फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमधक्कादायक! नागपूरच्या दोन तरुणींवर उत्तराखंडमध्ये बलात्कार

धक्कादायक! नागपूरच्या दोन तरुणींवर उत्तराखंडमध्ये बलात्कार

Advertisements

इव्हेंटमध्ये काम करण्याच्या बहाण्याने केले अपहरण

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. ३ ऑक्टोबर: गिट्टीखदान परिसरात राहणा-या दोन तरुण चुलत बहीणी या २४ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११.३० वा. अचानक घरुन बेपत्ता झाल्या.आरोपी आकाश चौधरी व त्याच्या पत्नीने या २३ व २१ वर्षीय बहीणींना फूस लावून उत्तराखंडमध्ये पळवून नेले व तिथे गेल्या एक-दीड महिन्यांपासून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या दोन्ही मुलींपैकी एकीची आई आणि एकीचे बाबा हे सख्खे भाऊ-बहीण आहेत. परिणामी मुली घरुन बेपत्ता होताच त्यांनी मुलींचा बराच शोध घेतला मात्र शेवटी त्यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात धाव घेतली. या बुधवारी दि. ३० सप्टेंबर रोजी अचानक २४ वर्षीय मोठ्या बहीणीचा फोन तिच्या आईला आला,फोनवरच अापबिती सांगून ती ढसाढसा रडली आणि ’आई मला काहीही करुन या नरकातून वाचव,नाही तर मी मरुन जाईल’असा आर्जव तिने केला.या दोन्ही मुलींना आरोपी आकाश चौधरी व त्याच्या पत्नीने २-२ लाख रुपयांना विकले,अशी माहिती तिने आपल्या आईला दिली,आईने तिला लोकेशन विचारले तर तिला काहीही सांगता येत नव्हते, उत्तराखंड आहे,सागर आहे की बुंदेलखंड आहे मात्र आईने तिला धीर दिला व मोबाईलवरील ती रिकॉडींग व नंबर घेऊन गिट्टीखदान पोलीस ठाण्यात धाव घेतली.

क्राईम ब्रान्चने लगेच त्या आयडीया मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले व घरच्यांना सूचना दिली तुमच्या मुली सापडल्या,त्या सुखरुप आहे. ताबडतोब मुलींच्या कुटुंबियांनी खासगी टवेरा बूक केली,यात ड्रायव्हर,दोन पोलीसकर्मी व दोन महिला पोलीसकर्मी हे उत्तराखंडमध्ये शुक्रवारी पोहोचले. त्यावेळी तेथील पोलिस ठाण्यात आरोपी आकाश चौधरी हा देखील हजर होता,त्याला तिथेच नागपूरच्या पोलिसांनी देखील चांगलाच चोप दिल्याचे सूत्राने सांगितले. त्याने कबूल केले लहान बहीणीला दोन लाख तर मोठ्या बहीणीला त्यांनी ९० हजारात विकले!

या बहीणींना जबरदस्ती एका मंदिरात घेऊन जाण्यात आले व गळ्यात एका म्हाता-याकरवी हार घालण्यात आला व तुझे याच्यासोबत लग्न झाल्याचे सांगण्यात आले. ही जागा अतिशय ओसाड होती,दूरदूरपर्यंत फक्त जंगलच होतं.आरोपीने यापैकी एका तरुणीचा मोबाईल हिसकावून त्यात स्वत:चा सिमकार्ड टाकला,संधी मिळताच मोठ्या बहीणीने त्याचा गादीवर ठेवलेला मोबाईल घेऊन जंगलात पळ काढला आणि घरी आईला फोन लावला,यामुळे मुलींचे लोकेशन घरच्यांना कळले.

रजस्वला असतानाही होत होता बलात्कार!
या मुलींवर त्या ठिकाणी दररोज बलात्कार होत होता.विशेष म्हणजे त्या ठिकाणी सर्व म्हातारेच येत होते. त्यांनी नागपूरातील या पँट शर्टमध्ये वावरणा-या स्मार्ट मुलींना सतत साडी आणि घूंघटमध्येच ठेवले. मुलींना आज दूपारी १.३० मिनिटांनी नागपूरत आणण्यात आले,पोलिस ठाण्यातील सर्व सोपस्कार पार पाडून त्यांना मेडीकलमध्ये नेण्यात आले.बातमी लिही पर्यंत अद्याप या मुली मेडीकलमध्येच होत्या.यातील एका बहीणीची स्थिती ही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.शारिरीक इजा यासोबतच तिला जबर मानसिक धक्का बसला आहे.

या बहीणींसोबत महिन्यातील चार दिवसांच्या रजस्वला अवस्थेत देखील सातत्याने बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती सूत्राने सांगितली.मेडीकलमध्ये देखीलही अद्याप या बहीणी साडी व घूंघटमध्ये असल्याची माहिती आहे.

सुरेश नावाचा एक अरोपी अद्यापही फरार-
या सर्व कटकारस्थानमध्ये सहभागी असणारा सुरेश नावाचा एक आरोपी अद्यापही फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

नागपूरातील १४-१५ वर्षाच्या मुली अजूनही त्या नरकात-
आपल्या मुलींना सुखरुप सोडवून आणणा-या एका आईने खास ‘सत्ताधीश‘ला सांगताना माहिती दिली त्या ओसाड जंगलातील त्या घरात अजूनही नागपूरातून पळवून नेलेल्या १४-१५ वर्षाच्या मुली त्या नरकात खितपत पडल्या आहेत,त्यांची देखील सुटका व्हावी,त्या सुखरुप आपल्या कुटुंबात परताव्या,अशी ईच्छा ही माऊली व्यक्त करते.

का घडतात अश्‍या घटना?
निसरडं आणि धुंधीचं वय,कुटुंबाच्या वात्सल्याच्या छायेत जगताना जगाच्या क्रार्याची कल्पना नसणे,पालकांचा अति विश्‍वास,प्रेमाच्या नावावर होणारी फसवणूक,कोणतंही धाडस स्वीकारण्याची तयारी,इव्हेंटमध्ये सहभागी होऊन नाव,पैसा कमविण्याचा हव्यास इ. अशी बरीच कारणे आहेत ज्यामुळे या वयातील तरुणी या अश्‍या सापळ्यात अलगद सापडतात,असे तज्ज्ञांचे मत आहे.जेव्हा जगाचं खरं सत्य कळतं तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. मूळात मुलींचा संवेदशनशील स्वभाव,पटकन कोणावरही विश्‍वास करण्याची वृत्ती ही या अश्‍या पौंगडावस्थेत घातकच ठरते,या दोन्ही मुली नागपूरात सुखरुप एकदाच्या घरी परतल्या मात्र गेल्या दीड महिन्यांपासून त्यांनी भोगलेली नरक यातना त्या जिवनभर नाही विसरु शकणार,त्यांना शारिरीक उपचारासोबतच आता मानसिक मनोर्धेयाचीही गरज असणार आहे.
या घटना पहील्यांदाज घडत आहे असे नाही तर सातत्याने अश्‍या घटनांची प्रसिद्धी प्रचार-प्रसार माध्यमांमध्ये होते मात्र तरी देखील पालक हे आपल्या तरुण मुलींच्या प्रत्येक गतिविधीवर लक्ष् का ठेवत नाहीत?असा प्रश्‍न निर्माण होतो.त्यांना विश्‍वासात घेऊन जगाची खरी ओळख या निरागस तरुणींना करुन देण्याची पालक म्हणून आई-वडीलांची जवाबदारी असते मात्र तरीही या अश्‍या घटना घडतात,पोलिसांवरचा ताण वाढतो, स्त्री देहच अनमोल असतो,मुलगी म्हणून जन्माला आल्याबरोबर पालकांनी त्यांचे मनोविकृत पुरुषांपासून संरक्ष् ण करणे शेवटपर्यंत गरजेचे असते.

नागपूरातील या ही घटनेत पालकांचा मुलींवरचा अति विश्‍वास नडला,दूर्देवाने असेच म्हणावे लागेल.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या