Advertisements

(रविवार विशेष)
‘खरात फाईल्स!की ‘देवा’ची कृपा?
कुठे आहेत सनातनी?आणखी दाभोळकर हवेत का?
चाकणकर फक्त एक मोहरा:निशाना दिल्लीवारीतील नेत्यावर!
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२२ मार्च २०२६: गेल्या तीन दिवसांपासून (पुरोगामी?)महराष्ट्रात सर्व प्रसार-प्रचार माध्यमांमध्ये नाशिकचा नराधम,विकृत लिंगपिसाट,भोंदूबाबा वगैरे विशेषणे लागलेल्या अशोक खरातच्या ‘खरात फाईल्स’चीच चर्चा आहे.मात्र,जे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये नाही ती चर्चा समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली दिसून पडते.त्यातील एक बोलकी पोस्ट म्हणजे,महाराष्ट्रातील गृहखात्याकडे या अशोक खरातांचे प्रकरण खूप आधीपासूनच ‘प्रलंबित’होते.योग्य वेळ येण्याचीच वाट होती!उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीनंतर या फुग्याला टाचणी लावण्यात आली,एवढंच!
चार दिवसांपूर्वी फोडलेल्या फुग्याच्या यज्ञकुंडात रुपाली चाकणकरांची प्रतिकात्मक आहूती पडली.निशाण्यावर मात्र चाकणकर नव्हत्याच.फक्त ‘त्यांची‘पण चाकणकरांसारखीच गत होऊ शकते हा ‘त्यांना’योग्य इशारा पोहोचला.चाकणकरांनी केलं त्याहून अधिक तुम्ही केलं आहे,ज्याचे आमच्याकडे सगळे रेकॉड्स आहेत,असा मॅसेज ज्याला द्यायचा होता,तो योग्यरितीने पोहोचला,फक्त यासाठीच एसआयटी व विशेष पोलिस कृतीदल इत्यादीचा खटाटोप होता.पिडीतांना न्याय वगैरे ‘साेपस्कार’आहेत.असा सूर समाज माध्यमांमध्ये उमटलेला दिसून पडतो.
या रेकॉड्समध्ये कोणाकोणाचे ओंगळवाणे ‘दिव्यदर्शन ‘आहेत हे सांगणे मात्र कठीण आहे.खरातचे खारे लिंबू शरबत म्हणजे त्यांचे बाटलीत भरलेले मूत्रप्राशन किती सत्ताधीशांनी केले?या शरबतातील भस्म म्हणजे इंद्रियोत्तेजक (वायग्रा)गोळ्यांचे चूर्ण याचा वापर कसा होत होता,हे सगळ्या जगाने पाहिले आहे.कोणी-काेणी केला,हे साक्षात ‘कामदेवालाच’माहित.मात्र,या खरात बाबांचा ‘योनी शुद्धीकरणाचा’एक व्हिडीयो तर राजकीय कार्यकर्त्यापासून तर पत्रकारांपर्यत प्रत्येकाला सहज उपलब्ध झाला आहे. अर्थात,या व्हिडीयोमधील महिलेला देखील अनेकांनी दोष दिला आहे.मात्र,अश्या या बाबाबुवांकडे वशीकरण शक्ती ही असते हे मान्य करावंच लागेल.तिच्या सासरची मंडळी ऑफिसच्या बाहेर बसलेली दिसत असताना ती कामुकतेनी आसुसलेली होती,असा आरोप चुकीचा असू शकतो.ती फक्त त्या खरातच्या आदेशांचे पालन करीत होती,जो वशीकरणातून तिला करण्यास सांगत होता.तिला एकटीला ऑफिसच्या आत बाेलावून दार लावून घेत या बाबांनी जे-जे काही तिच्यासोबत केले ते ओंगळवाणे तर होतेच मात्र,ते अधिक संतापजनक यासाठी होते कारण ते तो सर्व धर्माच्या नावावर करीत होता.तिला टेबलवर बसवून उभ्याने संभोग करीत असताना दुर्गा मंत्र ऐकू येत होते.
‘ ऊँ सर्व मंगल मांगल्ये शिवे सवार्थसाधिके शरण्य त्रंब्यके गौरी नारायणी नमोस्तुते….!’हे दुर्गा मंत्राचे उच्चार स्पष्टपणे ऐकू येतात!या मंत्राचा अर्थ,सर्वांचे कल्याण करणारी,शिवस्वरुप,सर्व इष्ट पूर्ण करणारी,शरण आलेल्यांना रक्षण करणारी,त्रिनेत्रा गौरी,हे नारायणी,तुला माझा नमस्कार,असा होतो.हे मंत्र सामान्यत: सर्व शुभ प्रसंगी,नवरात्री आणि पूजेमध्ये वापरले जाते.ज्यातून बुद्धी,शक्ती आणि समृद्धी मिळते.‘खरात फाईल्स’च्या एकूण ५८ व्हिडीयोजपैकी प्रत्येकाच्या मोबाईलवर उपलब्ध झालेल्या या एका व्हिडीयोमध्ये हे मंत्र स्पष्टपणे ऐकू येत आहे आणि हा बाबा चक्क त्यावेळी त्या महिलेसोबत संभोग करीत होता….!महिलेच्या भाबड्या विश्वासहर्तेचा तो गैरफायदा उचलत होता.स्वत:ला कृष्णाचा अवतार व महिलांना तो गेल्या जन्मीची त्याची ‘राधा’सांगत होता.
या अवतारीबाबाला सर्व तंत्रमंत्र,वशीकरण विद्या,काळी जादू,जारण-मारणसाखी विद्या अवगत असल्याचे सांगितल्या जातं.हे सगळं उघडपणे घडत असताना,सनातनी हिंदू धर्माचे पाईक मात्र,पेटून उठले नाही किंवा अंधश्रद्धेविरोधात मरेपर्यंत झटणारे व प्रसंगी हौत्यात्म पत्करणारे नरेंद्र दाभोळकरांसोबत जे केले तशी कृती ही केली नाही.२० मार्च २०१३ साली पुण्यात या वैज्ञानिक दृष्टिकोण असणा-या व मानवी हक्कांचे समर्थक असणा-या दाभोळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.त्यांनी १९८९ साली ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’स्थापन केली होती.ग्रामीणच नव्हे तर अगदी शहरी भागातील महिलांचे देखील अंधश्रद्धेतून कसे शोषण होतं हे त्यांनी अनेक उदाहरणातून जगाला सांगितले.त्यांनी हिंदू देवी-देवतांच्या नावावर समाजात सर्रास चाललेल्या बुवाबाजीवर सडकून टिका केली.मात्र,त्यांच्या विचारांचं मोल काही समाजकंटक आणि ‘अधर्मी’लोकांना कळलेच नाही.आज खरात फाईल्समधून जे बाहेर पडत आहे,ते काय आहे?एकीकडे मां दूर्गाच्या मंत्रांच्या उर्जावान लहरी तर दुसरीकडे कामुकतेने पछाडलेला बेडर व निर्लज्ज अशोक खरात,..किती क्रूर थट्टा त्या शक्तीच्या देवीची….दूसरी थट्टा परमेश्वराच्या निर्मितीची जिला स्त्री संबाेधलं जातं….!किती सनातनी हिंदूचे हात शस्त्र हाती घेण्यास सळसळले?धर्म विटंबनेच्या नावावार निरपराध दाभोळकरांची सुनियोजित हत्या करण्यास मात्र, तेच हात पुढे सरसावले होते….!
ज्या पिडीतेने पोलिसांकडे बलात्काराची तक्रार केली ती तिच्या कुटूंबियांसोबत २०२२ मध्ये खरातकडे गेली होती.तिचे लग्न जुळत नव्हते.खरातनी तिला एक तावीजसारखं गळ्यात घालायला पॅण्डल दिलं.ते तिने घातलं.याच दरम्यान तिचं लग्न देखील जुळलं. मात्र,परिक्षा असल्याने व परिक्षा कक्षाच्या नियमांमुळे तिने ते काढून ठेवलं.योगायोगाने तिच्या लग्नाची बोलणी तुटली.ते पॅण्डल काढल्यामुळेच तिचं लग्न तुटलं असा तिचा समज झाला व ती खरातकडे गेली.यानंतर खरातने तिच्यासोबतही तेच केलं जे इतर स्त्रियांसोबत करीत होता.२०२२ पासून तर २०२६ पर्यंत तिचं शारीरिक शोषण झाल्याने व खरात करीत असलेल्या उपचाराचा तिला कोणताही फायदा न झाल्याने अखेर तिने पोलिस ठाण्यात खरात विरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली.मात्र,ही पिडीता समोर येण्यापूर्वीच खरात विरोधात कायदेशीर कारवाईसाठी पोलिस विभाग सज्ज झाला होता.
मुख्यमंत्र्यानी पोलिस संचालकांना सांगून जी एसआयटी स्थापन केली त्या एसआयटीने दोन एफआयआरचा मागोवा घेतला.पहीली एफआयआर वाडी पोलिस ठाण्यात कलम ३०८ म्हणजे खंडणीचा गुन्हा.या एफआयआरमध्ये अशोक खरात हा फिर्यादी आहे.त्याने मुंबईतील दिनेश परब विरोधात तक्रार दाखल केली होती.परबचा मुंबईत हॉटेल व्यवसाय असून गल्या १० वर्षांपासून त्या दोघांची ओळख झाली.तो सतत प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे संपर्कात असतो.२२ डिसेंबर २०२५ ते २८ डिसेंबर २०२५,या पाच दिवसांमध्ये माझ्या फोनवर दिनेश परबने, व्हॉट्स ॲपवर वन टाईम ओपन होणा-या मध्ये काही फोटोज पाठवले.तसेच हे फोटो त्याला राजेंद्र जासूदे नावाच्या व्यक्तीने पाठवले असल्याचे खरातला सांगितले.यातील छायाचित्रात एक स्त्री माझ्या टेबलवर बसली असून तिचे दोन्ही पाय माझ्या कंबरेवर असल्याचे दाखवण्यात आले आहे तसेच इतर तीन छायाचित्रांमध्ये देखील तीन वेगवेगळ्या महिला संपूर्ण नग्न अवस्थेत माझ्यासोबत असल्याचे त्या छायाचित्रांमध्ये दाखविण्यात आल्याचे फिर्यादी खरात आपल्या एफआयआर सांगतो.
यानंतर पाच कोटी रुपये देऊन आपण हा विषय संपवून टाकू असा सल्ला खरातला परब देतो.यावर खरात याने त्या महिलांसोबत माझा काहीही संबंध नसल्याचे सांगत,त्यांना मी ओळखत नाही,ही सगळी छायाचित्रे ही खोटी असल्याचे खरात परबला सांगतो.यावर परब खरातला सांगतो,भाऊ तुमची समाजात खूप इज्जत आहे,त्या इज्जतीपेक्षा समाजात पैसा मोठा नाही.यावर खरात परबला सांगतो की सध्या म्हणजे डिसेंबरमध्ये माझ्या मुलीचे लग्न आहे.यावर परब म्हणतो,मुलीच्या लग्नानंतर पाच कोटी रुपये तयार ठेवा,आपण हा विषय संपवून टाकू.मात्र,यानंतर खरात परब व जासुदेच्या विरोधात खंडणीची एफआयआर दाखल करतो.
निरज जाधव हा खरातचा ऑफिस बॉय आहे.याच्यासोबत देखील खरातने इतकं काहीतरी चुकीचं केलं की तो खवळला व खरातचा सूड घेण्यास तो पेटून उठला.मात्र,त्याने एक चूक केली.त्याने चोवीस वर्षाच्या एका पिडीतेसोबत संपर्क साधला.ती शिक्षण घेत होती.तिनेच या जाधव विरोधात शिर्डीमध्ये एफआयआर दाखल केली.तिने नमूद केले की नाशिकमध्ये ती तीन वर्षांपूर्वी खरातच्या संस्थानाच्या ऑफिसमध्ये जात होती तिथे जाधव हा ऑफिस बॉय होता.मात्र,गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी मला नीरज जाधवने ‘एआय जनरेटेड ‘माझा एक खरातसोबतचा अश्लील फोटो व्हॉट्स अपॅवर पाठवला.मी त्याचा स्क्रीन शॉट घेतला.
यानंतर सात दिवसांपूर्वी शिर्डीच्या मंदिराजवळ एक अनोळखी व्यक्ति मला भेटला आणि त्याने मला ,माझा व खरातचा तो अश्लील फोटो व्हायरल करणार असल्याचे सांगून निघून गेला.त्यामुळे या मुलीने शिर्डी पोलिसांकडे नीरज जाधवच्या विरोधात तक्रार केली व त्या फोटोचा स्क्रीन शॉट ही सादर केला.ज्या प्रमाणे जो व्हिडीयो त्या महिलेसोबतचा खरातचा व्हायरल झाला आहे,त्याच पद्धतीचा या तक्रारकर्ती तरुणीचाही तो फोटो होता.
थोडक्यात, शिर्डीच्या अहिल्यानगरचे ग्रामीण पोलिस या मुलीच्या म्हणजे नीरज जाधवविरुद्धच्या तक्रारीचा तपास करीत होते. नाशिकचे पोलिस परबवाल्या खंडणीचा तपास करीत होते जी स्वत: खरातने नोंदवली होती.या दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकच साम्य होतं ते म्हणजे अशोक खरात.फक्त केसमध्येच नव्हे तर फोटोमध्ये ही दिसला.नीरज जाधवकडून पोलिसांना आणखी व्हिडीयो व फोटोज सापडले.यानंतर या प्रकरणाची व्याप्ती पोलिसांना कळली.वरिष्ठ पोलिसांनी ते पोलिस आयुक्तांना कळवले.आयुक्तांनी ते पोलिस महासंचालकांना कळवले.यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर १३ मार्च रोजी एसआयटीची स्थापना झाली व १७ मार्च रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांवर खरातला अटक केली.एसआयटीच्या प्रमुख तेजस्वीनी सातपुते यांनी सगळी कागदपत्रे गोळा केली.यानंतर खरातच्या विरोधात लूकआऊट नोटीस काढण्यात आली.
महत्वाचे म्हणजे यातील एक आरोपी तालुक्यास्तरावर त्या संपादक पत्रकाराकडे गेला होता.त्याने बातमी छापली.यानंतर महिला आयोग उतरला.श्रीरामपूरच्या वृत्तपत्राने बातमी छापली असून पोलिसांनी बातमीची सत्यता तपासावी.पत्रकाराने ऐकीव माहितीच्या आधारावर खोटी बातमी छापली आहे.त्यामुळे संबंध महिला वर्गाची बदनामी झाली .त्यामुळे पोलिसांनी याची स्वत:हून(सूमोटो)दखल घ्यावी,असा ८ मार्च रोजी महिला आयोगाने श्रीरामपूरच्या पोलिसांना पत्राद्वारे क़ळवले.ज्या चाकणकरांना पिडीतांची बाजू घेऊन तपास करणे गरजेचे होते तिने पत्रकारच्या बातमीची दखल घेण्यास पोलिसांना कळवले.इतकंच नव्हे तर अशी खोटी बातमी छापणारे वृत्तपत्र बंद व्हावे अशी जनमानसात प्रतिक्रिया आहे(किती हा खरातांचा कळवळा बाईंना!)
यानंतर पोलिसांनी पत्रकाराला समज पत्र दिले व त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून १७ मार्च रोजी बयाणाला येण्यासाठी सूचना पत्र दिले.
महिला अयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे खच्चीकरण करण्याचे काम जे केले आहे त्याचे गांर्भीर्य कमी होऊ शकत नाही.त्या हूशार असल्या तरी ‘अति’हुशारी त्यांना नडली.असंच आता म्हणावं लागेल.त्यांना ओळखणारे व जवळचे अनेकांनी त्या खूप अंहकारात जगत होत्या आणि इतक्या जबाबदारीच्या पदाच्या पात्रतेच्या नव्हत्याच,हे मान्य देखील केले.
असं असलं तरी,एकाला शह देण्यासाठी खरातच्या ऑफिसमध्येच ‘देवा’च्या कृपेने असा माणूस नेमला गेला की सलग चार वर्षांचा डिव्हीआर हाती लागला.परिणामी,त्या एका माणसाला जास्त वळवळ करता येणार नाही,असा मॅसेजही समाज माध्यमांत सर्वदूर फिरत आहे.त्या व्यक्तिने एक-दोन वेळा नव्हे तर चक्क आठ वेळा खरातच्या या ‘कुंटणखान्याला’भेट दिली होती….!
याशिवाय चाकणकरला पदावरुन हटवावं यासाठी तिच्या पक्षातील एकाची खूप इच्छा होती.मात्र,चाकणकरची संरक्षण भिंत ही खूप मजबूत होती.चाकणकरचा दबदबा पक्षात शरद पवारांसह सुप्रिया सुळेंनी देखील वाढवला होता.तो का वाढवण्यात आला याची पार्श्वभूमी अनैतिक आहे,तेव्हा पासून हा काटा काढला पाहिजे असे या व्यक्तिला वाटत होते.चाकणकरची संरक्षण भिंत जशी नाहीशी झाली,तशी ही संधी चालून आली.चाकणकरांची संरक्षण भिंत नाहीशी झाली तेव्हा पत्ते बरोबर सेट करण्यात आले आणि गेम झाला…!असले शंभर खरात आणि त्यांचे शेकडो चोखनाथ रडारवर आहेत,‘आले देवाजीच्या मना हाणला त्याचा चिना’ही नवी म्हण बरोबर आहे!स्वच्छ पाणी,हवा,उत्तम रस्ते,दिवाबत्ती,रोजगार,महागाई या सगळ्या भुताटकीचा आपल्याला बारामाही विसर पडला पाहिजे यासाठी व्यवस्था ‘दक्ष’असते.अशा दक्षकथेत ‘खराताध्यायांची’ फोडणी कामी येते ही देखील एक बाजू समाज माध्यमावर उमटलेली दिसून पडते.
सद्यकालीन सरकार,समाज,धर्मप्रसारक,धर्मप्रवर्तक,सत्तातुर दलाल यांचे अपत्य म्हणून अशोक खरातकडे पाहिले पाहिजे.खरातला नावे ठेवण्याचा अधिकार आपण तेव्हाच गमावला जेव्हापासून आपण विवेकाची,नैतिकतेची कास सोडली आहे….!अशी खंत ही उमटलेली दिसून पडते.
मूळात अशोक खरातचे भक्त कोण होते?तर राजकीय नेते,मंत्री,उपमुख्यमंत्री,सेलिब्रिटी,आयएएस,आयपीएस असे वर्ग-१ चे शासकीय अधिकारी,उद्योगपती किंवा गर्भश्रीमंत असे एलिट क्लासचे भक्त.त्यातही जास्तीत जास्त महिला वर्ग.अनेकांचे लग्न जुळत नव्हते,मुलबाळ होत नव्हते,खरातने उपचार केल्यावर मूलबाळ झाले,त्याची ही किर्ती पसरली आणि उच्चभ्रू वर्गातील महिला त्याच्या भक्त झाल्या.या संकटग्रस्त महिलांची फसवणूक करुन काहींच्या जैविक बाप होण्याचे कृतकृत्य देखील साधल्या गेले असावे.तो किमान ५०० मुलांचा तरी जैविक बाप असावा हे त्याच्या समोर आलेल्या व्हिडीयो ‘दर्शनातून’स्पष्ट होतं.
खरात हे अनैतिक काम धर्माच्या आणि देवाच्या नावावर अगदी उघडपणे करायचा कारण त्याला प्राप्त झालेले राजाश्रय!संवैधानिक पदावर बसलेले लोक त्याची पाद्य पूजा करीत होते.अनेकांनी त्याच्या डोक्यावर ‘छत्री’धरली तर अनेकांच्या तो ‘छत्रछायेखाली’वावरत होता.कुण्या ब्राम्हणालाही हजार-पाच हजारची दक्षिणा देताना कुरकुर करणारे खराताला मात्र पूजेसाठी सहज एक ते दोन कोटी रुपये देऊन टाकत असत.
काही राजकारणी योगायोगाने यशस्वी झाले व सरकारात बसले त्याचेही श्रेय ते खरातच्या विशिष्ट ‘पुजेला’देते झाले व त्याचे ‘अंधभक्त’ होऊन ‘मूत्रप्राशनकर्ते’ झाले.निवडणूक आल्या की खरात बाबाकडे नंबरच लागायचे.२०२४ च्या विधान सभा निवडणूकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील एक नेत्याने खरात बाबाला आपल्या घरी बोलावून आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवराचा पराभव करण्यासाठी लिंबू,गंडे,दोरेची मोठी पूजा केली असल्याचीही चर्चा आहे.
देशाचा गृहमंत्री अमित शहाच कुठलीही चौकशी न करता ज्या बाबाच्या फॉर्महाऊसवर भेट देतो व त्यांचे फोटो बाबाच्या संस्थानात दर्शनीस्थानी लागतो,यातच त्या बाबाची महिमा स्पष्ट होते.मूळात अमित शहांच्या दौ-या आधी त्यांच्या तपास व सुरक्षा यंत्रणेला या बाबाचा महिमा कळला नव्हता का?हे कोणाचे अपयश आहे?उपमुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर या बाबांचे अस्सीम भक्त होते.मागे काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री निवासात एक प्रचंड मोठी पूजा करण्यात आली,ती या खरात बाबांच्या सांगण्यावरुन करण्यात आली होती का?याचाही तपास आता एसआयटीने करावा….!चाकरणकर खरातची पाद्य पूजा करीत असताना मागेच जिल्ह्याचे खासदार नीलेश लंके देखील खुर्चीवर बसलेले दिसून पडत आहेत…!
एक मोठा उद्योगपती बिजनेसमध्ये अपयशी ठरत होता.त्याला यश मिळवण्यासाठी बाबाने २ कोटी रुपये त्याच्याकडून उकळले व त्याला एका विशिष्ट जागेवर रेडा बळी देण्यास सांगितले.त्या उद्योगपतीने ते केले मात्र,यश मिळाले नाही.यावरुन बाबाचे व उद्योगपतीचे बिनसले.या उद्योगपतीने सरळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच या बाबाची तक्रार केली अशी चर्चा शोध पत्रकारिता करणा-या पत्रकारांमध्येही सुरु आहे.एखाद्या गरीब शेतक-याच्या मुलांचा शाळेचा खर्च उचलण्यासाठी अश्या उद्योगपतींकडे एक दमडीही नसते मात्र,धर्माच्या नावावर धंदा करणा-यांवर असले हे उद्योगपती सहज दोन कोटी रुपये ओवाळून टाकतात…..!
महाराष्ट्रातील एक मोठ्या नेत्याला आपल्या मूळगावी दरवर्षी एक रेडा बळी द्यावा तर राजकारणात मोठे यश मिळेल असे या बाबाने सूचवले होते.याचा ही तपास एसआयटी करेल का?एका गर्भश्रीमंत आमदाराने राजकारणात त्याला यश मिळाल्यानंतर या बाबाला कोट्यावधीं किंमत असलेली एक इम्पोर्टेड कारच नजराणा म्हणून भेट दिली.हा बाबा गरीबांना तर जवळही उभा करीत नव्हता.शोषण झालेल्या बहूतांश महिला या गर्भ श्रीमंत होत्या ज्या कधीही पुढे येणार नाही कारण अश्या महिलांना आपली सामाजिक प्रतिष्ठा खूप महत्वाची असते.
पत्रकारितेवर चाकणकरांचा दबाव चुकलाच!
४ मार्च २०२५ रोजी नगरच्या श्रीरामपूरमध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली.ती बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या वृत्तपत्राच्या संपादकाला दोन नोटीस आल्या.पहीली नोटीस ही नाशिकमधून कॅप्टन अशोक खरातने पाठवली व दुसरी नोटीस मुंबईच्या वांद्रे येथून आली,म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या महिला अयोगाच्या अध्यक्षाची नोटीस या संपादकाला आली.या वृत्तपत्रात नाशिक येथील एका भोंदूबाबाच्या अनुषंगाने बातमी प्रसिद्ध झाली.यात फक्त ‘कॅप्टन‘हे विशेषण वापरण्यात आले,त्यात कोणाच्याही नावाचा उल्लेख नव्हता.तरी देखील राज्याच्या महिला आयोगाने याची तातडीने दखल घेत संपादकाला पुरावे सादर करण्याची सूचना केली,नसेल तर माफिनामा प्रसिद्ध करा,असा हूकूम देण्यात आला.
महत्वाचे म्हणजे,आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर व लिंगपिसाट मनोविकृत अशोक खरात यांच्यात अतिशय घनिष्ठ संबंध होते,हे अनेक पुराव्यांनिशी महाराष्ट्राला आता माहिती झालं आहे.हे वृत्तपत्र होते दैनिक खबरदार पुढारी व संपादक होते दत्ता खेरणार.खेरणार यांनी माध्यमांना सांगितल्याप्रमाणे, एक वर्षापूर्वी शोध पत्रकारितेतून त्यांनी कॅप्टनचे कारनामे प्रसिद्ध करणार असल्याची वृत्त दिले.अनेक तक्रारदार महिला व त्यांचे परिचितांकडून या संपादकाला खरातचे काळे कारनामे कळले होते.हे गंभीर प्रकरण असल्याचे सपांदकाला माहिती होतं.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व किमान ९ मंत्री खरातच्या फॉर्महाऊसवर खरातला‘मुजरा’करुन गेली होती.याशिवाय इतर राजकीय पक्षातील देखील मोठे नेते,स्वत: देशाचे गृहमंत्री अमित शहा त्या फॉर्म हाऊसवर खरातला भेटून गेली होती.महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर स्वत: या लिंगपिसाट बाबाच्या ट्रस्टमधील एक विश्वस्त होती.

याशिवाय,आमदार,खासदार,मंत्री,पोलिस अधिकारी,आयएस अधिकारी ते काही न्यायाधीश देखील या ‘नरकात’हजेरी’लावून गेली होती. इतक्या प्रभावशाली बाबाच्या विरोधात ,एका लहानशा स्थानिक मराठी दैनिकाने वृत्त छापणार असल्याची बातमी छापताच सगळीकडे खळबळ माजली.
‘लिंगपिसाट कॅप्टन भोंदूबाबा याचा दैनिक खबरदार पुढारी लवकरच पोलखोल करणार’असा मथळा प्रसिद्ध केला.यानंतर खरात याने तात्काळ वाडी पोलिस ठाण्यात अब्रू नुकसानीचा पाच कोटींचा दावा ठोकत संपादकाच्या विरोधात अदखलपात्र तक्रार नोंदवली व तशी नोटीस संपादकाला पाठवली.या पूर्वी खरातच्या माणसांनी संपादकाला अनेक फोन करुन कॅप्टन कसा चांगला माणूस आहे याचे पाढे वाचले,तू छापायला नको होते,असा दबाव टाकला.यावर संपादकाने,मी कुठेही कॅप्टन अशोक खरातांचे नाव बातमीत छापले नाही,मी फक्त भोंदूबाबत,लिंगपिसाट व कॅप्टन असं छापलंय.ते जर तसे नाहीत तर ते का खुलासा करत आहेत.मी कोणाचीही बदनामी करण्यासाठी वृत्त छापले नसून,हा मला पत्रकार म्हणून या देशातील संविधान व कायद्याने अभिव्यक्तीचे स्वातंत्रय दिले आहे,त्याचा उपयोग केला,असा खुलासा संपादकाने केला.

यानंतर चाकणकरच्या पी.ए.चे दोन दिवस फोन आले.ताईंचा तुम्हाला निरोप येईल.तुम्ही तो खुलासा करुन टाका की तो बाबा तसा नाही म्हणून.यावर संपादकाने त्यांनी पाठवलेल्या नोटीसला उत्तर देत,मी तर पत्रकार आहे,पण तुमच्याकडे संवैधानिक पद असल्यामुळे संपूर्ण यंत्रणा आहे त्यामुळेच तुम्हीच त्या तक्रारींचा शोघ घ्यावा.मी फक्त बातमी छापली आहे.त्यामुळे मला नोटीस पाठवण्यापेक्षा हे पत्र तुम्ही तर पोलिसांना दिलं असतं तर लवकर तपास होईल.असे उत्तर संपादकाने पाठवले व यात कोणाच्याही बदनामीचा हेतू नसल्याचे नमूद केले.

महिला आयोगाचा अधिकार वापरत चाकणकरांनी ‘सूमोटो’चा वापर करुन श्रीरामपूर पोलिसांना संपादक खैरनार यांना एक तर पिडीतांना समोर आणा किंवा खैरनार विरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगितले.मूळात,लैंगिक शोषण झालेल्या पिडीता किती समोर येतात?उच्च घराण्यातील तर महिला या कधीच समोर येत नाहीत.आज जी महिला समोर आली तिलाही २०२२ पासून आतापर्यंत खरातचा लैंगिक अत्याचार सहन करावा लागला,शेवटी तिने आता गुन्हा नोंदवला.हेच धाडस तिने आधी केलं असतं तर खरात आणखी लवकर तुरुंगात गेला असता.हूंडा बळी ठरलेल्या वैष्णवी हगवणेंच्या प्रकरणात मृत पिडीतेच्याच चारित्र्यावर पत्रकार परिषदेत शिंतोडे उडवणा-या रुपाली चाकणकराची राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून ‘कुवत’ त्याच वेळी वादग्रस्त ठरली होती.
पत्रकार व संपादक म्हणून खरातच्या फॉर्महाऊस तसेच कार्यालयात काय-काय घडतंय याची माहिती मला होती.याच माहितीचा वापर मी बातमीत करणार होतो.मात्र,माझ्यावर दबाव आणला गेला.आज त्याच खरातच्या मोबाईलमध्ये ५८ व्हीडीयो सापडले,याचा अर्थ पत्रकार म्हणून माझ्यापर्यंत आलेली माहिती खरी होती तरी मग एका पत्रकाराची मुस्कटदाबी का करण्यात आली?रुपाली चाकणकरनी मला नोटीस का पाठवली?खरातांची पाठराखण का केली?
लैंगिक शोषणाचे असे प्रकार नाशिकमध्ये घडत होते याची चर्चा सगळीकडे होती.पत्रकारांमध्येही ती चर्चा होती कारण पिडीता या कोणा ना कोणाच्या परिचित होत्या.मात्र,चाकणकर सरळ नोटीस पाठवतात की पिडीता आमच्याकडे न येता तुमच्याकडे कश्या आल्या?तो बाबा तसा नाही!मूळात तो बाबा तसा नाही असे प्रमाणपत्र देण्याचा व पत्रकाराला धमकविण्याचा अधिकार महिला आयोगाच्या अध्यक्षांना होता का?मला या सर्व गोष्टींची कल्पना होती की माझ्यावर गुन्हा दाखल होईल,मला अटक होईल,पोलिसांकडून,राजकारण्यांकडून माझ्यावर दबाव आणला जाईल,तरी देखील मी माझ्या महाराष्ट्राच्या माता-भगिनींना न्याय देण्यासाठी मी खूप मोठं धाडस केलं,असं संपादकांने सांगितले.
एका फार मोठ्या पोलिस अधिका-यालाही खरातने सांगितले की खेरणाराला माझ्याकडे घेऊन ये,त्याने माझी माफी मागितली तरच हे प्रकरण मिटेल नाही तर मी त्याल बर्बाद करेल.पोलिसांचे सूचनापत्र मिळाल्यानंतर वाडी पोलिस ठाण्यात मी पत्रकार असल्याने सगळे कॅमरे वगैरे घेऊन गेलो व जो काही माझा जबाब नोंदवायचा आहे तो ऑन कॅमरा होईल असे पोलिसांना सांगितले.दूसरीकडे अनेक लोकं असे होते ज्यांनी संपादकाचे कौतूक केले की या संपादकाने सत्य छापले आहे.अनेक लोक असे होते जे पिडीतांना ओळखत होते.या बाबाचा धंदा गेल्या अनेक वर्षांपासून बिनभोबाट सुरु होता त्यामुळे त्याने शेकडो महिलांचे व लोकांचे शारिरीक व आर्थिक शोषण केले.
हा खरात रत्न ही विकायचा.एक पिडीत धंदा नीट होत नाही म्हणून खरात कडे गेला,त्यालाच साढे तीन लाखांमध्ये खरातने एक रत्न दिला.एकाला त्याने दोन लाखांचा एक रत्न दिला मात्र,याचा कोणताही फायदा भक्तांना झाला नाही.ते रत्न नकली निघाले.इतकंच नव्हे तर या खरातने महाराष्ट्राच्या एका तत्कालीन मंत्री व आता माजी मंत्री असलेल्याला शक्तीवर्धक पाणी पाजले.म्हणजे स्वत:चे मूत्र प्यायला लावले,असा दावा केला जातो.
या खरातकडे दररोज भविष्य पाहयला शेकडो भक्त येतात.किमान दोनशे ते तीनशे महिलांचे तरी या खरातने शोषण केले असल्याचा दावा संपादक करतो.महत्वाचे म्हणजे या महिला उच्चवर्गीय होत्या.राजकारण किवा मोठे सरकारी अधिकारी यांच्या घरातील त्या महिला असायच्या.या सगळ्यांकडून खरातने भरघोस ‘माया’जमवली.केवळ शिर्डी,नाशिकच नव्हे तर विदेशात देखील खरातने पत्नी व स्वत:च्या नावाने खूप मालमत्ता जमवली असल्याचा दावा केला जातो.खरातच्या मुलीचं लग्न नुकतंच नाशिकला झाले असून यानंतर हा खरात विदेशात वास्तव्यास जाणार होता,अशी माहिती मिळाली असल्याचा खुलासा माध्यमांसमोर खेरणार यांनी केला.त्याच्या मुलीच्या लग्नात झाडून पुसून महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली होती.मात्र,माझ्या बातमीनंतर तो घायकुतीला आला व त्याचं भांडं फूटणार असल्याची भीती वाटली व विदेशात पळून जाण्याचा त्याचा बेत होता.त्याने आतापर्यंत अनेक देशांचा दौरा केला आहे.२६-२७ देश तो फिरला आहे.या खरातची माया किमान ५०० कोटींची असावी,असा दावा त्यांनी केला.
त्याच्यासोबतचे मालमत्तेतील समभागीदार कोण-कोण मंत्री,आमदार किंवा नेते आहेत,याचा शोध घेण्याचेही खेरणार आवाहन करतात.खरातकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.त्याचा नाशिकमधला बंगलाच तीन कोटींचा आहे.आता ईडी,प्राप्ती कर विभागानेच संपूर्ण मालमत्तेचे तपशील बाहेर काढावेत.कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच त्याच्यावर मकोका लावावा.हा बाबा स्वत: मद्य प्राशन करुन राहत असे.अश्या माणसाने अनेक हाय-प्रोफाईल घरातील महिलांसोबत चक्क दृष्कर्म केले व त्या महिला उच्चवर्गीय घरातील असल्यामुळेच गप्प बसल्या.
अनेक महिलांना या बाबाने खोटी भीती दाखवली की तू जर माझ्याशी प्रेम संबंधात राहीली नाही तर तुझा नवरा मरेल.एक माता-पिता स्वत:च्या शिकलेल्या मुलीला त्याच्याकडे घेऊन गेले.त्याने मुलीच्या माता-पित्याला बाहेरच ठेवले व मुलीला आपल्या कक्षात आत घेऊन गेला व तिच्यासोबत लैंगिक चाळे केले.त्या मुलीला त्याने जॉब लावून देईल,मुख्यमंत्री शिंदे सुद्धा माझ्याकडे येतात,असे सांगून त्याने त्या मुलीला स्वत:च्या प्रभावात गप्प बसवले.असे प्रकार त्याने अनेकींसोबत केले.
इतकंच नव्हे तर भक्त म्हणून त्याच्याकडे येणा-या उद्योगपती व महिला यांच्यात संबंध जोडून देत होता.त्यांचं उज्वल भविष्य असल्याचे सांगत होता.काही दिवसांनी त्या उद्योगपतीला फोन करुन,ती महिला तर गरोदर आहे,हे तू काय केलंस असे सांगायचा.तिने जर खटला दाखल केला तर तूच गोत्यात येशील,असं सांगून त्याने एका उद्योगपतीकडून वीस कोटी रुपये घेतले.पिडीतेला यातून काहीच दिले नाही व तिला सांगितले की त्याचे आणि तुझे गुण काही जुळत नाही,त्याचा विषय तू सोडून दे…. !
पैसा.पॉवर व सत्ताधा-यांसोबतचे संबंध यातून अभय मिळालेल्या खरातावर मात्र,एका तालुकास्तरावरील पत्रकार,संपादकाला भिण्याची वेळ आली आणि हीच ख-या पत्रकारितेची ताकद आहे.
खरातसाठी वळवले धरणाचे पाणी!
एकीकडे मराठवाड्यात शेतक-यांना पाणी मिळत नाही.मोठ्या प्रमाणात शेतक-यांच्या आत्महत्या होतात.मराठवाड्याच्या नागरिकांना आठ-आठ दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं.त्याच मराठवाड्याच्या हक्काचं पाणी खरातच्या शिवनिका संस्थानाला म्हणजेच कुंटणखान्याला देण्यात आलं होतं.यासाठी महाविकासआघाडीच्या सरकारच्या काळात चक्क अध्यादेश काढण्यात आला होता!
३१ जुलै २०२० रोजी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सरकारमधील जलसंपदा विभागाचा हा अध्यादेश आहे.खरातच्या संस्थानाला बिगर सिंचनच्या कोट्यातून मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा यासाठी पाटबंधारे विभागाने एक प्रस्ताव पाठवला होता.यात सुधारितस्तर निश्चित करण्यात आला.प्रस्तावात बदल करण्याचा अधिकार मंत्रीमंडळाच्या उपसमितीला असतो.
दिनांक २५ जून २०२० रोजी उपसमितीने श्री शिवलिका संस्थान,सिन्नर तालुका नाशिक, यांच्या पाण्याच्या मागणीला मंजुरी दिली होती.दारणा धरण गोदावरी उजवा कालवामधून हे पाणी संस्थानाला देण्यास मंजूरी मिळाली.यासाठी चक्क ४८ किलोमीटरची लांब पाईप लाईन देखील टाकून देण्यात आली होती तसेच ३९ लाख लीटर पाणी उपसा करण्याची मंजूरी देण्यात आली….!३९ लाख लीटर पाणी एका खासगी संस्थानाला…!
खरातचे शिवनिका संस्थान हे पंधरा एकरवर पसरलेले आहे.मंदिराला लागूनच खरातचा एक फॉर्म हाऊस आहे याच फॉर्महाऊसला हे पाणी दिल्या जात होतं.पाणी घेतलं ट्रस्टच्या नावाने पण पाणी जात होतं खासगी फॉर्म हाऊसमध्ये.यात स्वीमिंग टँक ही होते.याशिवाय आजूबाजूलाच खरातच्या जमिनीसुद्धा होत्या.त्यासाठी देखील खरात सर्रास मराठवाड्याच्या शेतक-यांच्या तोंडातून पळवलेले पाणी वापरत होता.इतरांनी ओरडू नये म्हणून आजूबाजूच्या लहान लहान शेतक-यांसाठी एक शेततळ होतं त्यातही खरात पाणी देत होता जेणेकरुन त्याला मिळतं व इतरांना पाणी मिळत नाही यासाठी ओरडा होऊ नये.
उद्धव ठाकरेंनी यावर पत्रपरिषदेत सांगताना,या प्रकरणाची चौकशी व्हावी व पाणी कुठे मुरलेले आहे हे समोर आणा,असे आवाहन केले.आता पुन्हा अवलोकन करण्यात येईल का?हे पाणी थांबवण्यात येईल का?मूळात ठाकरे सरकारच्या काळातील कोण असे मंत्री होते जे खरातच्या पाण्यासाठी अध्यादेश काढते झाले होते,याची देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशी करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभारे यांनी केलेल्या दाव्यानुसार खरात याच्या अंदाजे पाचशे कोटींच्या संपत्तीत खरातच्या पत्नीसोबत एका उपजिल्हाधिकारी याचा ही वाटा असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला.अभिजित भांडे पाटील असे त्या उपजिल्हाधिकारीचे नाव आहे.त्याच्या पत्नीच्या नावे अनेक कंपन्या,रिअल इस्टेट फॅर्म्स,स्टार्ट अप्स आणि उघड भागीदारी हे धाडस कुठून येतं,स्पष्ट आहे सत्तेचा पाठींबा,असा आरोप ते करतात.कुंभारे यांनी आपल्या पोस्टमध्ये सगळी कागदपत्रेही जोडली आहे.या कागदपत्रांमध्ये या उपजिल्हाधिकारीच्या पत्नीचे नाव ही दिसत आहे.प्रिति अभिजित भांडे पाटील,मानपाडा,ठाणे असे नाव त्यात नमूद आहे.महसूल प्रशासनाची संबंधित कामकाज आणि जमीन विषयक निर्णय प्रक्रियेत उपजिल्हाधिकारी या पदाची महत्वाची भूमिका असते.उपजिल्हाधिकारी अभिजित पाटीलची अधिकृत भूमिका अजूनही समोर आली नाही.आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशोक खरात याच्याकडे अंदाजे ५०० कोटींची बेनामी संपत्ती आणि भूखंड आढळून आले आहेत.नाशिक आणि अहिल्यानगर(अहमदनगर)जिल्ह्यात ,सिन्नर,ओझर विमानतळ परिसर आणि शिर्डी अश्या ३० हून अधिक ठिकाणी जमिनी,फ्लॅट्स आणि फार्मआऊस आहेत,ही संपत्ती त्याच्या पत्नी व नातेवाईकांच्या नावावर आहेत.
ऐरवी नागपूरातील रामेश्वरीच्या लहानश्या गल्लीत सरकार विरोधक ॲड.सतीश उकेंच्या दोन मजली घरात मोदींची ईडी छापा टाकून उके बंधूंना अटक करते.आज साढे तीन वर्षांच्या काळानंतरही ते तुरुंगाच्या बाहेर येऊ शकले नाहीत मात्र,मोदींच्या ईडी,प्राप्तीकर विभाग व सीबीआयची पोहोच ,खरातच्या साम्राज्यांपर्यंत पोहोचू शकली नाही याचंच आश्चर्य वाटतं….!
थोडक्यात,एपस्टीन फाईल्स जगभर गाजत असताना पुरोगामी महाराष्ट्रात अनायासे या ‘खरात नावाच्या खराब बाबाची] फाईल उघडावी त्यात महाराष्ट्रातील अनेक नेते मंडळीची नावे यावीत.त्यांचा आता खुलासा देण्यातच दम निघावा.हे चित्र फार भयाण आहे.
महत्वाचे म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतची खरातची दोन छायाचित्रे पोस्ट केली आहेत. खरातच्या भव्यदिव्य संस्थानामध्ये चंद्राकांत पाटील,एकनाथ शिंदेसोबतची अनेक छायाचित्रे,राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे,माजी मंत्री दिपक केसरकर,अशोक चव्हाण आदी अनेक राजकीय धुरिणांची छायाचित्रे खराताचा कुंटणखाना ‘सुशोभित’करताना दिसून पडतोय….!
सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकरांनीही यावर खंत व्यक्त केली आहे.या अधंश्रद्धेविरुद्ध एक जीव गेल्यानंतरही त्या कुठेही थांबलेल्या दिसून पडत नाही.कायद्यानुसार प्रत्येक पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निमूर्लन तक्रारीचा कक्ष असावा जिथे एक अधिकारी फक्त याच संदर्भातील तक्रारींची दखल घेईल.पण,असे घडले नाही कारण पुरोगामी म्हणून घेणा-या महाराष्ट्रालाच त्याचे गांर्भीय नाही,त्यामुळेच खरात सारखे लिंगपिसाट,अधर्मी,भोंदू बाबांचे पेव ठिकठिकाणी फूटलेले दिसून पडतात.
मोदी यांचे छायाचित्र या देशात अगदी पेट्रोल पंपापासून तर स्मशान घाटांवरील फ्लॅक्सवरील योजनांमध्ये दिसून पडतं.पण,देशाला या अश्या भोंदूगिरी व अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी कुठलीही जागरुकता शहरी आणि ग्रामीण पातळीवर दिसून पडत नाही.परिणामी,स्त्रीच्या भाबडेपणाचा गैरफायदा या देशातील अनेक भोंदू नव्हे तर कपटी,लोभी व हूशार बाबा अनेक शतके …असेच घेत राहतील यात शंका नाही.
…………………………………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
