फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजधक्कादायक! शहरात आज ४४ कोरोना पॉझिटीव्ह:एकाचा मृत्यू

धक्कादायक! शहरात आज ४४ कोरोना पॉझिटीव्ह:एकाचा मृत्यू

Advertisements


कारोनामुळे शहरात तिसरा मृत्यू:संक्रमितांचा आकडा पाेहोचला २०० पार,एकूण २०६

नागपूर,ता.६ मे: महाराष्ट्राची उपराजधानी ही रेड झोनमध्ये असून नागपूर शहरात ‘हॉट स्पॉट’ठरलेल्या कोरोना बाधितांचा आकडा हा दररोज वाढत आहे. प्रशासनासाठी ही अत्यंत काळजीपूर्वक बाब असून सर्व सक्तीच्या उपाययोजना योजून देखील पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ ही थांबत नसून बुधवारी,दि.६ मे रोजी एकसाथ ४४ संशयितांची कोरोना चाचणी ही पॉझिटीव्ह आल्याची धक्कादायक माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली.

शहरात आता कोरोना बाधितांची संख्या ही दोनशे पार म्हणजे २०६ वर पोहोचली आहे. एप्रिलच्या तिस-या आठवड्यात शतकाकडे वाटचाल करणा-या बाधितांच्या आकड्याने तीनच आठवड्यात आणखी एक शंभरी गाठली.शहरातील सतरंजीपुरा व मोमिनपुरा हे रेड झोन घोषित करुन सतरंजीपुरा येथील तब्बल १७५० नागरिकांना प्रशासनातर्फे विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.९० टक्के पॉझिटीव्ह रुग्ण हे याच भागातील असून ५ एप्रिल रोजी मृत्यू पावलेल्या ६८ वर्षीय पहील्या करोना बाधित मृतकाच्या संपर्कात आले असल्याचे सांगितले जात आहे. ५ एप्रिल नंतर ५ मे अश्‍या एकाच महिन्यात शहरात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला असून यातील दोन मृतक हे वयोवृद्ध होते तर काल मृत पावलेला बाधित हा २२ वर्षीय तरुण होता.

आमदार निवास,वनामती, रवि भवन,कोराडी येथील लोणार नंतर सिम्बॉयसिस तसेच चिंचभवन येथे सतरंजीपुरा येथील संशयितांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांचे नाक व घश्‍यातील स्वॅब हे चाचणीकरीता मेडीकल,मेयो,नीरी, व्हेटरनरी/माफसू,एम्स येथे या चाचण्या होत आहेत.

आज बुधवारी सकाळी मेयो येथे ८ संशयितांच्या कोरोना चाचणीचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला होता.मेडीकलमध्ये २ नीरीमध्ये १६ माफसूमध्ये ९ तर एम्समध्ये ९ संशयितांचा काेरोना चाचणीचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे.मेडीकलमध्ये आज एका १७ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्याला चिचभवन येथे विलगीकरणात ठेवण्यात आले होते.हा तरुण मोमिनपूरा येथील रहीवाशी आहे. याशिवाय मोमिनपू-यातील ३३ वर्षीय व्यक्तिचा अहवाल देखील आज पॉझिटीव्ह आला.
मोमिनपुा येथील छोटी गल्ली येथील ९ वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. याच ठिकाणी रहाणा-या १८ वर्षीय तरुणाचा अहवाल हा देखील पॉझिटीव्ह निघाला.हे सगळे रुग्ण करोना बाधिताच्या संपर्क-साखळीतील असल्याचे सांगितले जात आहे. शांति नगर येथील ५ वर्षाच्या मुलाने मात्र कोराेनावर मात करुन दिलासा दिला आहे. आज त्याला मेडीकलमधून सुटी देण्यात आली आहे.तो कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्याची माहिती आहे.२२ एप्रिल रोजी या मुलाला मेडीकलमध्ये भरती करण्यात आले होते.१४ व्या आणि १५ व्या दिवशी घेण्यात आलेल्या चाचण्या या निगेटीव्ह आल्या असून या चिमूकल्याला सुटी देण्यात आली असल्याची माहिती मेडीकलचे वैद्यकीय अधिक्ष् क डॉ.अजय गांवडे यांनी दिली.

आज एकूण ४४ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ३३ मोमिनपुरा,७ सतरंजीपुरा, १ गणेश पेठ,१ जरीपटका,१ बडा ताजबाग व १ पार्वती नगर मधील असल्याचे सांगितले जात आहे.

शहरात कोरोनामुळे तिसरा मृत्यू-

पार्वती नगर येथे राहणा-या २२ वर्षीय तरुणाचा काल मृत्यू झाला होता. तो सिझोफ्रेनियाचा रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे.सुरवातीला त्याला उल्टी,हगवण आणि ताप ही लक्ष णे होती.त्याला मेडीकलमध्ये भरती करण्यात आले होते.मात्र काल त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल हा आज बुधवारी पॉझिटीव्ह निघाल्याने प्रशासनाने तातडीने त्याच्या घराजवळील ३ किलोमीटरचा परिसर सील केला.पार्वतीनगर भागातील हा मृत्यू पावलेला युवक कोणकोणत्या लोकांच्या संपर्कात आला याची दिवसभर प्रशासनाने कसून तपासणी केली.या भागातील जवळपास १५० नागरिकांना आज विलगीकरण कक्ष्ात पाठविल्याची या भागातील नागरिकांनीच माहिती दिली असून मनपा प्रशासनाकडून अद्याप किती नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यात आले,याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही.
पार्वती नगर परिसरात तंबाकू चाळ आहे. त्या ठिकाणी असलेल्या कबुतरांच्या पेटीजवळ मृत युवकाचा वावर अधित होता.त्या ठिकाणी एका विशेष समुदायाच्या युवकाशी मृत युवक संपर्कात आल्याचे या भागातील काही रहिवाशी सांगत आहेत.अद्याप याची अधिकृत पुष्टि होऊ शकली नाही. या तरुणाच्या अंत्यविधीला उपस्थित असणारे दोन व्यक्तिंचाही अहवाल पॉझिटीव्ह आल्याची चर्चा आहे.
शहरात कोरोनामुळे पहीला मृत्यू हा ५ एप्रिल रोजी झाला होता.५ मे या एकाच महीन्याच्या दरम्यान आणखी दोघांच्या मृत्यूची नाेंद झाली असून दोन वयोवृद्ध नागरिक होते तर काल मरण पावलेेल्या बाधित हा २२ वर्षीय तरुण होता.

नागपूरकर हे सुरक्ष्ति-मनपा आयुक्त तुकाराम मुंढे-

आज एकूण ४४ संशयितांचा अहवाल हा कोरोना पॉझिटीव्ह आला असला तरी नागपूरकरांनी यासाठी घाबरण्याची गरज नाही. या ४४ पैकी २५ बाधित हे मोमिनपु-यातील त्या भागातील आहेत ज्यांनी विलगीकरणाला विरोध केला होता. प्रशासनाने सक्ती केली नसती तर नागपूरात समूह संक्रमण पसरण्याची भीती वाढली असती. या पुढे देखील शहरातील कोणत्याही भागात बाधित आढळ्यास सक्तीने आजूबाजूच्या नागरिकांचे विलगीकरण हे केले जातील. नागरिकांनी देखील खरी माहिती प्रशासनाला देऊन प्रशासनासोबत सहकार्य करावे.

आज मनपा प्रशासनाने हे भाग केले सील-
हा भाग प्रभाग क्र ३३ व प्रभाग क्र.३५(धंतोली झोन क्र.४ अंतर्गत येतो)
पश्‍चिमेस-रेल्वे कॉलनी सीमा रेषा समाप्त(श्रीवास हाऊस)
दक्ष्णिेस- मोर्य सभागृह,पार्वती नगर
दक्ष्णि पूर्वेस- प्रबुद्ध बौद्ध विहार,रामेश्‍वरी रोड
उत्तर पूर्वेस-त्रिशरण चौक,पंकज स्वीट मार्ट
उत्तरेस-श्री.विजय मिश्रा यांचे घर(मस्जीद जवळ)
उत्तरेस- हनुमान मंदिर, तिवारी यांचे घर,पांडे चाळ
उत्तरेस-पाणी टाकी रेल्वे कॉलनी परिसर
उत्तर पश्‍चिमेस- संजय किराणा(अमर टेलर्स)
पश्‍चिमेस- रेल्वे संरक्ष् ण भिंत(कंटेनर डेपो परिसर सुरु)
वरील सर्व मार्ग तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आले असून सदर भागातील नागरिकांना प्रतिबंधित क्ष्ेत्राच्या बाहेर जाण्यास व क्ष्ेत्राबाहेरील नागरिकांना सदर क्ष्ेत्रास येण्यास प्रतिबंध करण्यात आले असल्याची अधिसूचना मनपा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या