
नागपूरातून लोकसभेसाठी भरला आज उमेदवारी अर्ज
संविधान चौकातून समर्थकांची भव्य रॅली:काँग्रेसचे सर्व गटातटातील नेते उपस्थित
गडकरी नव्हे तर मोदींना केले लक्ष्य!
नागपूर,ता.२६ मार्च २०२४: या देशातील सर्वसामान्य माणूस हा मागील दहा वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.मागील दहा वर्षांपासून मोदी सरकारने जे देशाला संपविण्याचे काम केले आहे,देशातील लोकशाही संपविण्याचे काम केले व अनेक राज्यातील विरोधी पक्षांचे सरकार पाडण्याचे काम केले आहे तो नंगा नाच, ज्यांनी २०१४ मध्ये मोदींना निवडून दिले होते तो,देशातील जनता मागील दहा वर्षांपासून बघत आहे.मात्र,आता तर देशातील संविधानच संपविण्याचा कट रचला जात असून, फक्त नागपूरातच नव्हे तर संपूर्ण देशात संविधान वाचविण्यासाठी काँग्रेस पक्ष निवडणूक लढत असल्याचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी नागपूरातील प्रतिस्पर्धी भाजपचे नितीन गडकरी यांच्या ऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच परखड ताशेरे ओढले.मोदी हे केंद्रीय संस्थांचा गैरवापर करुन विरोधी पक्षाला नेस्तनाबूत करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.मोदींना देशात विरोधी पक्षच नको आहे.फक्त मीच एकटा देशावर राज्य करील या भूमिकेत मोदी वावरतात आणि संपूर्ण देशाची जनता ते बघत आहे.आम्ही संविधान व देशाची लोकशाही वाचविण्यासाठी लढत आहोत.ते चारशे पारचा दावा करताना दिसतात तर काँग्रेस पक्ष हा संविधान,लोकशाही आणि सामान्य जनतेची गोष्ट करताना दिसतो.
दहा वर्षांपूर्वी विलास मुत्तेमवार यांनी चार वेळा नागपूरचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे.विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते तर मी देखील या शहराचा महापौर राहीलो आहे.या सुंदर शहराचा विकास ख-या अर्थाने आम्ही केला.तेव्हा साढे तीनशे कोटींची आयआरडीपीची योजना राबवून आम्ही सर्वांनी नागपूर शहर सुंदर केलं होतं.देशात सर्वाधिक चांगले शहर म्हणून नागपूर शहराचे नाव घेतले जात होते.मुत्तेमवारांनी मिहानची पायभरणी केली होती.मेट्रो ही दहा वर्षांत नाही आली,त्या पूर्वी मेट्रो प्रकल्पाबाबत मुत्तेमवार यांनी संकल्पना मांडली होती आणि पाठपुरावा करीत होते.जर नागपूरमध्ये काँग्रेसने विकास केला नसता तर जनतेनी आम्हाला वारंवार का निवडून दिले असते?असा प्रश्न त्यांनी केला.
काम काँग्रसने केले श्रेय भाजपने लाटले अशी टिका करीत, भाजप तर देशाला स्वातंत्र्य देखील त्यांनी मिळवून दिल्याची वल्गना करतो.मोदी तर त्याही पुढे जाऊन त्यांनीच संपूर्ण देश घडवला,दहा वर्षां पूर्वी देशात काहीच नव्हते अशी शेखी बघारताना दिसतात,त्यांच्या या हूकूमशाही विचारधारेच्या विरोधात देशातील तसेच नागपूरची जनता जागृत झाली असून, आज काँग्रेसची भव्य रॅली बघून याचा अंदाज तुम्ही लाऊ शकता,असे ठाकरे म्हणाले.
हे शहर मूळात काँग्रेसी विचारधारेचे शहर आहे.या शहरात १३ वेळा काँग्रेसचाच खासदार निवडून आला आहे.पहले भाजपचे उमेदवार सांगतात माझ्या समोर विरोधात कोणीच नाही,मग सांगतात मी पाच लाख मतांच्या मताधिक्याने निवडून येणार,याचा अर्थ ते विरोधकांना तुच्छ समजतात आणि स्वत:ला राजा समजतात.त्यांचा गैरसमज नागपूरची जनताच या निवडणूकीत दूर करेल,असे विकास ठाकरे यांनी सांगितले.
मोदी यांनी देशात जो धिंगाना घातला आहे गेल्या दहा वर्षांपासून ,विरोधी पक्षातील नेत्यांना जेल मध्ये टाकणे,विरोधी पक्षाचे सरकार पाडणे, त्या विरोधात इंडियामधील सर्व विरोधी पक्षाने देशभरात ‘यलगार’ पुकारला आहे आणि आम्ही सर्व विरोधी पक्ष मिळून या हूकूमशाही सरकारला,या लोकशाही विरोधातील सरकारला,जे संविधानाचे संरक्षण करु शकणार नाही अश्या सरकारला रस्त्यावर उतरुन या निवडणूकीत पाडण्यासाठी देशातील विरोधी पक्ष सज्ज झाला असल्याचे विकास ठाकरे यांनी सांगितले.
याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, मी विरोधातील उमेदवाराचं नाव घेणार नाही मात्र,तानाशाह प्रवृत्तीचा नाश नागपूरची जनता करेल,असे सूचक उत्तर त्यांनी दिले.सगळे गट हे विकास ठाकरे यांच्या निवडणूकीत एकजुटीने काम करतील का?असा प्रश्न केला असता,सगळे नेते उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकतांत्रिक व्यवस्थेत जनता ही मोठी असते असे सांगून, निवडणूकीत जनता जेव्हा आपला हिशेब चुकता करते तेव्हा त्यांची अक्कल ठिकाण्यावर येईल कश्याप्रकारे तानाशाही माजवल्याने त्यांना घरी बसावे लागले,असे नाना म्हणाले.यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाने देशाला दिलेल्या २५ गॅरंटीची आठवण करुन दिली.त्या आम्ही पूर्ण करणार असून त्यांच्यासारखी ‘जुमलेबाजी‘करणार नसल्याचा टोला त्यांनी हाणला.देशातील जनतेचा विश्वास हा राहूल गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यावर असून देशात परिवर्तन घडणार असल्याचे नाना यांनी सांगितले.या परिवर्तनाची सुरवात नागपूरातून होणार असल्याचे सूचक विधान त्यांनी केले.नागपूरमधून चुकीच्या विचारधारेच्या आधारे देश चालविला जात आहे, त्या नागपूरमधील दीक्षाभूमीवरुन परिवर्तन घडवून आणण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे.याची प्रचिती समर्थकांच्या या गर्दीवरुनही दिसत असल्याचे ते म्हणाले.आज जे लोक या रॅलीमध्ये आले आहेत ते स्वत:आले असून ‘लाये हूये लोग‘नसल्याचा टोला त्यांनी हाणला.हेच जनआंदोलन देशात परिवर्तन घडवून आणेल,हाच माहोल संपूर्ण देशात बघायला मिळत असल्याचे नाना यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी वंचित सोबतच्या आघाडीबाबत बोलताना, आज कुठल्याही परिस्थितीत वंचित सोबत उद्धव ठाकरे तसेच शरद पवारांची बोलणी पूर्णत्वाला जाणार असल्याचे सांगितले.

आज सकाळी ११ वाजता पासून संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काँग्रेसची भव्य रॅली निघाली.उमेदवारी अर्ज भरण्या पूर्वी विकास ठाकरे यांनी संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यापर्ण केले.
‘आप‘चे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने विकास ठाकरे यांच्या समर्थनार्थ संविधान चौकात जमली होती. विकास ठाकरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याने काँग्रेस,शरद पवार गट तसेच उबाठा या तिन्ही पक्षाचे झेंडे संविधान चौकात लहरवित होती.
संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली.एका काळ्या रंगाच्या जीपवर नाना पटोले,विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार,राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख,सतीश चतुर्वेदी,आ.अभिजित वंजारी,काँग्रेसचे प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढें ,युवा कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बंटी शेळके,मा.आ.अनिस अहमद आदी,विकास ठाकरे स्वार होऊन रॅली काढण्यात आली.काँग्रेसचे झेंडे व ‘#जितेगा_विकास’,‘विकास है तो विश्वास है…!असे फलक घेऊन भर उन्हात हजारो समर्थकांनी गर्दी केली होती. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे हे गळ्यात तिन्ही पक्षाचे दुपट्टे घालून संविधान चौकात उपस्थित झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेसचे आ.सुनील केदार तसेच नितीन राऊत उपस्थित झाले.
……………………




आमचे चॅनल subscribe करा
