फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजधक्कादायक! नागपूरात स्त्रीबीज विक्रीची घटना उघडकीस!

धक्कादायक! नागपूरात स्त्रीबीज विक्रीची घटना उघडकीस!

Advertisements
पंधरा हजार रुपयांसाठी तेवीस वर्षीय मातेचा मृत्यू!

सदर येथील इंदिरा आयव्हीएफ केंद्रावर दोषारोपण
नागपूर,ता.३० जुलै २०२५: अवघ्या दोन वर्षीय मिहिर नावाच्या चिमुकल्याची आई असलेली तेवीस वर्षीय निकिता विशाल डोंगरे हिचा अवघ्या पंधरा हजार रुपयांच्या लोभापोटी अतिशय दूर्देवी मृत्यू झाला.
महत्वाचे म्हणजे शेजारी राहणारे आरोपी बादल देशभ्रातर व त्याची पत्नी प्रियंका देशभ्रातर हिने निकिताला विश्‍वासात घेऊन तिने स्त्रीबीज डोनेट केल्यास पंधरा हजार रुपये मिळतील असे आमिष दाखवले.परिणामी,पती विशालला न कळवता निकिती ही सदर येथील इंदिरा आयव्हीएफ केंद्रात १६ जुलै पासून जात होती,बाराव्या दिवशी दिनांक २७ जुलै रोजी तिच्या गर्भकोषातून स्त्रीबीज काढल्यानंतर तिची प्रकृती ढासळली.तिला तातडीने मेडेट्रीना रुग्णायात रेफर करण्यात आले मात्र,काल २९ जुलै रोजी सकाळी ९ वा.तिचा दूर्देवी मृत्यू झाला.
इंदिरा आयव्हीएफ केंद्रात निकीताच्या अंडकोषातील स्त्रीबीज काढल्यानंतर तिचा रक्तदाब कमी झाला.याची माहिती प्रियंका देशभ्रातर हिने पती बादल देशभ्रातरला दूपारी दीड ते दोन वाजताच्या दरम्यान फोनद्वारे कळवली.महत्वाचे म्हणजे  २७ तारखेला प्रियंका व बादल निकीताला स्त्रीबीज काढण्यासाठी इंदिरा आयव्हीएफ केंद्रात घेऊन आले त्यावेळी पती विशाल हा घरीच झोपलेला होता.पतीला काहीही न कळवता पंधरा हजार रुपयांच्या माेहात अवघ्या २३ वर्षीय निकीताला आपले प्राण गमवावे लागले.तिचा दोन वर्षांचा चिमुकला आयुष्यभरासाठी आईच्या मायेला कायमचा पारखा झाला.
इंदिरा आयव्हीएफ केंद्राने निकीताला दूस-या रुग्णालयात स्थानांतरित करताना संबधितांची स्वाक्षरी कागदपत्रांवर घेतली.या घटनेची माहिती मिळताच निकीताचे कुटूंबिय यांनी आधी सीताबर्डी पोलिस ठाणे गाठले.यानंतर कामठी पोलिस ठाण्यात गेले.त्यांना सदर पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले.सदर पोलिस ठाण्यात निकीताच्या अपघाती मृत्यूची नोंद घेऊन पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून उद्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यावर पोलिस पुढील कारवाई करणार आहे.
या सर्व घटनेची माहिती निकीताच्या कुटूंबियांनी नागपूर शहर काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष वसीम खान यांना दिली.यानंतर वसीम खान यांनी मेडीकल गाठले व शवविच्छेशनाची प्रक्रीया पूर्ण केली.तत्पूर्वी वसीम खान यांनी ऑटोमध्ये निकीताचे पार्थिव घेऊन आधी सदर पोलिस ठाणे गाठले.बादल,प्रियंका,आरोपी डॉक्टर्स व इंदिरा आयव्हीएफ केंद्राच्या विरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.दोन तास सदर पोलिस ठाण्यातील अधिका-यांशी वसीम खान व निकीताच्या कुटूंबियांची वादावादी झाली.सदर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करुन आरोपींवर कायदेशीर कारवाईचे आश्‍वासन दिले.उद्या गुरुवार दिनांक ३१ जुलै रोजी निकीताचा पती विशाल व कुटूंबियांना बयाण देण्यासाठी सदर पोलिसांनी बोलावले आहे.

निकीताचे कुटूंबिय हे या घटनेमुळे मानकिक धक्क्यात आहेत.या घटनेमुळे शहरात स्त्री बीज रॅकेटची शक्यता वर्तवली जात आहे.बादल व प्रियंका यांचा कॅटरिनचा व्यवसाय असल्याने अत्यंत गरीब घरातील मुली पोटापाण्यासाठी त्यांचाकडे काम करीत आहेत.पैशांचा लोभ दाखवून या पूर्वी देखील बादल व प्रियंका यांनी निकीतासारखीच फसवणूक इंदिरा आयव्हीएफ केंद्राच्या सहकार्याने इतर गरीब,गरजू मुलींची देखील केली असल्याची शक्यता वसीम खान वर्तवतात.सूत्राने दिलेल्या माहितीनुसार इंदिरा आयव्हीएफ केंद्राकडून या कामासाठी बादल व प्रियंकाला एक लाख रुपये मिळत होते.त्यातील फक्त पंधरा हजार रुपये निकीतासारखे सावज शोधून दिल्यात जात असल्याची बाब वर्तवली जात आहे.
सदर पोलिसांनी इंदिरा आयव्हीएफ केंद्रातील दोषी डॉक्टर्स यांच्या मुसक्या आवळून स्त्रीबीज रॅकेटचा भंडाफोड करण्याची मागणी केली जात आहे.
………………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या