फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमधंतोली परिसरात संदिग्ध अवस्थेत आढळला मृतदेह: खूनाची शंका

धंतोली परिसरात संदिग्ध अवस्थेत आढळला मृतदेह: खूनाची शंका

Advertisements

नागपूर, ता. १२ जून:  : धंतोलीसारख्या उच्चभ्रुंचा भाग असणारा पॉश राहिवाशी भागात एका पडक्‍या घरात कुजलेला मृतदेह आढळून आल्याने शुक्रवारी एकच खळबळ उडाली. सर्वत्र दुर्गंध पसरल्याने या घटनेचे बिंग फुटले. मृतदेहाच्या अवस्थेवरून खुनाची शंका वर्तविली जात असली तरी तुर्तास धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.मृताची ओळख पटू शकली नाही. मृतक हा ३५ ते ४० वर्षे वयोगटातील आहे.

धंतोलीतील एचडीएफसी बॅंकेच्या ओळीत असणारे हे पडके घर विवेक कुकरेजा यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले जाते. सध्या तिथे कुणी राहत नाही. या घराच्या शेजारी राहणारे डॉक्‍टर आणि त्यांच्या कुटुंबियांना तीव्र दुर्गंधीचा त्रास जाणवू लागला. त्यांनी लागलीच महापालिका आणि धंतोली पोलिसांना सूचना दिली. तातडीने मनपा आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल घाले. दुर्गंधीचा शोध घेत पथक पडक्‍या घराच्या मागील भागात पोहोचले. उघड्या खोलीत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृतदेह पूर्णत: कुजला असल्याने ओळख पटविणेही कठीण आहे.

घटनास्थळ भर वस्तीत असून या गल्लीत एक प्रसिद्ध पान शॉपी असल्याने येथे सतत वर्दळ असते. शेजाऱ्यांनाही नजिकच्या काळात कोणत्याही संशयास्पद हालचाली जाणवल्या नाही. यामुळे इतरत्र खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह या घरात आणून टाकला असल्याची चर्चा परिसरात जोरावर आहे.

रात्रीच्या वेळी या परिसरात बाहेरील युवक सतत येत असल्याची माहिती पुढे आली आहे. बाहेरून येणाऱ्यांसोबतच स्थानिक सुरक्षा रक्षक याच भागात रात्री गांजा व दारू पीत बसलेले असल्याचे सांगितले जाते. बाहेरून येणाऱ्यांमध्ये गुन्हेगार प्रवृत्तीच्या युवकांचा समावेश असल्याचीही चर्चा आहे.

महत्वाचे म्हणजे मृताच्या डाव्या हाताच्या मनगटाला काळा धागा बांधलेला असून हातात रबरी ग्लोज आहे. अंगात पाढऱ्या रंगाचे फूलबाह्यांचे शर्ट व काळ्या रंगाची पॅंट आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर बरीच रुग्णालये आहेत. त्यातच मृताच्या हातातही रबरी ग्लोज असल्याने चर्चेला उधाण आले आहे. मृतदेहाची माहिती कळताच परिसरात बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या