

नाना पटोले यांचा भाजपवर घणाघात
– दक्षिण नागपुरातील इंडिया आघाडीची सभा “हाऊसफुल”
नागपूर, ता. ४ एप्रिलः भारतीय जनता पक्षाचे उमेदवार स्वतःला व्यापारी म्हणतात. उद्योगपती मित्रांचे कर्ज माफ करण्यासाठी सामान्य जनतेला लुटण्याचे काम भाजप करीत आहे. असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला. दिल्लीला व्यापारी पाठवावा की जनतेचा सेवक हे नागरिकांनी ठरववावे असे आवाहन यावेळी पटोले यांनी केले. इंडिया आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ ताजबाग, रघुजीनगर येथे जनसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, चंद्रकांत हांडोरे, अभिजीत वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सलील देशमुख, शेखर सावरबांधे, दीनानाथ पडोळे, अशोक धवड, गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार, अतुल लोंढे, संजय महाकाळकर, किशोर कुमेरिया, दूनेश्वर पेठे, प्रशांत धवड, वजाहत मिर्झा यांची प्रमुख उपस्थिती होती.

जनता उतरवणार सत्ताधाऱ्यांचा माजः मुत्तेमवार
सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज चढला आहे. मनमानी पद्धतीने जनतेची लुट करुन देशाची एकात्मता संपविण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. सत्तेचा हा माज जनताच १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान करुनउतरविणार असल्याचा विश्वास माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तमेवार यांनी व्यक्त केला.
उत्तर नागपुरातील जनतेचा निर्धार; अहंकारी सरकारचा करणार पायउतार-
केंद्रातील भाजप सरकार अहंकारी झाली असून मनमानी निर्णय घेण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. त्यामुळे जनसामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन आभासी भौतिक विकासाचे चित्र रंगविण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे, जनतेला हे समजले असून आता अहंकारी सरकारचे पायउतार केल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा निर्धार उत्तर नागपुरातील जनतेने केला आहे.

जन आशीर्वाद यात्रेनिमित्त गुरुवारी इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी उत्तर नागपुरातील नागरिकांशी संवाद साधला तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यात्रेची सरुवात मोतीबाग येथील कला मंदिर सभागृह येथून झाली होती तसेच पूर्ण उत्तर नागपूरच्या प्रत्येक गल्लीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय मार्गे यादव नगर येथे गुरुवारच्या यात्रेचा समारोप झाला.
भाजपला मोठा धक्का, ठाकरेंच्या समर्थनार्थ विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ मैदानात-
भाजपच्या बालेकिल्ल्यात शिक्षक मतदारसंघात बारा वर्ष शिक्षक मतदार संघाचे आमदार राहिलेल्या भाजप समर्थित नागो गाणारांना पराभूत करणारे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह आमदार सुधाकर अडबाले यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे इंडिया आघाडीचे नागपूर लोकसभा निवडणूक २०२४ चे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांना सक्रीय पाठिंबा जाहीर केला आहे.
देशातील हुकुमशाही सरकारचा बीमोड करण्यासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी, तरुणांना रोजगार देण्यासाठी, शिक्षण-शिक्षकांच्या हितासाठी आपण हा पाठिंबा विदर्भातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना जाहीर केला असल्याचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी अधिकृत पत्राद्वारे कळविले आहे.
संविधानाच्या रक्षणासाठी एकवटले सर्व-
संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी आणि नागपूरच्या खऱ्या विकासासाठी आतापर्यंत विकास ठाकरे यांना विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्ष (खोरीपा), रिपब्लिकन संयुक्त आघाडी यांच्यासह अनेक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच त्यांचे हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारासाठी मैदानात उतरविले आहे.
…………………………………..




आमचे चॅनल subscribe करा
