

करोना महामारीच्या काळातही गडकरींना सुटेना ‘पक्ष्ीय‘प्रेम कि गडकरींच्या डोळ्यात धूळफेक!
नागपूर,ता. ४ मे:नॅशनल कॅन्सर इन्सिटटयूटमध्ये १४ एप्रिल २०२१ रोजी १०० खाटांच्या कोविड रुग्णालयाचे उद् घाटन करताना केंद्रिय मंत्री व नागपूरचे खासदार नितीन गडरकी यांनी ‘प्रत्येक रुग्णाचा प्राण महत्वाचा’ असा संदेश दिला होता.याच उद्देशाने त्यांनी एप्रिल महिन्यात करोना संसर्गातून मृतांच्या संख्येने लक्ष् णीय आकडा ओलांडताच व नागपूर शहरात व ग्रामीण भागात सर्वत्र मृत्यूची ‘त्राही-त्राही’ माजली असताना,बेड्स,ऑक्सीजन,व्हेंटिलेटर्स व रेमडिसिव्हरच्या मुबलक साठय्ासाठी प्रयत्न सुरु केले.
याच प्रयत्नात त्यांनी आंध्र प्रदेशमधून तेथील उद्योग मंत्री गोपाल शेट्टी यांना व्हेंटिलेटर्स पाठविण्याची विनंती केली. गडकरी यांच्या शब्दाचा मान राखून शेट्टी यांनी हे व्हेंटिलेटर्स गडकरींना सुपुर्द केले.यातील काही व्हेंटिलेटर्स जरी गरजू रुग्णालयात पोहोचत असले तरी यातील ५ व्लेंटिलेटर्स हे मेडीकल चौकातील ’ऑरियस’रुग्णालयात पोहोचले असल्याचे छात्राचित्र प्रसिद्ध झाले आहे. सध्या रुग्णांची आर्थिक लृट करीत असल्याचा आरोप होत असलेल्या ‘ऑरियर्स’रुग्णालयाला हे व्हेंटिलेटर्सच कसे मिळाले याची चांगलीच चर्चा आता रंगली आहे.
या मागे माजी महापौर व भाजप आमदार प्रवीण दटके यांचे नाव समोर आले आहे.गडकरी यांनी रुग्णालयांची यादी बनविण्याचे काम त्यांच्याकडे सुपुर्द केल्याचे सांगितले जात आहे.मैत्री परिवाराचे संजय भेंडे यांच्यासह ही खासगी रुग्णालयांची यादी तयार केली जात असून ऑरियस रुग्णालयाला हे ५ व्हेंटिलेटर्स मिळवून देण्यासाठी दटके यांनीच ‘खास’पुढाकार घेतला असल्याची चर्चा आहे.
सध्या मेडीकल-मेयो,एम्स, लता मंगेशकर रुग्णालय,शालिनीताई मेघे यासारख्या शासकीय रुग्णालयांना ऑक्सीजन सिलेंडर्स व व्हेंटिलेटर्सची नितांत गरज असताना नागपूरचे खासदार हे अद्यापही मनपाच्या काही भ्रष्ट पदाधिका-यांवर विश्वास ठेऊन खासगी रुग्णालयांना रुग्णांचे प्राण वाचविणारे हे व्हेंटिलेअर्स व ऑक्सीजन सिलेंडर्सचे वाटप करीत असल्याची खरमरीत टिका होत आहे.
गडकरी यांना खरोखरच नागपूरातील गोर-गरीब,गरजू रुग्णांची काळजी आहे की त्यांना आपल्याच पक्ष्ाच्या पदाधिका-यांच्या ‘सेवाभाववृत्तीवर’सर्वाधिक भरवसा असून त्यांच्याच सल्लाने ते व्हेंटिलेटर्स अश्या रुग्णांची लृट करणा-या खासगी रुग्णालयांना वाटप करीत फिरत आहे?असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मृत्यूच्या तांडवातही नागपूरकरांच्या नशीबी भाजपचे हे असे ‘पक्ष्ीय राजकारण किवा पक्ष्ीय प्रेम’येत असले तर ते अक्ष् म्य असल्याचे म्हटल्या जात आहे.गडकरी यांना सर्वस्वी अंधारात ठेऊन व्हेंटिलेटर्स व ऑक्सीजन सिलेंडर्सचे वाटप-कार्यक्रम गडकरी यांच्या छायाचित्रांसह सध्या सुरु आहे.यातून नागरिकांच्या मनात अधिकच चीड व संताप निर्माण होत असून,मृत्यूच्या भयाण वास्तवतेत त्यांचे कोणीच नाही,ही असहायतेची भावना व्यक्त केली जात आहे.
ज्या गडकरींवर नागपूरकरांना वडीलधारी असल्याचा आश्वासक विश्वास आहे त्यांच्या अश्या कृतीमधून मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाला तडा जात असल्याची व्यथा सोशल मिडीयावर उमटली आहे.
गडकरी यांनी आंध्र प्रदेशातून ऑक्सीजन सिलेंडर्स व व्हेंटिलेर्टस मिळवले मात्र नागरिकांचे प्राण वाचविणा-या या यंत्रांचा त्यांनी ‘पक्ष्ीय’उपयोग केल्याचा आरोप होत असून माजी महापौर व आमदार प्रवीण दटके यांना गडकरी यांनी जे ५ व्हेंटिर्लटर्स शहरातील गोर गरीबांचे प्राण वाचवण्यासाठी दिले होते ते दटके यांनी नुकतेच ‘ऑरियस’सारख्या खासगी रुग्णालयाला सुपुर्द केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
गडकरी यांनी दटके यांना ७५ ऑक्सीजन सिलेंडर्सचा देखील पुरवठा केला होता,यातील २५ सिलेंर्डस फक्त दटके यांनी मनपाच्या केटी नगर येथील कोविड केंद्राला दिले तर उर्वरित ५० सिलेंडर्स हे ब्लॅकमध्ये विकल्या गेल्याची देखील चांगलीच चर्चा रंगली होती.
मूळात गडकरी यांना नागपूरकरांना मदतीचा हात देतानासुद्धा ‘पक्ष्ीय’मोह सुटत नसल्याची टिका आता होत आहे.गडकरी यांनी इतर राज्याकडून प्राप्त केलेले ऑक्सीजन सिलेंडर्स व व्हेंटिलेटर्स यांची खरी गरज आज मेडीकल,मेया व एम्स या वैद्यकीय रुग्णालयांना होती मात्र गडकरी यांनी अद्याप तरी अशी कोणतीही मदत या रुग्णालयांना केलेली ऐकीवात नाही.ही रुग्णालये शासकीय आहे व सध्या राज्यात सरकार हे महाविकास आघाडीचे असल्याने गडकरी यांनी या शासकीय रुग्णालयांना भरीव मदत करण्याऐवजी सर्वस्वी भ्रष्ट कारभार चालविणा-या खासगी रुग्णालयांना देण्याचा सपाटा लावला असल्याची टिका समाज माध्यमात होत आहे.
एकीकडे गडकरी यांनी ऑक्सीजनची कमतरता पडू दिली जाणार नाही,रेमडिसिव्हिरसाठी आणखी सात कंपन्यांनी पुढाकार घेतल्याची घोषणा केली.५ हजार ऑक्सीजन सिलेंडर व दोन हजार व्हेंटिलेटर्स शहरात उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देत व्हेंटिलेटर्स उपलब्ध झाल्यानंतर मात्र शासकीय रुग्णालयांऐवजी भाजपच्या पदाधिका-यांवर त्यांचे वाटप करण्याची महत्वपूर्ण जवाबदारी सोपवली मात्र गडकरी यांना अंधारात ठेऊन ‘अर्थपूर्ण’वाटप केले जात असल्याचे चित्र आहे.
सध्या मनपाने गवगवा केलेल्या कोणत्याही दवाखान्यात किवा कोविड केंद्रावर पुरेश्या सोयी रुग्णांना उपलब्ध नाहीत वरुन या ठिकाणी भर्ती होणा-या रुग्णांना येथील कामचूकार डॉक्टर वर्ग शासकीय रुग्णालयांचा रस्ता दाखवित असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.यावर कठोर नियंत्रण मिळवण्याऐवजी व मनपाच्या कोविड केंद्रांवर सुविधा उपलब्ध करुन देण्याऐवजी गडकरी हे दटके यांच्या सल्ल्याने खासगी रुग्णालयांना या जिवनावश्यक यंत्रांची खैरात वाटत फिरत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
माझा काहीच रोल नाही-दटके
‘सत्ताधीश’ने याबाबत आमदार प्रवीण दटके यांच्याशी संवाद साधला असताना हा निर्णय सर्वस्वी गडकरी यांचाच असल्याचे सांगितले.गडकरींपेक्ष्ा मी काही मोठा नाही,आज फक्त काही रुग्णालये अशी आर्थिक लृट करीत असल्याची पुश्तीही त्यांनी जोडली, अश्या लृटभची तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई देखील केली जात असल्याचे सांगितले.
मात्र दटके यांच्या बाेलण्यावरुन हजारो तक्रारी प्राप्त झाल्यावरही व प्रसार प्रचार माध्यमांत रुग्णांच्या आर्थिक लृटींचे भयाण वास्तव दररोज प्रसिद्ध होत असतानाही ‘खासगी’रुग्णालयांप्रति त्यांची ‘आस्था व विश्वास’हा आश्चर्यकारक होता.




आमचे चॅनल subscribe करा
