

मोदी सरकारला सार्वजनिक संपत्तीचे चलनीकरण करु देणार नाही:काँग्रेसचा इशाारा
नागपूर,ता.४ सप्टेंबर: प्रवचनात माहिर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरवेळी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन एक घोषणा करतात, देशात एक लाख कोटींची पायाभूत सुविधा निर्माण करणार दूसरीकडे देशातील सार्वजनिक संपत्तीच त्यांनी विकायला काढली आहे,ही संपत्ती भाजपची नसून देशाची आहे,अशी घणाघाती टिका काँग्रेसचे माजी केंद्रिय राज्यमंत्री प्रदीपकुमार जैन यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र-परिषदेत केली.
याप्रसंगी बोलताना त्यांनी मोदी यांचा खरपूस समाचार घेतला.मोदी सरकारने देशातील रस्ते,रेलवे,वीज,बंदरे,विमानतळे,स्टेडियम,गोदामे इ.सार्वजनिक मालमत्तेचे ‘ॲसेट मोनेटायझेशन’म्हणजे मालमत्तेच्या चलनीकरणाच्या प्रयोगातून पुढील ४ वर्षात ६ लाख कोटी उभे करण्याची घोषणा केली मात्र २०१५ मध्ये त्यांनीच त्यांच्याच मतदारसंघात वाराणसीमध्ये रेल्वेच्या हजारो कर्मचा-यांसमोर अतिशय आत्मविश्वासाने भाषण दिले होते की माझे विरोधक सातत्याने मी रेल्वेचे खासगीकरण करीत असल्याची वावटळ उठवत आहेत पण मी देशातील १३५ कोटी जनतेला वचन देतो की रेल्वेचे खासगीकरण माझ्या कार्यकाळात होणार नाही,मग आता हे मोदींचे कोणते धोरण आहे?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एकेकाळी या देशात सरकार राजा महाराजांच्याच्या गर्भातून येत होती मात्र देश स्वतंत्र झाला आणि गेल्या ७० वर्षांपासून देशातील नागरिकांच्या मतदानातून या देशात सरकार प्रस्थापित होत आहे.ही सरकार जनतेच्या हितांचे निर्णय घेण्यासाठी सत्तेत बसवली जाते.आजपर्यंत केंद्रात काँग्रेसची सरकार होती जी जनतेच्या हिताप्रती समर्पित होती.आमच्या कार्यकाळात या देशात सुईपासून तर हॅलिकाफ्टरपर्यंत देशात निर्माण झाले.नुकतेच मोदी यांनीही देशाच्या सार्वजनिक संपत्तीचे चलणीकरण करण्याचे धोरण स्वीकारण्यासाठी माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली आणि हे स्वीकारले की नेहरुंच्या काळात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्ता देशात निर्माण झाली आहे.
मोदी यांची नीयत आणि नीती हीच अत्यंत बेगडी असल्याचा प्रहार करीत नोटबंदीचा निर्णय ही असाच होता,असे ते म्हणाले.रात्रीच्या ८ वाजता त्यांनी चलनातील ५०० आणि १००० च्या नोटा क्ष् णार्धात कागदी तुकड्यांमध्ये परिवर्तीत केले.या देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आहे,लोकशाही आहे,संसद आहे मात्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाची माहिती ना रिझर्व्ह बँकच्या संचालकाला होती ना त्यांच्याच अर्थमंत्र्यांना!सामान्य जनता आपले पैसे बँकेतून काढण्यासाठी रांगेत चेंगरुन मेली,उद्योजकांचे व्यापार बुडाले,१५ लाख लोक बेरोजगार झालेत,७ कोटी लोक हे गरीबी रेषेच्या खाली आले आता पुन्हा ५ वर्षांनंतर देशातील फक्त २ उद्योगपतींना लाभ पोहोचविण्यासाठी सार्वजनिक संपत्तीच्या चलनीकरणाचा निर्णय त्यांनी घेतला.त्यांना संसदेत बहूमत मिळाले आहे याचा अर्थ ते ‘तालिबान्यांसारखे’निर्णय नाही घेऊ शकत कारण देश ही काही भाजपची खासगी संपत्ती नसल्याची प्रखर टिका प्रदीपकुमार यांनी याप्रसंगी केली.
ही संपत्ती देशाच्या सामान्य नागरिकांच्या रक्ता-घामाने निर्माण झालेली संपत्ती आहे.याच संपत्तीतून त्यांना ६ लाख कोटींची कमाई करायची आहे मात्र यासाठी त्यांना देशातील जनतेसोबत,तज्ज्ञांसोबत चर्चा नको,संसेदची मंजूरी नको,हा लोकशाहीवर चालणारा देश आहे फक्त २-४ लोकांच्या निर्णयांवर चालणारा देश नाही.लहान दूकानदार हा देखील तोट्यात दूकान चालवत नाही,राहूल गांधी हे सातत्याने सांगत आले आहे हा देश आता फक्त २ नेते आणि २ उद्योगपतीच चालवत आहे.
काँग्रेस पक्ष् आता मात्र हे सहन करणार नाही.सरकारी बीएसएनल तोट्यात आणण्यात आली कारण एका खासगी टॅलिकॉम उद्योगपतीला फायदा पोहोचवायचा होता,असे नाव न घेता अंबानी यांच्या जिआे नेटवर्कवर त्यांनी टिका केली.
आता देशातील ४०० रेल्वे स्टेशन्सचे ते खासगीकरण करणार आहे,देशातील लहान-लहान तर हे स्टेशन नसणार,दिल्ली,मुंबई,नागपूर यासारखे ते स्टेशन असणार आहेत.९० रेल्वेचे ते खासगीकरण करीत आहेत.संपूर्ण रेल्वे ट्रॅक खासगी होणार आहे,यासाठी देशातील श्रमिक संघटना,संसद,प्रवासी कोणाच्याही मताची मोदी यांना गरज भासली नाही.मोदी यांचं गणित,इतिहासच नव्हे तर मानसिक संतुलन हे देखील कमकुवत असल्याची जहाल टिका याप्रसंगी त्यांनी केली.
प्रत्येक वेळी ते देशासोबत खोटे बाेलतात.सामान्य मेंदू असणारा माणूस कधीही ३० ते ५० वर्षांसाठी देशाची सार्वजनिक संपत्ती खासगी उद्योजकांना देणार नाही,अशी कल्पना ही ते करु शकत नाही,मोदींनी जी वचने देशाला दिली ती तर पूर्ण केली नाहीच मात्र देशाची संपत्ती उलट विकायला काढली.
देशातील रस्त्यांमधून त्यांना ४० हजार कोटी कमवायचे आहे.खासगी उद्योगपतींच्या हातात हे रस्ते जाताच ते देशातील सर्वसामान्य नागरिकांचे गळे कापतील,एवढंच नव्हे तर हे उद्योगपती आधी बॅकांकडून कर्ज घेतील,या बँकेत सर्वसामान्यांचाच पैसा असतो,उद्योगपतीच हा पैसा लाटतीत तर देशातील गरिबांचे काय होणार?असा सवाल त्यांनी केला.देशातील सरकार म्हणजे ‘लाभ-हानि की दूकान नही है’,ही संपत्ती मोदींची नाही,जनतेची आहे,चलनीकरणासाठी द्यायची असेल तर लाभ-तोट्याची यादी आधी मोदी सरकार देशातील जनतेला का देत नाही?असा सवाल त्यांनी केला.
स्मार्ट सिटीची मोदी यांची संकल्पना देखील अशीच फसवी आहे.माझा मतदारसंघ असणारी झांशी हीच आता पावसाच्या पहील्याच पाण्यात बुडून जाते.मोदी यांची बुलेट ट्रेन ही देखील अजून धरणीवर अवतरली नाही.२०१६ मध्ये करण्यात आलेल्या नोटाबंदीमुळे विदेशातून येणारा काळा पैसा कुठे आहे?
२०१४ मध्ये ते ज्या संसदेच्या पायरीवर नतमस्तक झाले त्याच संसदेत त्यांच्या आरोग्य मंत्र्यांनी करोना काळात ऑक्सीन अभावी देशात एक ही मृत्यू झाला नसल्याचे धडधडीत खोटे सांगितले!मेजर ध्यानचंदच्या नावाचा पुरस्कार ते देतात मात्र त्याच महान खेळाडूला भारतरत्न देण्याची मागणी मात्र ते मान्य करीत नाही.लोकांमध्ये आपापसात भांडणे लावणे हा त्यांचा स्थायी भाव असल्याची घणाघाती टिका त्यांनी केली.अहमदाबाद येथे दिवंगत अरुण जेटली यांच्या नावाचे स्टेडियमचे नाव मात्र ते बदलत नाही.त्या स्टेडिमयचे नाव का नाही एखाद्या खेळाडूच्या नावावर ठेवले?असा सवाल त्यांनी केला.
महांगाईमुळे तर जनता बेहाल आहे.तेल ४० टक्क्यांनी,गॅस २२ टक्क्यांनी महाग झाले.तुरडाळ तर गरीबांच्या जेवणातूनच बाद झाली आहे,कॅगच्याच अहवालात देशातील ४५ टक्के महिलांकडे उज्वला योजनेअंतर्गत मिळालेला मोफत गॅस सिलेंडर दुस-यांदा भरण्यासाठी पैसाच नसल्याचे नमूद आहे,तरी देखील मोदी सरकार कुंभकर्णी झोपेत आहे.
यूरोपमध्ये रेल्वे खासगी उद्योगपतींना चालवण्यास दिल्यामुळे त्या देशात सामान्य जनतेमध्ये पराकोटीचा असंतोष उफाळला आहे,सरकारने ती चालवण्यासाठी परत घ्याची यासाठी त्या देशांमध्ये आंदोलने होत आहेत.जर्मनी,फ्रांस,ब्रिटेनमध्ये ही तेथील जनता रेल्वेच्या खासगीकरणाने त्रस्त झाली आहे. मग भारतात हे का घडत आहे?हे सरकार आहे की उद्याेगपतींची फॅक्टरी?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
४ किलो गहूं गरिबांना देतात तरी त्यावर मोदी आपला फोटो लावतात,मोदी यांचा बस चालला असता तर गव्हाच्या प्रत्येक दाण्यावर स्वत:चा फोटो लाऊन मोकळे झाले असते,असा उपहास प्रदीपकुमार यांनी केला.प्रत्येक पेट्रोल पंपवर माेदी यांचा फोटो झळकतो मात्र त्यांची कोणतीही योजना देशाच्या हिताची नसतेच,असे ते म्हणाले.
यावर उपाय काय?असा प्रश्न त्यांना विचारला असता १३५ कोटींचा हा देश आहे,संविधान आहे,संसद आहे,या सर्वांशी चर्चा करा,हे ‘पॅगासस’नाही की ‘डरा-धमकाके‘देशाची लृट कराल.त्यांच्या ‘नमस्ते ट्रम्प’मुळे देशात करोनानी धुमाकूळ घातला,देशातील नागरिकांच्या हक्काच्या लसी इतर देशात वाटल्या गेल्या.माध्यमे विकत घेतली गेली आहेत,राहूल गांधी यांचा ही आवाज ते माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचू देत नाही.चाकूचा उपयोग डॉक्टर्स जीव वाचवण्यासाठी करतात मात्र त्या चाकूचा उपयोग मोदी हे हत्याराप्रमाणे करीत असल्याची जळजळीत टिका त्यांनी केली.
त्यांचे ‘खास‘उद्योगपती मित्र आधी योजना बनवतात मग मोदी त्या योजना देशावर लागू करतात मात्र आम्ही मोदींच्या योजना देशावर लागू होऊ देणार नाही.सत्य की अंत में जीत होती है,कॉंग्रेस येत्या काळात अधिक प्रखरतेने समाेर येईल.२०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीत काँग्रेसचीच सत्ता देशात येणार असून त्यावेळी देशाच्या एक-एक पैशांचा हिशेब घेतला जाईल,असा इशारा त्यांनी दिला.
येत्या निवडणूकीत उत्तरप्रदेशच्या एक्झीट पोलमध्ये काँग्रेसला ३ ते ५ जागाच मिळणार असल्याचे भाकीत वर्तवले जात आहे,याबाबत छेडले असता,ते एक्झीट पोल,निवडणूकीचे सर्व्हे हे देखील ‘मॅनेज‘असल्याचा आरोप त्यांनी केला.




आमचे चॅनल subscribe करा
