फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनगरसेवकाचे आडनाव ‘दिवे’:एका आईच्या मनातला अंधार मात्र समजलाच नाही

नगरसेवकाचे आडनाव ‘दिवे’:एका आईच्या मनातला अंधार मात्र समजलाच नाही

Advertisements

भाजप नगरसेवकाचा असा ही असंवेदनशील व्यवहार!

९ वर्षीय एकूलत्या एक मुलाचा मोकाट कुत्र्याने घेतला चावा:दिवे म्हणतात कोर्टात जा,आदेश आणा!

गडकरी यांच्यावरच परिसरातील नागरिकांचा रोष!

नागपूर,ता. २९ जून:जगातल्या कोणत्याही जन्मदात्रीसाठी जगात सर्वात प्रिय जर कोणती गोष्ट असेल तर ते म्हणजे तिचं अपत्य.अशात तो जर एकुलता एक असेल तर तिचं काळीजच जणू त्याच्यातच वसतं.आपल्या लाडक्यावर आयुष्यात कोणतेही संकट न येवो म्हणून तिचा सतत धावा ही देवाकडे असतो मात्र एवढं लक्ष् देऊनसुद्धा घरासमोर सवंगड्यांसोबत सायकल चालवत असणा-या ९ वर्षाच्या चिमुकल्यावर गल्लीतील मोकाट कुत्र्याने झडप घालावी आणि त्याच्या मांडीचा लचकाच तोडून खावा हे दू:ख,हे महाभयंकर संकट कोणत्याही आईसाठी सहन करणं ही अशक्यप्राय गोष्टच ठरते.

अश्‍या मोकाट कुत्र्यांना आवर घालावा,आपल्या भागातून हद्दपार करावे अशी ही मागणी या आईने त्यांच्या प्रभागातील भारतीय जनता पक्ष्ाचे नगरसेवक तसेच शिक्ष् ण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांच्याजवळ केली नव्हती तर त्यांनी रविवारी दि.२७ जून रोजी सकाळी ही घटना घडून गेल्यावर १० ते ११ वा.दरम्यान फक्त त्यांना फोन करुन सांगितली की त्यांच्या चिमूकल्याचा मांडीचा चावा गल्लीतील एका मोकाट कुत्र्याने घेतला आहे तर लगेच दिवे म्हणाले ‘कोर्टात जा!’माझं काम नाही कुत्रे पकडणे!कोर्टात जाऊन लिखित मध्ये आदेश आणा,आदेश आल्यानंतर तो आदेश मनपाच्या पशु वैद्यकीय विभागात दाखवा यानंतर तुमच्या स्वावलंबी नगर येथील मोकाट कुत्रे यांना पकडण्यात येईल!

मी एक सर्वसामान्य गृहीणी आहे,मला महानगरपालिका कुठे आहे हे ही माहिती नाही,त्यात कोणत्या विभागात जायचे हे ही माहिती नाही,मूळात मी कोर्टात कशाला जाऊ?प्रभागातील समस्या नगरसेवकांना नाही सांगणार तर कोणाला सांगणार?माजी महापौर नंदा जिचकार,तभाणे हे देखील आमच्याच प्रभागाचे नगरसेवक आहेत मात्र दिवे यांनाच मतदान केल्याने त्यांनाच फोन लावला,त्यांनी परिस्थितीचे गांर्भीय लक्ष्ात न घेता अतिशय उद्धटपणे बोलणे सुरु केले!अशी व्यथा चिमुकल्या कृष्णाच्या आईने सौ.बबिता कोल्हे यांनी व्यक्त केली.

रविवारी सकाळी साढे आठच्या दरम्यान कृष्णा हा इतर सवंगड्यासोबत घरासमोरच सायकल चालवत होता अचानक एका मोकाट कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला.त्याच्या वृषणाच्या अगदी थोडे खाली त्याचे मांस ओढून काढले,कृष्णा हा जोरात किचांळला,दोन माणसांनी कुत्र्याला हाकलले व कृष्णाला घरी घेऊन आले.त्याला रक्तबंबाळ अवस्थेत बघताच माझ्यातला त्राण हरवला.त्याचे वडील व मी त्याला घेऊन घराजवळील पडोळे हॉस्पीटलला धावलो.

त्याच्या मांडीवरच मांस कुठे पडलं ते ही माहिती नाही….!त्याच्याकडे पाहणं होत नव्हतं…त्याच्या वडीलांनी तर बघितलं ही नाही,एवढे ते आतून हलून गेले होते.कृष्णा हा रडण्यापेक्ष्ा ही खूप घाबरला होता.डॉक्टरांनी त्याच्या मांडीचे मांस कात्रीने कापले आणि टाके लाऊन दिले.पाठीला इंजेक्शनमुळे खूप दूखतंय आई असे कृष्णा सांगत असल्याने पाठीवरची जर्सी वर केली तर…तिथेही कुत्र्याने ओरबाडले होते….त्याच्या छातीवर कुत्र्याचे नख लागले होते,त्याच्या हाताच्या कोहण्या छिलून निघाल्या होत्या…..!

माझं बाळ फक्त ९ वर्षांचं आहे आणि या सर्व वेदनेत मी माझ्या प्रभागातले नगरसेवक प्रा.दिवे यांना फोन लाऊन आपली व्यथा सांगणार तर फक्त मुलाला कूत्रा चावला,एवढेच ऐकून, आई म्हणून माझं सांत्वन करण्या ऐवजी,कुत्रे पकडणं माझे काम नाही,कोर्टात जा म्हणून उद्धटपणे ते बोललेत…..!

स्वावलंबी नगरातील राजा मंगलम कार्यालय,बनकर यांचा दवाखाना,यूको बँक, स्केटिंग मैदान या चार ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा अक्ष् र: सुळसुळाट झाला आहे.प्रभागातील नागरिकांनी शेकडो तक्रारी महानगरपालिकेला केल्या मात्र कोणत्याही तक्रारी दखल घेण्यात आली नाही.
आम्ही नागरिक मनपाला कधीच पाणी द्या,रस्ते द्या अशी मागणी करीत नाही मात्र मोकाट कुत्र्यांपासून आमच्या चिमुकल्यांचा बचाव करावा ऐवढीच मनपाकडून अपेक्ष्ा होती मात्र शेवटी घात झालाच…..!मी माझ्या चिमुकल्याची वेदना पाहू की दिवे सांगतात त्याप्रमाणे कोर्टकचेरी करु?मला एकच मुलगा आहे हो,त्या कुत्र्याने जांघेच्या थोड्या जरी वर त्याच्या ‘वृषणेचाच‘चावा घेतला असता तर…..!तर माझा मुलगा आयुष्यातून कायमचा उठून गेला असता,याचेही गांर्भीय नगरसेवक दिवे यांना कळले नाही?

९ महिने मी त्याला गर्भात घडवलं,बाळंतपणाच्या वेदना सोसल्या,मलमूत्रातून कोरड्यात झोपवलं,हजारो रात्री त्याच्या संगोपनात जागवून काढल्या,ते त्याचा चावा एखाद्या मोकाट कुत्र्याने घ्यावा म्हणून का जन्माला घातले त्याला?

डॉक्टर म्हणाले, चावा घेणा-या त्या कुत्र्याकडे १२ दिवस लक्ष् ठेवा,माझे सासू,सासरे वृद्ध आहेत नवरा कामावर जातो मी माझ्या चिमूकल्याकडे बघू की वस्तीभर त्या कुत्र्याचा शोध घेत फिरु?१२ दिवसात तो कुत्रा मेला तर चिमुकल्याचे इंजेक्शन बदलून द्यावे लागेल असे डॉक्टर म्हणाले.

त्यामुळे आजच मी पाऊस पडण्या आधी त्या कुत्र्याचा शोध घ्यायला भर उन्हात निघाले.कृष्णा हा नको जाऊ आई म्हणून रडत होता पण त्याच्या जीवासाठी मला त्या कुत्र्याचा शोध घेणे गरजेचे होते,२ किलोमीटरपर्यंत मी त्याचा शोध घेतला.एक मुलगी दिसली धर्माधिकारी आडनावाची तिला ही विचारलं तर तिच्या देखील आईचा चावा एका कुत्र्याने घेतला असल्याचे तिने सांगितले.शेवटी ‘जीवनछाया‘वाचनालयासमोर एका ट्रकखाली मला ३ कुत्रे बसलेले दिसले त्यात तो ही होता!

आता दररोज १२ दिवस मला माझ्या कौटूंबिक जवाबदा-या सोडून त्या कुत्र्याचा शोध घ्यावा लागणार आहे,त्याच्यावर लक्ष् ठेवावे लागणार आहे,हे माझं काम आहे का?असा संताप बबिता व्यक्त करतात.

दिवे यांना फोन केला असताना वस्तीतील अनेक नागरिक माझ्यासोबतच होते मात्र त्यांचे उर्मट उत्तर ऐकून सर्वांचा खूप संताप झाला.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वीय सहायक सुधीर दिवे यांचे प्रा.दिलीप दिवे हे भाऊ असल्याकारणाने त्यांना या प्रभागातून तिकीट मिळाली,हा भाग ब्राम्हणांचा असल्यामुळे काम केले किवा नाही केले,नागरिकांच्या समस्या सोडवल्या किवा नाही सोडवल्या तरी येथील समस्त ब्राम्हण वर्ग ‘कमळ‘चिन्हाचे बटन दाबतो,अशी गुर्मी प्रा.दिवे यांना आली असल्याचा संताप येथील नागरिकांनी व्यक्त करुन गडकरी यांची ही चूक आहे ज्यांनी असे बिनकामाचे नगरसेवक आमच्या माथी मारले असे उद् गार या प्रभागात या घटनेनंतर ऐकू आले.
आम्हाला दलित,बौद्ध,सवर्ण कोणत्याही जातीचा नगरसेवक चालतो फक्त त्यांनी आमच्या समस्या वेळेवर सोडवल्या पाहिजे,फक्त ५ वर्षात निवडणूकीपूर्वी मत मागायला दारावर येऊन नमस्कार करण्यापूरतीच त्यांचे ‘देव दूलर्भ दर्शन‘नकोत,अशी चीड ही या वेळी व्यक्त करण्यात आली.

कधी बदलणार कायदा?
श्‍वानाला त्याच्या परिसरातून इतर ठिकाणी हलवता येत नाही.चावा घेतला असेल तर त्या श्‍वानाला ताब्यात घेऊन त्याला रेबिजची लक्ष् णे तर नाही,आदी तपासणी केली जाते. रेबीज नसेल तर पुन्हा श्‍वानाला त्याच परिसरात सोडावे,असा कायदा आहे,असे महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले सांगतात.

या देशात कृषि विषयक कायदे देशभरातील शेतक-यांचा पराकोटीचा विरोध असून ही संसदेत पारित होऊन जातात पण मोकाट भटके कुत्र्यांबाबतचे कायदे मात्र नागरिकांना सोयीस्कर व स्वछंदपणे खेळण्या बागडण्याचे वय असणा-या कुष्णासारख्या चिमुकल्याचा सुरक्ष्ि ततेचा विचार करुन कधी बदलल्या जाणार आहे?असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

एका संतप्त नागरिकाने तर देशभरातील सर्व मोकाट कुत्रे पशुप्रेमी मंत्री मनेका गांधी यांच्या बंगल्यासमोर नेऊन सोडावे का?असा ही सवाल दागला!

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या