
आयुक्तांनी दिव्यांगाना न्याय द्यावा:आभा पांडे यांची माणगी
नागपूर,ता. १८ जानेवारी: शहरात आजपासून मनपाप्रशासनाद्वारे दहा ही झोनअंतर्गत येणारे रस्ते व फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याबाबत कारवाईला सुरवात झाली यात धंतोली झोनमध्ये येणा-या काही दिव्यांगाच्या दूकानांची देखील अतिक्रमण विभागाने आज तोडफोड केली परिणामी ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांच्या नेतृत्वात दिव्यांगानी आज मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांच्या कक्षासमोर तीव्र निर्दशन केले.
आयुक्तांच्या नव्या आदेशात शहरातील सर्व भागांमध्ये अतिक्रमण हटविण्यासाठी एकाच वेळी मोहिम राबविण्यास सांगण्यात आले होते.अभियानादरम्यान अतिक्रमणाबाबत ढिसाळ धोरण अवलंबिणा-या अधिका-यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली तसेच एखादी तक्रार किवा गडबड आढळ्यास विभागीय चौकशी करुन प्रशासकीय कारवाई केली जाईल,असा इशारा आयुक्तांनी दिला होता मात्र या धोरणात शहरातील दिव्यांगांबाबत कोणतेही संवेदशनशील धोरण अवलंबिण्यात आले नाही.
रस्ते,फूटपाथ होणार मोकळे… मात्र याच रस्त्यावर लहान मोठा व्यवसाय करुन आपले व आपल्या कुटुंबियांचा उदर निवार्ह करणा-या दिव्यांगांना आज धंतोली झोन मध्ये करण्यात येणा-या अतिक्रमण विरोधी कारवाईत कोणताही माणूसकीचा दिलासा मिळाला नाही.त्यांच्या कष्टाने कमावलेल्या सामानाची नासधूस करीत त्यांच्या दूकानांवर आज जेसीबी चालविण्यात आल्याने आज दिव्यांगांना नियतीसोबतच मानवनिर्मित संवेदनहीनतेला देखील सामोरे जावे लागल्याचे दृष्य हे हेलावून टाकणारे होते.
अनेक दिव्यांग हे आपला उधवस्त, उदरनिर्वाहचे सामान बघून रडत होते.ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफूल्ल गुडधे पाटील हे त्यांच्या मदतीला धावून आले व त्यांनी आयुक्तांच्या कक्षासमोर मनपा प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाच्या संवेदनशून्य कारवाईच्या विरोधात चांगलाच मोर्चा उघडला.
याप्रसंगी माध्यमांशी बोलताना आभा पांडे म्हणाल्या,की आम्ही आयुक्तांना विनंती केली की तुम्ही अगदी थोडा वेळ तरी येथे थांबा व दिव्यांगासोबत बोला मात्र आयुक्तांनी कोणाचेही म्हणने न ऐकता काढता पाय घेतला.आयुक्तांचा दिव्यांगाप्रति असा रु क्ष् व्यवहार बघता दिव्यांगासोबत आयुक्तांच्या कक्षासमोरच आता ठिय्या आंदोलन करण्याचा मग आम्ही निर्धार केला.
आम्ही आयुक्तांना विणवणी केली की दिव्यांगांसोबत एकदा चर्चा करा,मात्र आयुक्तांनी सांगितले मी निपाणे यांना पाठवतो.निपाणे हे अधिकारी घटनास्थळी आले असता त्यांनी सांगितले अतिक्रमण हा विषय आयुक्तांच्याच अखत्यारीरीत येतो मी यात काहीच करु शकत नाही.एवढ्या मोठ्या पदावरील आयएएस अधिकारींना अनेकविध कामे असतील हे मी समजू शकते मात्र माणूसकी व संवेदनशीलपणा जपण्याचे काम हे देखील आयुक्तांचेच होते.त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन दिव्यांगांचे म्हणने ऐकून घ्यायला हवे होते त्यांचे दू:खं समजून घ्यायला हवे होते.
आम्हा लाेप्रतिनिधींकडे देखील चक्क दुर्लक्ष् करुन आयुक्त निघून गेले.परिणामी आम्ही आयुक्तांच्या कक्षासमोर आज आंदोलन केले. दिव्यांगानी सात-आठ वर्षांपूर्वीच मनपात निवेदन दिले की आम्हाला व्यवसायासाठी हक्काची जागा द्यावी,दर वर्षी त्यांच्या पावत्या देखील फाडल्या जातात मात्र एवढ्या वर्षांनंतरही अतिक्रमणाच्या नावाखाली वारंवार त्यांना बेरोजगार व उधवस्त करण्याचे काम मनपा प्रशासन करीत असल्याचा आरोप आभा पांडे यांनी केला.
आयुक्तांच्या कक्ष्ा समोरील आंदोलनाची दखल घेत आयुक्तांनी पाच प्रतिनिधींसोबत आभा पांडे यांना भेट देण्यास संमती दिली असता,आभा पांडे यांनी दिव्यांगांच्या समस्या त्यांच्या पुढे मांडल्या.या प्रसंगी आयुक्तांनी रस्त्यावरील अतिक्रमणाला अभय तर नाही देऊ शकणार हे स्पष्ट करीत रस्त्या मागील दिव्यांगांच्या दूकानांना सरंक्ष् ण दिले जाईल असे आश्वासन दिले असल्याचे आभा पांडे यांनी सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
