फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजदेशातील पहिल्या पाच शहरांमध्ये नागपूरचा होणार समावेश

देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये नागपूरचा होणार समावेश

Advertisements

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा निर्धार: ‘वचननामा २०२४’ चे प्रकाशन

नागपूर,१६ एप्रिल २०२४: नागपुरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करून शहराला शिक्षण, पर्यटन, उद्योगाच्या क्षेत्रात संपूर्ण देशात नावलौकिक मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असा निर्धार व्यक्त करीत भविष्यात देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये नागपूरचा समावेश होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (मंगळवार) व्यक्त केला.

रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये ‘वचननामा ते वचनपूर्ती’ या पुस्तिकेचे  गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, शहराध्यक्ष बंटी कुकडे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, माजी आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत पवार, शिवसेनेचे नेते (शिंदे गट) मंगेश काशीकर, माजी खासदार अजय संचेती, वचननामा संयोजन समितीचे सदस्य माजी आमदार गिरीश व्यास व ज्येष्ठ नेते जयप्रकाश गुप्ता, गिरधारी मंत्री, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी महापौर कल्पना पांडे, माजी महापौर अर्चना डेहनकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले ,की  दोन टर्म मध्ये जे वचन दिले होते ती जवळपास पूर्ण झाली आहे.नागपूरात जवळपास ६ ते ७ लाख लोकसंख्या ही झोपडपट्टीमध्ये राहते,देशात पहील्यांदा झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे देण्याची योजना नागपूरात राबविण्यात आली.याशिवाय या शहराला प्रदुषणमुक्त बनवले जाईल.सीएसआर फंडात मी सुद्धा पैसे टाकून नागपूरातील ७० ते ८० चांगले बगिचे.निर्माण केले आहेतती संख्या आता १०० वर नेण्यात येईल.वृक्षारोपण करुन हे बगिचे नागरिकांच्या आकषर्णाचे केंद्र बनेल.

शहरात विविध ठिकाणी फूड झोन तसेच फुटाळा येथे २५ रेस्टॉरेन्ट आणि हॉकर्स झोन, ऑरेंज सिस्टी स्ट्रीटवर फ्रुट व व्हेजिटेबल झोन, वर्धा रोडवर सेंद्रीय धान्य व भाजी बाजार हे प्रकल्प होणार आहेत. याशिवाय होलसेल किराणा मार्केटसाठी कळमना परिसरात जागा दिली असून त्याचेही बांधकाम सुरू झाले आहे, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. ९१ कोटी रुपये खर्चून महालमधील कल्याणेश्वर मंदिराचे कॉम्प्लेक्स,कल्याणेश्‍वर मंदिर परिसराच्या विकासासाठी ९१ कोटींची योजना असून या ठिकाणी पोलिसांसाठीची घरे निर्माण केली जाईल.या ठिकाणी तरणताल,पार्किग व कमर्शियल कॉमप्लेक्स असतील.

भगवान नगरमध्ये धान्याचे गोडाऊन निर्माण करण्यात येईल. १२०० कोटी रुपये खर्चून सिंदी येथे लॉजिस्टीक्स पार्क आणि शहरात चार ठिकाणी ट्रक टर्मिनल देखील होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहराचा सर्वांगीण विकास होत असून गेल्या दहा वर्षांत १ लाख कोटींची कामे झाली आहेत. काही कामे सुरु आहेत, तर काही प्रगतीपथावर आहेत. नागपूर शहरासाठी आगामी पाच वर्षासाठी नव्या महत्वाकांक्षी योजना आखल्या असून, त्या पूर्ण झाल्यानंतर नागपूर शहर नवे स्मार्ट शहर म्हणून विकसित होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मिहानमध्ये आतापर्यंत ६८ हजार युवकांना रोजगार मिळाला असून यात विविध कंपन्या गुंतवणूक करीत आहेत. डिसेंबरपर्यंत हा आकडा एक लाखावर जाईल, असेही ते म्हणाले. बांगलादेश वस्तीच्या धर्तीवर शहरातील सर्व झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात येण्याचा येत्या काळात प्रयत्न असेल, असे गडकरी यांनी सांगितले. सध्या ज्येष्ठांसाठी ७० ते ८० बगीचे विकसित करण्यात येत आहेत, त्यांची संख्या १०० पर्यंत नेण्यात येईल.

औद्योगिक क्षेत्रातील रोजगार वाढीसाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योजक यांच्या समन्वयातून नवी कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. अजनी येथे ‘युरोपियन स्क्वेअर’ विकसित करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.अजनी मल्टीमोडल हबची निर्मिती होणार होती मात्र,काही लोक हे कोर्टात गेले.आता रेल्वेने मुख्य स्टेशन तसेच अजनी,इतवारी,गोधनी स्टेशन पंचतारांकित सुविधेनेयुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली असून कारागृह आम्ही येथून स्थलांतरीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अजनी मल्टीमॉडल हबसाठी माझ्या विभागाने एनएचएआयने १२०० कोटींची योजना मंजूर केली होती मात्र,काही लोकं हे कोर्टात गेल्याने हे काम थांबले.आता आम्ही अजनी येथील रेल्वेची जागा न घेता कारागृहाची जागा विकसित करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.महराष्ट्र सरकारच्या तीन जमीनी आहेत.एक आहे एरिगेशनची कॉलनी,दूसरी आहे हेल्थ डिर्पाटमेंटची आणि तिसरी आहे कारागृहाची जागा.ते कारागृह स्थानांतरित करण्याची जागा आता निश्‍चित झाली आहे.’इटली’ शहराच्या तसेच यूरोपियन शहरांच्या धर्तीवर आता महाराष्ट्र सरकारच्या या तिन्ही जागा संपादित करुन या ठिकाणी ‘युरोपियन स्क्वेअर’  प्रकल्प साकारला जाईल,अशी माहिती त्यांनी दिली.इटली या देशात शहराच्या मध्यभागी एक मोठा स्तंभ असतो व त्या भोवती संपूर्ण वाणिज्यिक उलाढाली होतात.त्याच स्तरावर कारागृहाच्या जागेवर हा प्रकल्प साकारला जाईल,असे गडकरी यांनी सांगितले.

नागपूरात रस्त्यांवर फूटकल विक्रेते हे उघड्यावर खाद्य पदार्थ विकतात जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.माझ्या विकास योजनेत फूटाळा येथे निर्माण होणा-या प्रकल्पात २५ रेस्टॉरेंट,३ मोठे सभागृह ज्यात १५ हजार लोक खाद्य पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतील ते ही रस्त्यावरच्या भावामध्येच नागरिकांना मिळेल.फूटाळासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकरच नागपूरकरांच्या सेवेत पुन्हा सुरु होणार असून पाण्यातील किड्यांनी रंगीत कारंजे यांची जी वायरिंग खराब केली होती त्या वायरिंगला आता स्टील बॉडीमध्ये सुरक्षा प्रदान करणारी बनविली जात असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.अंभोरा पर्यटनस्थळावर देखील फ्रांसची तीच कंपनी कारंजे तयार करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

नागपूरात ७ ते ८ मार्केट निर्मिले जात असून लंदन स्ट्रीट प्रकल्पात सरकारनकडून आणखी १०० कोटींचे अनुदान मागितले असल्याचे गडकरी यांनी याप्रसंगी सांगितले.रेडीसन ब्ल्यू हॉटेल समोर मनपाची जी सार्वजनिक उपयोगाची जागा आहे त्या ठिकाणी फळ,भाज्या ग्राहकांना उपलब्ध होतील.या सुविधेसाठी या ठिकाणी ‘अॅग्रो व्हीजन किसान मार्केट ’सुरु करण्यात येणार असून शेतकरी व ग्राहक यांच्यात थेट व्यवहार होईल.असे ५० मार्केट बनत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

मेयाे रुग्णालय ते सुनील हॉटेल दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ज्याचे प्रमुख बृजेश दीक्षीत आहेत त्यांच्या मार्गदर्शनात सहा मार्केट निर्माण होणार असून या ठिकाणाहून कोणत्याही दूकानदारांना काढले जाणार नाही तर जेवढी त्यांची जागा आहे तेवढ्या जागेवर दूकान विकसित करुन देण्याची ग्वाही याप्रसंगी गडकरी यांनी दिली.या ठिकाणी भूमीगत पार्किंगची सुविधा असेल.कळमनाच्या बाजूला आम्ही धान्य बाजारासाठी ४७ एकर जागा दिली असून इतवारीतील तेल बाजार तिथे गेल्याने इतवारीतील रहदारी कमी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

फडणवीस यांनी १२०० कोटींचा निधी लॉजिस्टीक पार्कसाठी दिले. सिंधीमध्ये ट्रकसाठी रोड बनवले यामुळे मालाच्या आयात-निर्याताची सुविधा उपलब्ध झाली.बुटीबोरीतून वळण घेतल्यानंतर या जागेचा उपयोग होईल व शहरातील वाहतूकीवरील ताण कमी होईल.

तेलंगखेडी उद्यानाच्या जागेवर भव्य ‘फ्लोरीकल्चर हर्बल गार्डन’ निर्माण केले जाईल.

एम्प्रेस मिल समोर १५ लाख स्के.फू.जागेचा आम्ही टेक्सटाईल मार्केटची निर्मित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.गांधीबाग,इतवारी,केळीबाग रोड वरील संपूर्ण कापडाची दूकाने या ठिकाणी येतील.तीन मजली दूकाने तर तीन मजली टेक्सटाईल फॅक्टरी उघडणार आहोत रेडीमेड गारमेंट्सची.यामुळे १० हजार महिलांना मोठा प्रमाणात रोजगार निर्माण होतील.

याप्रसंगी त्यांनी आरोग्य क्षेत्र,शिक्षण आणि रोजगार,कृषि आणि उद्योग क्षेत्र,सांस्कृति आणि पर्यटन क्षेत्र,क्रीडा क्ष्ेत्र,इ्नफ्रास्ट्रक्चर तसेच महानगरपालिके अतंर्गत करण्यात येणारी कामे याविषयी विस्तृत भाष्य केले. ताजाबाद,ड्रॅगप पॅलेसचा विकास यावर देखील त्यांनी भाष्य केले.लोक एक रुपयाचं काम करतात आणि १० रुपयाचं सांगतात,अशा शब्दात त्यांनी विरोधकांना चिमटा काढला.

सध्या देशात पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात भीषण दूर्भिक्ष असणा-या बंगलोर व पुणे शहर यांचा समोवश झाल्याकडे लक्ष वेधत नागपूरात पाण्याची काय स्थिती आहे?असा प्रश्‍न केला असता मी गॅरंटी देतो नागपूरात येत्या २५ वर्षात पाण्याची कमतरता जानवणार नाही,असे गडकरी म्हणाले.मध्यप्रदेशच्या तोतलाडोहमधून नागपूरला दररोज ९५ एमएलडी पाणी मिळतं.उन्हाळ्यात ६० टक्के त्याचे प्रमाण असतं.कन्हानमध्ये बंधारा बांधण्यात आला असून त्यात ७५० ते ८०० एमएलडी पाण्याची साठवणूक केली जाते.नागपूरात पाण्याची समस्या नसून वितरण आणि नियोजनामध्ये मात्र ढिसाळता असून ४०० एमएलडी पाण्याची चोरी होते,अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली.
……………………………….

 

 

असा आहे वचननामा-

तीन रेल्वे स्थानकांचा विकास, २५ लाख संत्र्यांच्या झाडांची लागवड, एम्प्रेस मिलच्या जागेवर टेक्सटाइल मार्केट, रिंग रोडवर ट्रॉली बस, पोलीस क्वार्टर्सचा विकास, मेयो ते लकडगंज या मार्गावर सहा मार्केट्स या भविष्यातील संकल्पांचाही  गडकरी यांनी वचननाम्याच्या निमित्ताने उल्लेख केला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या