फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजधक्कादायक!जगात फक्त नागपूर मनपाच्या आरोग्य अधिका-यांनाच झाला दोनदा करोना!

धक्कादायक!जगात फक्त नागपूर मनपाच्या आरोग्य अधिका-यांनाच झाला दोनदा करोना!

Advertisements

डॉ.बहीरवार पुन्हा करोनाच्या सुटीवर:संपूर्ण आरोग्य खातेच वा-यावर

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. ३० डिसेंबर: जगात पुन्हा एका नव्या करोना विषाणूच्या भीतीचे सावट गडद झाले असताना,भारतात ही या नव्या विषाणूनी संक्रमित एकूण २० बाधित आढळले असताना,राज्य सरकारने नव्या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अनेक पावले उचलली तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना ३१ डिसेंबर नूतन वर्षानिमित्त साजरे होणा-या सोहळ्यानिमित्त कठोर दिशानिर्देश जारी केले असले तरी नागपूर महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेला जवळपास नागपूरच्या ३० लाख लोकसंख्येच्या आरोग्याविषयी किती काळजी आहे हे मनपा आरोग्य विभागाचे एकूण सर्वच आरेाग्य अधिकारी हे एकसाथ करोनाच्या नावाखाली सुटीवर गेल्याने दिसून पडतंय,आरोग्य विभागचे प्रमुख डॉ.बहीरवार यांनी तर साेमवारपासून दुस-यांदा करोना पॉझिटीव्ह असल्याच्या कारणाने सुटी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे!

जगात नागपूर महानगरपालिका ही एकमेव अशी संस्था आहे तेथील आरोग्य अधिका-यांना ‘दोनदा’करोना झाला असून करोनाच्या नावाखाली त्यांनी चक्क दुसयांदा सुटी घेतली आहे.डॉ.बहीरवार यांनी या पूर्वी देखील करोनाच्या नावाखाली प्रदीर्घ सुटी घेतली असताना सोमवार दि. २८ डिसेंबरपासून पुन्हा एकदा करोना पॉझिटीव्ह असल्याच्या कारणाने सुटी घेतली असल्याची माहिती पुढे आली आहे.या शिवाय टाटा ट्रस्टचे डॉ.टिकैत बिसेन, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार,सहायक आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी,डॉ.संजय चिलकर हे सर्वच आरोग्य अधिकारी सध्या सुटीवर आहेत परिणामी ३० लाख जनतेच्या आरोग्याची काळजी एकमेव मनपा आयुक्त डॉ.राधाकृष्णन बी.हेच वाहत आहेत का?असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे.

विशेष म्हणजे या सर्व आरोग्य अधिका-यांनी कोणत्या केंद्रात आरटी-पीसीआर चाचणी केली याचा कोणताही तपशील प्रशासन प्रमुखांनाच माहिती नाही.गेल्या वेळी डॉ.बहीरवार यांनी करोना झाला असल्याच्या कारणावरुन जी प्रदीर्घ सुटी अनुभवली तो पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल अद्याप सामान्य प्रशासन विभागाकडे सादर केला नसल्याची माहिती समोर आली आहे.असे असताना पुन्हा एकदा त्यांना करोना विषाणूने गाठलेच,यावेळी त्यांनी तसा अहवाल सादर केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

वातानुकलीत कक्ष्ात बसून झाला करोना!
वरील सर्व आरोग्य अधिकारी हे संपूर्ण करोनाच्या काळात फिल्डवर फिरलेच नाहीत,फक्त वातानूकूलीत कक्ष्ात बसूनच शहरातील ३० लाख जनतेच्या अारोग्याची त्यांनी काळजी वाहीली तरी देखील त्यांना करोना विषाणूने एकवेळा नव्हे तर दोन-दोन वेळा गाठले,याबाबत आज मनपात चांगलीच चर्चा रंगली होती.

सुटीवर असले तरी प्रशासकीय अधिकार इतरांना दिलेच नाही!
मनपाच्या अारोग्य अधिकारी यांनी संपूर्णपणे आरोग्य विभाग वा-यावर सोडला असून सुटीवर जाताना त्यांनी कोणत्याही जवाबदार अधिका-याला प्रशासकीय अधिकार प्रदान केले नसल्याचे माहिती समोर आली आहे.आधीच जूना करोना या विषाणूसोबत लढताना नागपूरकरांची अद्यापही चांगलीच दमछाक होत आहे,यात नव्या करोनाचा शिरकाव भारतातील कर्नाटक,तमिळनाडू,तेलंगण तसेच आंध्रप्रदेशमध्ये झाला असताना नागपूरकरांच्या आरोग्याची काळजी वाहणा-या विभागाचे सगळे अधिकारीच चक्क सुटीवर गेल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.हा नवा विषाणू मुंबई व नागपूरपर्यंत पोहोचला तर नागपूरकरांच्या आरोग्याची काळजी वाहणा-या महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची कोणती तयारी असणार आहे?हे या विभागातील वैद्यकीय चमूच्या ‘चैनीच्या’ सुट्यांवरुन दिसून पडतंय,असा संताप आज मनपातील काही कर्मचारी यांनी व्यक्त केला.या पूर्वी अारोग्य विभागाच्या प्रमुख असणा-या डॉ.भावना सोनकुसळे यांनी देखील मुख्यालयात असताना करोनाच्या नावावार दोनवेळा प्रदीर्घ सुटी अनुभवली,आता त्या मनपा दवाखान्याच्या इन्चार्ज असल्या तरी त्या अद्यापही सुटीवरच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.याचा अर्थ नागपूरकरांच्या नशीबी अगदी प्राथमिक आरोग्याची देखील सेवा मिळू द्यायची नाही,असेच मनपा प्रशासनाच्या या बेपर्वा वृत्तीने दिसून पडतंय.

नव्या महापौरांची दहशत!
माजी महापौर संदीप जोशी यांनी राजीनामा दिल्याने तसेच महापौर पदी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी हे येत्या ५ जानेवरी रोजी निवडूण येणार असल्याची चांगलीच धास्ती मनपाच्या अारोग्य विभागाने घेतल्याचे खासगीत बोलले जात आहे.या विभागाचे प्रमुख डॉ.बहीरवार यांनी गेल्या रविवारी दि. २७ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ वा.पर्यत ऐन सुटीच्या दिवशी आपल्या कक्ष्ात फाईली निपटवल्या,ऐवढेच नव्हे तर सोमवारपासून त्यांनी करोना विषाणूने बाधित असल्याचे सांगून सुटीवर असताना, सोबत अनेक फाईल्सचा गठ्ठा घरी घेऊन गेल्याची माहिती सूत्राकडून ‘सत्ताधीश’ला प्राप्त झाली.यामागे नवे महापौर दयाशंकर तिवारी यांची दहशत असल्याचे बोलले जात आहे.

दयाशंकर तिवारी हे पदावर रुजू होताच सर्वात आधी आरोग्य विभागाचाच ‘बॅण्ड‘वाजवणार असल्याची चर्चा आहे. ,परिणामी त्या आधी जेवढ्या फाईली निपटवता येतील तेवढ्या निपटवण्याचा प्रयत्न हे वैद्यकीय अधिकारी करीत असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे करोनाच्या नावाने केंद्राकडून एकूण तीन वेळा नागपूर मनपाला १५ कोटींची रक्कम मिळाली असून यातील फक्त दीड कोटीच खर्च झाल्याची माहिती पुढे आली आहे,मात्र मनपाच्या अारोग्य विभागाने एकूण साढे आठ कोटींची बिले वित्त विभागाला सादर केल्याची माहिती समोर आली आहे.या सर्व गौडबंगाल कारभाराला निस्तरण्यासाठीच दयाशंकर तिवारी महापौर पदावर रुजू होण्यापूर्वीच आरोग्य अधिका-यांची ही संपूर्ण कसरत चालली असल्याचे बोलले जात आहे.

आयुक्तच अनभिज्ञ!
‘सत्ताधीश‘ने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांना सर्वच आरोग्य अधिकारी सुटीवर असल्याने सध्या आराेग्य विभागाचे सूत्र प्रमुख म्हणून कोणाकडे सोपवले आहेत?अशी विचारणा केली असता,मी रजेवर असल्याने माहिती नाही मात्र डॉ. संजय चिलकर हे सध्या प्रमुख म्हणून कार्यभार पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.महत्वाचे म्हणजे डॉ.संजय चिलकर हे स्वत: देखील रजेवर आहेत.हे देखील आयुक्तांना माहिती नसून त्यांच्या जवळ बसलेल्या इतर अधिकारी यांनी आयुक्तांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले.

एकीकडे मनपाच्या दवाखान्यात काम करणा-या अधिकारी व कर्मचा-यांना कोविड-१९ चा प्रकोप सुरु झाल्यापासून एक ही सुटी प्रदान करण्यात आली नाही,त्यांच्या हक्काची रविवारची सुटी देखील त्यांना मिळत नाही,उलट तेच जनतेच्या सरळ संपर्कात दररोज येतात मात्र दुसरीकडे मनपा आरोग्य विभागाच्या वातानूकूलीत कक्ष्ात बसणा-या वैद्यकीय अधिका-यांना दोन-दोन वेळा ‘करोना’ होतो व ते सुटी घेऊन मोकळे होतात,याबाबत तीव्र नाराजी मनपाच्या कर्मचा-यांमध्ये उमटली आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या