फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपादीक्षाभूमीवर भंते विनाचार्यला विरोध, दीक्षाभूमीवर आंदोलन

दीक्षाभूमीवर भंते विनाचार्यला विरोध, दीक्षाभूमीवर आंदोलन

Advertisements

नागपूर, ता. २८: महाबोधी आंदोलनात अटक होऊन प्रकाशझोतात आलेल्या भंते विनाचार्य यांचे चळवळीतील योगदान किती आहे, असा सवाल करीत नागपुरातील अनुयायांनी दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलाविण्यास तीव्र विरोध दर्शविला. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सदस्यांसमोर अनुयायांनी सुमारे दोन तास आंदोलन केले.

भंते विनयाचार्य यांना धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे बोलावल्यास या सोहळयात गोंधळ होईल, अशा इशारा अनुयायांनी दिला. समाजातील धामिंक तत्वज्ञ व इतर विचारवंतांना बोलवा असा आग्रह धरीत, तातडीने भंते विनयाचार्य यांना नकार कळवा, असा आग्रह धरताना समिती सदस्यांच्या विरोधात आंदोलन केले. अनुयायांचा रोष वाढत असल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांचा मोठा ताफा दीक्षाभूमीवर तैनात झाला. यानंतरही बराचवेळ आंदोलन सुरु होते.
स्मारक समितीची तातडची बैठक घेण्यात येईल. इतर सदस्यांसोबत चर्चा करून यावर तत्काळ निर्णय घेतला जाईल,असे डॉ. राजेंद्र गवई यांनी सांगितले. 
शाळा, कॉलेज सुरु करणार : गवई
पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दीक्षाभूमीच्या परीसरात प्रचंड चिखल साचले आहे. अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असून, डॉ. आंबेडकर कॉलेजसह आसपासच्या परीसरातील सरकारी संस्था अनुयायांसाठी मोकळया करण्यात येत असल्याची माहिती डॉ. राजेंद्र गवई यांनी पत्रकार परीषदेत दिली.
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या