

कालबार्ह्य ओळखपत्राचा उपयोग फ्लॅट मिळवण्यासाठी!
नागपूर,ता. १५ ऑक्टोबर: शहरातील प्रतिष्ठित अशी ‘ग्राहक न्याय परिषद’ या संस्थेचे कालबार्ह्य झालेले ओळख-पत्र एका सदस्य महिलेने चक्क रामनगर येथील फ्लॅट भाडेतत्वावर घेण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समाेर आली आहे.
ग्राहक न्याय परिषदेच्या व्हॉट्स ॲप ग्रूपवर देखील ही महिला सदस्य अति सक्रिय होती मात्र तिच्याविषयी संस्थेच्या अध्यक्ष्ांना अनेक तक्रारी आल्याने अध्यक्ष्ांनी त्यांना ग्रूपवरुन त्यांना रिमूव्ह केले. मात्र त्यांच्याकडे या संस्थेचे २०१७-२०१८ या वर्षीचे कालबार्ह्य झालेले व मान्यता संपलेले ओळख-पत्र असल्याने त्यांनी या ओळख पत्राचा वापर करुन नाशिक येथील घरमालकाला त्याची छायांकित प्रत पाठवली व आपण या प्रतिष्ठित संस्थेचे सदस्य असल्याने रामनगर येथील फ्लॅट भाड्याने देण्यात यावा,अशी विनंती केली.
विशेष म्हणजे या महिलेचे पती या जगात नाही तरी देखील त्यांनी त्यांचे पती हे सरकारी अधिकारी आहेत अशी खोटी माहिती घर मालकाला दिली. रामनगर येथील या प्रशस्त ईमारतीत एकूण ८ फ्लॅट आहेत,यातील दोन फ्लॅटमध्ये मेट्रोचे दोन अधिकारी राहतात,तर सर्वात वरच्या मजल्याचे तीन्ही फ्लॅट म्हणजे संपूर्ण फ्लोरच रिकामा आहे. हे तिन्ही फ्लॅट्स एकाच घर मालकाचे असून त्यातील एक फ्लॅट या महिलेने खोटी माहिती पुरवून भाडेतत्वावर मागितला.
मात्र,तिच्या दूर्देवाने ग्राहक न्याय परिषदेचे अध्यक्ष् डॉ.अमित हेडा हे त्या घरमालकाचे चांगले परिचित होते त्यामुळे त्यांनी खात्री करण्यासाठी डॉ.हेडा यांना कॉल केला व अश्याप्रकारे त्या महिलेचे बिंग फूटले. ग्राहक न्याय परिषदेच्या ओळखीचा वापर करुन असामाजिक व अनैतिक कृत्य करण्यासाठी त्या माजी महीला सदस्याने फ्लॅट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
परिणामी,डॉ.अमित हेडा यांनी परिषदेच्या सर्व माजी सदस्यांना संस्थेच्या ओळख-पत्राचा गैरवापर किवा दुरुपयोग करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे तसेच संस्थेच्या ओळख पत्रावरील कालबद्धतेची तारीख बघूनच खात्री करण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.लवकरच संस्थेचे पुर्नगठन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
