंडे, डॉ.संजय पाखमोडे उपस्थित होते.

ऑनलाईन शाळेमुळे लहान मुलांना मोबाईलची सवय जडली आहे. मागील आठ महिने मुले मोबाईलमध्ये गुंतून होते. यामुळे मुले मोबाईल व्यसनी झाली आहेत. विरोध केल्यास प्रत्युत्तर देण्याची सवय लागली आहे. स्वभावात चिडचिडेपणा वाढला. अधिक विरोध केल्यास ते नैराश्यात जात आहेत, अशा तक्रारी पालकांकडून येत असून लहान मुलांना अशा बिकट परिस्थितीला हाताळण्यासाठी बालरोग संघटनेच्या नागपूर शाखेतर्फे “स्विच ऑफ दी मोबाईल स्क्रिन’सह कुपोषण व इतर उपक्रम हाताळण्यात येतील, असे डॉ. धोटेसंह डॉ. अविनाश गावंडे म्हणाले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या