फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशनवजात शिशुंनाही असतात ‘जाणीवा’: डॉ.अविनाश गावंडे

नवजात शिशुंनाही असतात ‘जाणीवा’: डॉ.अविनाश गावंडे

Advertisements

‘महान्यूओकॉन-२०२१’शिबिराचा समारोप: देशभरातील तज्ज्ञांनी नवजात शिशुंबाबत केले मोलाचे मार्गदर्शन

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. २४ ऑक्टोबर: आपल्याकडे सहसा हा समज असतो की नवजात बालकांना काहीच कळत नाही,त्यांना वेदना होत नाही,इंजेक्शन टोचले तरी किवा रक्त तपासणीसाठी रक्त काढले तरी,त्यांना काहीच कळत नाही मात्र ही सर्वथा चुकीची समजूत असून नवजात शिशुंनाही वेदना होतात,त्यांना बोलता-सांगता येत नसले तरी त्यांना खोलवर जाणीवा असतात असे मोलाचे मार्गदर्शन मेडीकल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अविनाश गावंडे यांनी आज हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित ‘महान्यूओकॉन-२०२१’च्या १७ व्या शिबिराच्या समारोपप्रसंगी केले.

गेल्या ३ दिवसात, २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान महान्यूअोकॉन अंतर्गत विभिन्न सत्र सुरु होते.या कार्यक्रमात देशभरातील नवजात शिशुतज्ज्ञांनी सहभाग नोंदवला.तीन कॉन्फरेंस हॉलमध्ये तीन दिवसात नवजात शिशुंबाबत विविध महत्वाचे असे १८ सत्र पार पडले.यात सर्वाधिक गंभीर चर्चा ही नवजाज शिशु,त्यांचा मृत्यूदर पूर्णपणे रोखणे,त्यांचे संतुलित पोषण,संक्रमणापासून सरंक्षण,आईचं दूध इ.विषयी देशातील विविध नवजात शिशुतज्ज्ञांनी गांर्भीयाने मार्गदर्शन केले तसेच वैद्यकीय क्षेत्रातील परिचारिका,अटेंडेट आदींना प्रशिक्ष्त केले.

या उपक्रमात बिहार,उत्तरप्रदेश,राजस्थान,महाराष्ट्र व दिल्ली येथील तज्ज्ञांनी देखील महत्वाचे मार्गदर्शन केले.नवजात शिशुबाबत मार्गदर्शन करताना डॉ.अविनाश गावंडे यांनी नवजात शिशुंनाही भावनिक व शारिरीक जाणीवा असल्याचे सांगितले.त्यामुळे नवजात शिशुनां भावनाच नसतात,वेदनाच होत नाही,त्यांना काहीच कळत नाही असे चुकीचे भ्रम पालकांनी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधींनी पाळू नये,असे त्यांनी सांगितले.

नवजात बाळाची काळजी जन्म होण्या आधी व जन्म झाल्यानंतर कशी घ्यावी,या विषयी त्यांनी सविस्तर भाष्य केले.गर्भवती मातेची तपासणी,तिला होणारे आजार,स्वस्थ बाळाचा जन्म,जन्मानंतरच्या सर्वाधिक महत्वाच्या असणा-या २८ दिवसाच्या काळात बाळाचा होणारा शारिरीक,मानसिक विकास याबाबत १० पाय-या कोणत्या?याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.याशिवाय आईच्या दूधाविषयी,स्तनपानाविषयी तसेच सुदृढ बालकांच्या जन्माविषयी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

National Neonatology forum चे कोषाध्यक्ष डॉ.सुरेंद्रसिंह बिष्ट यांनी अद्यापही भारतात जगाच्या तुलनेत नवजात बालाकांचा मृत्यू दर हा जास्त असल्याचे सांगितले.२० टक्क्याहून हा दर किमान १० टक्क्यांपर्यंत कसा खाली येईल,याविषयी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.यासाठी २०१४ मध्ये भारतात ‘इंडिया न्यू बॉर्न असाईन प्लान’(आयएनपी)ची सुरवात झाली.जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनात भारतातील अनेक राज्यात ६ सुत्री कार्यक्रम राबवण्यात आले.बालमृत्यू दर रोखण्यात काेणत्या ठोस उपाययोजना कराव्यात यावर सांगोपांग चर्चा त्यांनी केली.

नवजात शिशुला वेळेवर श्‍वास देण्याची गरज भासल्यास वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधींनी ती स्थिती कशी हाताळावी,याचे प्रात्यक्ष्क त्यांनी करुन दाखवले.शासकीय वैद्यकीय कर्मचा-यांसोबतच खासगी वैद्यकीय कर्मचा-यांना देखील बाळाचे प्राण वाचवणारे हे प्रशिक्षण आत्मसात करता यायलाच हवे असे त्यांनी सांगितले.ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचा-यांना देखील याचे प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली.विचारांचे आणि ज्ञानाचे आदानप्रदान होने गरजेचे व तेवढेच अत्यावश्‍यक असल्याचे ते म्हणाले.नवजात शिशुंबाबत ज्ञान व गुणवत्ता असणे हे अत्यावश्‍यकच आहे मात्र त्याशिवाय प्रशिक्षण देखील तेवढेच महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.या प्रशिक्षणाची अंमलबजावणी देखील नवजात शिशुंचा मृत्यूदर रोखण्यासाठी महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.ॲलेक्सीस रुग्णालय येथे पार पडलेल्या कार्यशाळेत याच सर्व बाबींच्या प्रशिक्षणावर भर देण्यात आल्याचे डॉ.बिष्ट यांनी सांगितले.मी तर दरवेळी दिल्लीवरुन येऊ शकत नाही मात्र तुम्हाला जे प्रशिक्षण देण्यात आले,प्रोजेक्ट दिले गेले,त्यावर संपूर्ण प्रशिक्षणार्थी चमूने काम करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आपली संस्कृती दूधाच्या बाटलीची संस्कृती नाही:डॉ.अमित डहाट
आज या सेमिनारदरम्यान भारतात पहील्यांदा National Neonatology forum (NNF India )या नव्या संस्थेची स्थापना करण्यात आली.ही संस्था संपूर्ण देशात काम करते.या संस्थेशी जवळपास ७ हजार शिशुरोगतज्ज्ञ जुळले आहेत.नागपूरात या सेमिनारमध्ये या नव्या संस्थेचे उद् घाटन झाले.याचसोबत गाेवा या राज्यासाठी देखील एनएनएफची स्थापना झाली.अश्‍याप्रकारे देशातील दोन शाखेचे उद् घाटन झाल्याची माहिती National Executive Board Member डॉ.अमित डहाट यांनी खास ‘सत्ताधीश’ला दिली.

या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रंजन पेजावार,सचिव डॉ.दिनेश तोमर तसेच कोषाध्यक्ष डॉ.सुरेंदरसिंह बिष्ट यांची विशेष उपस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.पश्‍चिम भारत म्हणजे गुजरात,राजस्थान व महाराष्ट्रासाठी डॉ.अमित डहाट यांची National Executive Board Member म्हणून नियुक्ती करण्यात आली.

ही शाखा सुरु झाल्याने याचा भरपूर फायदा नर्सिंग स्टाफला होणार असल्याचे त्यांनी सांगितले.नवजात शिशु हाताळताना अजून चांगल्याप्रकारे त्यांना प्रशिक्षणाचा फायदा होईल असे ते म्हणाले.याच प्रशिक्षणाचा फायदा शासकीय रुग्णालयातील विशेष:माता व शिशु विभागात काम करणा-या वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांना होईल.

आजच्या कार्यक्रमात यूनिसेफचे भारतातील प्रतिनिधी डॉ.विवेक सिंगल यांची देखील विशेष उपस्थिती होती.या सर्व तज्ज्ञ मंडळीचा एकच उद्देश्‍य होता तो म्हणजे भारतातील नवजात शिशुंचा मृत्यू दर पूर्णपणे राेखणे किवा कमी करणे.भारतासारख्या देशात जिथे संसाधनाची कमरता आहे,मनुष्य बळाचीही कमतरता आहे अश्‍यावेळी कमीत कमी संसाधनात व कमीत कमी मनुष्य बळात नवजात शिशुंचे प्राण वाचवण्यासाठी किती चांगली सेवा उपलब्ध करु शकतो याविषयी मोलाचे मार्गदर्शन तज्ज्ञांनी केले.

नुकतेच भंडारा येथे १० नवजात शिशुंचा होरपळून मृत्यू झाला.अश्‍या घटना भविष्यात घडू नये यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे याबाबत निर्णय घेण्यात आले.

आजच्या विविध सत्रात आईचे दूध बाळासाठी किती महत्वाचे आहे,यावर उत्कृष्ट विचार मंथन झाले.लोकांमध्ये तर याविषयीची जागरुकता तर हवीच हवी मात्र डॉक्टर्समध्ये देखील ही जागरुकता असणे गरजेचे आहे.याच विषयावर आज एक नाट्यरुपांतर ही सादर झाले.यात पुण्याचे डॉ.उमेश वैद्य हे न्यायाधीश बनले.तर पुण्याच्या डॉ.अमरिता देसाई व सांगलीचे डॉ.अमित टगारे यांनी प्रतिवाद्यांची भूमिका

बजावली.

या नाट्यरुपांतरमध्ये शेवटी न्यायाधीश आईचे दूध हे नवजात बाळांसाठी अमृत असून जगातील कोणत्याही बाळाला त्याच्या नैसर्गिक हक्कापासून वंचित ठेवता येत नाही,असा निकाल देतात.असे करणे म्हणजे हा एक प्रकारचा गुन्हाच असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.याविषयी कोणताही युुक्तीवाद बरोबर ठरु शकत नाही.एनएमसी व आयएपी ने अजून हा संदेश जगातल्या कानाकोप-यात पोहोचवला पाहिजे असे न्यायाधीश म्हणाले.

आईला दूध का येत नाही?यावर चर्चेदरम्यान जी अनेक कारणे सांगण्यात आली त्यात आईचं सतत तनावात राहणं,गर्भधारणा उशिरा वयात होणं,आईचं पोषण आहार पौष्टिक नसणं अश्‍या कारणांचा उल्लेख करण्यात आला.जमिनीवरच पाणी नसेल तर विहीरीत कूठून येणार?दूध पावडरच्या मार्केटिंग व जाहीरातींमध्येही अनेक पालक अज्ञानातून अडकतात.पाश्‍चात्य संस्कृतीत नवजात शिशूला एखाद महिना स्तनपान दिले जाऊन नंतर लगेच बाटलीतले दूध दिल्या जातं व आई कामावर निघून जाते.मात्र भारतीय संस्कृतीमध्ये आई ही बाळाला दीड ते दोन वर्षे स्तनपान करते,यामुळे तिच्या शरिरात दूधाच्या ग्रंथी या सक्रीय राहतात.आईच्या अमृताची जागा बाळासाठी बाटलीतले दूध घेऊच शकत नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

निसर्गाचाही नियम आहे बाळाला स्तनपान करने बंद केल्यास दूधाच्या ग्रंथीही दूध निर्माण करण्याची प्रक्रिया बंद करीत असतात.स्तनपानात अतिशय महत्वाची भूमिका बजावण्यात आईचे निप्पल यावर देखील सखोल मार्गदर्शन पार पडले.बाळ इन्वहरटेड निप्पलमध्ये दूध का घेत नाही?दूध न घेण्या मागे काेणती कारणे असतात?बाटलीतले दूध घेण्यासाठी बाळाला कोणतीही अतिरिक्त मेहनत करावी लागत नाही कारण गुरुत्वाकर्षण नियमाप्रमाणे ते सहज बाळाच्या पोटात जातं मात्र स्तनपान करताना बाळाला अतिरिक्त मेहनत करावी लागत असते.बाळाला दूध ओढून आपल्या तोंडात घ्यावं लागत असतं.त्यामुळे कधी स्तनपान तर कधी बाटलीतले दूध बाळाला पाजणे शास्त्रीय दृष्टया फार चुकीचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.यामुळे बाळामध्ये संभ्रम निर्माण होतो की दूध पिण्यासाठी आता मला मेहनत करायची आहे की नाही?

याशिवाय स्तनदा मातांमध्ये आणखी एक छळणारा प्रश्‍न आढळतो तो म्हणजे आपले दूध बाळाला पुरेसे आहे की नाही?आपल्याला दूध कमी येत असावे त्यामुळे बाळाचे पोट भरत नसावे,या शंकेने बाळाला बाटलीतलं ही दूध देण्यात येतं.मात्र जर बाळाचं नियमित वजन वाढत आहे व बाळ व्यवस्थित मूत्र विसर्जन करीत असेल तर याचा अर्थ बाळाला आईचे दूध हे पुरेसे आहे.बाळाला विषाणू रहीत आईचेच दूध पाजावे,अतिरिक्त बाटलीतले दूध पाजल्यास बाळ लठ्ठ होईल मात्र आरोग्यदायी राहणार नाही,जो बाळ आजारी नाही तेच बाळ आरोग्यदायी मानल्या जातं,असे डॉ.डहाट यांनी स्पष्ट केले.

भारतातील अनेक राज्यांमधून आलेल्या तज्ज्ञांनी नवजात शिशु यांच्याबाबत उत्कृष्ट मार्गदर्शन केले.विचारांची देवाण-घेवाण केली.रुग्णालयातील परिचारिका,रेसिडन्स डॉक्टर्स यांना याचा मोलाचा फायदा होणार आहे.अर्थातच यासाठी नागपूर मेडीकल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अविनाश गावंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.उदय बोधनकर यांची देखील हा एवढा महत्वपूर्ण कार्यक्रम सुरळीत पाडण्यात महत्वाची भूमिका होती.डॉ.जयंत उपाध्येय,डॉ.वसंत खळतकर,डॉ.अनिल राऊत,डॉ.मिलिंद मांडलिक,डॉ.संदीप कदम,डॉ.विजय धोटे,डॉ.पंकज अगरवाल आदी या सर्वांची भूमिका कौतूकास्पद होती तर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन ही माेलाचे असल्याचे डॉ.डहाट यांनी सांगितले.

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या