Advertisements

दैनिक नवप्रभाचे संपादक राकेश चौरसिया यांच्यासोबत घडली घटना
बजाज नगर पोलिस ठाण्यात गुन्हाची नोंद
नागपूर,ता.२५ नोव्हेंबर २०२५: रामदासपेठ तरुण भारत दैनिक समोरील प्लॉट क्र.२७, नवप्रभात चेंबर्स या इमारतीवर काल सोमवार दिनांक २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री अवैध दूधविक्री करणा-याने साथीदारांच्या मदतीने तूफान दगडफेक केली.ही इमारत दैनिक नवप्रभा दैनिकाचे संपादक राकेश चौरसिया यांची असून त्यांनी या घटनेविरोधात बजाज नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे..पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम १२५,१८९(१)३५१(२)१८९(२)३५२,३२४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
राकेश चौरसिया यांनी एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी एका यादव नावाच्या दूधवाल्याने त्यांच्या इमारतीसमोर दूधाचा अवैध ठेला लावला.त्याने चौरसिया यांच्या पत्नीला फक्त एकच दिवस ठेला लावू द्या म्हणून परवानगी मागितली.१९ नोव्हेंबर रोजी राकेश चौरसिया यांनी त्याला दूस-या ठिकाणी निघून जाण्यास सांगितले.२० नोव्हेंबर रोजी चौरसिया हे बाहेर गावी गेले.२३ नोव्हेंबर रोजी चौरसिया परत आल्यावर त्यांना तो अवैध ठेला त्याच ठिकाणी दूध विक्री करीत असल्याचे दिसले,त्यांनी तात्काळ ठेला हटविण्यास यादव याला सांगितले.
यावर यादव याने चौरसिया यांच्यासोबत वाद घातला व धमकी दिली.चौरसिया यांनी बजाज नगर पोलिस ठाण्यात फोन करुन धमकीची माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून अवैधरित्या दूध विकणा-या यादव याला ठेला हटविण्यास सांगितले.यावर दोन तासांचा वेळ यादव याने मागितला.पोलिस त्याला समज देत निघून गेले.
मात्र,पोलिस गेल्यावर यादव याने चौरसिया यांच्यासोबत पुन्हा भांडण सुरु केले व ठेला हटवणार नसल्याचे सांगितले.यावेळी फोन करुन त्याने आपले काही साथीदार बोलावून घेतले.चौरसिया यांनी पुन्हा बजाज नगर पोलिसांना घटनास्थळी बोलावले.पोलिसांनी यादव याचे दूकान बंद केले व त्याला निघून जाण्यास सांगितले.यानंतर यादव व त्याचे साथीदार निघून गेेले मात्र,रात्री १२ वाजता दरम्यान त्यांनी चौरसिया यांच्या घरावर तूफान दगडफेक करण्यास सुरवात केली.या घटनेची चौरसिया यांनी ११२ क्र.वर सूचना दिली.पोलिसांनी घटनास्थळी पाचारण केले तोपर्यंत आरोपी फरार झाले.
चौरसिया यांनी मध्यरात्रीच बजाज नगर पोलिस ठाणे गाठून आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र,आज मंगळवारी सकाळी त्यांची एफआयआर नोंदविण्यात आली.चौरसिया यांनी त्यांच्या इमारतीजवळ पोलिस सुरक्षेची मागणी केली आहे.दूधासारखे ‘सात्विक’पेय विक्री करणा-यांचे हे असे ‘तामसी’गुण बघून नागपूरकर ग्राहकांनाही मोठा धक्का बसला आहे.
नागपूर हे मुख्यमंत्र्याचे शहर असून देखील असामाजिकतत्वांना उपराजधानीत कशाचीही भीती वाटत नाही.रामदासपेठ सारख्या शहरातील सर्वात पॉश वस्तीत शुल्लक वादातून मध्यरात्री कोणाच्याही घरावर दगडफेक करुन सर्वसामन्य कुटूंबात दहशत निर्माण करण्याचे धाडस हे उपराजधानीत गुंडशाहीचा वाढता बोलबाला याचे निर्दशक आहे. पोलिसांचा वचक कमी झाल्याचेही ही घटना निर्दशन करते. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने देखील अशा शहरभर पसरलेल्या व नोंदणीकृत नसलेल्या परराज्यातील विक्रेत्यांच्या अवैध ठेल्यांवर योग्य व वेळीच कारवाई करने गरजेचे आहे,अशी मागणी आता केली जात आहे.
संपादक राकेश चौरसिया यांचा संपर्क क्रमांक- ९८२२४६२२५८
………………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
